१९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकच्या माध्यमातून जगाच्या डोळ्यांत धूळ फेकण्यात अॅडॉल्फ हिटलर पूर्णपणे यशस्वी झाला होता. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशांना वाटत होते की जर्मनी आता शांततेच्या मार्गावर आहे. पण याच शांततेच्या पडद्यामागे हिटलरने 'व्हर्सायचा तह' फाडून कचऱ्याच्या डब्यात फेकला होता आणि युरोपच्या इतिहासातील सर्वात महाभयंकर युद्धमशीन (War Machine) तयार केले होते. आता वेळ आली होती ती जुने हिशोब चुकता करण्याची! १९३४ मध्ये इटलीतील 'व्हेनिस' शहरात जेव्हा हिटलर आणि मुसोलिनीची पहिली भेट झाली होती, तेव्हा मुसोलिनीने हिटलरचा 'नवशिका' म्हणून प्रचंड अपमान केला होता. इटलीची लष्करी परेड दाखवून मुसोलिनीने आपला रुबाब झाडला होता. तो अपमान हिटलर विसरला नव्हता. आता तीन वर्षांनंतर, सप्टेंबर