देवाचे ठाणे ४ मी माझं सामान गाडीला बांधून बाहेर पडलो.गाडीला किक्मारणार तेवढ्यात माझं लक्ष वर गॅलरीत उभ्या असलेल्या सुजाता कडे गेले.ती एकटक माझ्याकडे बघत होती.खरतर मी ठरवलं होतं की काही झाले तरी वर पाहायचं नाही पण शेवटी वर लक्ष गेलेच होते.मी सहज राहायचं ठरवलं व हात हलवला.तिनेही हात हलवला. जर त्या सड्यावर एखादी अमानवीय शक्ती असेल तर ती रात्रीच्या वेळी सक्रीय होईल असा माझा कायास होता.शिवाय अफाट माळावर राहून आकाशातले तारे न्याहाळत रात्र घालवायची गंमत मला अनुभवायची होती.मी सड्यावर पोहचलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते.मी त्या कातळ शिल्पाला लागूनच असलेल्या उंचवट्यावर टेन्ट उभा केला.आत कोणताही सरपटणारा प्राणी शिरणार