झपाटलेला वाडा - भाग 5: दोन आत्म्यांची कहाणीसकाळ झाली. पण आर्यनसाठी सकाळ झालीच नव्हती. रात्रभर त्याने डायरीत एकच ओळ लिहिली होती - "उद्या तळघरात जाणार." पण सकाळी उठल्यावर त्याच्या डोक्यात दुसराच विचार आला.रघुनाथ म्हणाला होता - "दत्ताला मी मारलं." म्हणजे दत्ताचा आत्मा कुठे गेला? त्याची बॉडी तर जाळली होती, पण आत्मा? तो तर इथेच असणार. विहिरीत.त्याने हरिभाऊला विचारलं, "काका, दत्ताची राख कुठे आहे?"हरिभाऊ म्हणाला, "त्याची बॉडी विहिरीतच सापडली होती. दोन वर्षांपूर्वी. फुगलेली. आम्हीच काढली. त्याच्या घरच्यांनी घाटावर जाळलं. पण साहेब... त्याला मुक्ती मिळाली नाही. लोक अजूनही सांगतात, पौर्णिमेला तो विहिरीच्या काठावर रडत बसलेला दिसतो विचित्र आवाज करतो शेवटी बिडी ओढतो