झपाटलेला वाडा - भाग 4

झपाटलेला वाडा - भाग 4: शेकोटीतलं सत्यगच्चीच्या कोपऱ्यात जे पडलं होतं, ते सांगाडा नव्हताच. वीस वर्ष पावसात, उन्हात वाऱ्यात राहून त्याचा एक गोळा तयार झाला होता, वेलींनी त्याला गिळून टाकलं होतं. पिंपळाच्या मुळांनी त्याच्या बरगड्यांमध्ये घर केलं होतं. कवटीवर एक मोठा खड्डा होता. हा पडून झालेला खड्डा नव्हता. हा कोणीतरी जड दगडाने हाणून पाडलेला खड्डा होता. खूनाचा पुरावा.आर्यनने हरिभाऊला हाक मारली. हरिभाऊ वर आला आणि त्या सांगाड्याकडे बघतच खाली बसला. त्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी आलं."रघु... लहानपणापासून माझ्या खांद्यावर खेळला रे हा. वाईट नव्हता. पण दारूच्या आहारी जाऊन तो या मार्गाला आला... दारूने याच्याकडून आधी बायको-मुलीचा खून करवला, आणि मग त्याच