झपाटलेला वाडा - भाग 3

  • 510
  • 222

झपाटलेला वाडा - भाग 3: भिंतीतली बाईविहिरीतली दोन प्रेतं बाहेर आली. सकाळ झाली.आर्यनने गावातून चार माणसं बोलावली. हरिभाऊने रॉकेल आणलं. कोणाच्याच अंगात हिम्मत नव्हती त्या दोन पांढऱ्या फुगलेल्या बॉडींना हात लावायची. वीस वर्ष पाण्यात होत्या, पण कुजल्या नव्हत्या. सुनिताने श्रुतीला अजूनही घट्ट धरलं होतं. आईची मिठी सुटलीच नव्हती.हरिभाऊ रडत रडत बोलला, "साहेब, वीस वर्ष. वीस वर्ष ही लेकरं थंड पाण्यात होती. तुम्ही पुण्य केलं."चिता जळली. दोन चिता. एक मोठी, एक छोटी. जशी आग लागली तसा विहिरीतला काळा रंग एकदम कमी झाला. पाणी पहिल्यांदा निळं दिसलं. आणि त्या ज्वाळेत आर्यनला दोन सावल्या वर जाताना दिसल्या. एक मोठी, एक छोटी. हातात हात