द्वितिय महायुद्ध - भाग 15

  • 198
  • 101

मार्च १९३९ मध्ये चेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केल्यानंतर हिटलरचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला होता. ब्रिटन आणि फ्रान्सचे नेते केवळ पोकळ धमक्या देऊ शकतात, हे त्याला पक्के समजले होते. आता हिटलरच्या रक्ताळलेल्या जबड्यासमोर होता युरोपचा नवीन बळी—पोलंड! पहिल्या महायुद्धानंतर 'व्हर्सायच्या तहाने' जर्मनीचे दोन तुकडे करून मधून पोलंडला समुद्राकडे जाण्यासाठी एक रस्ता दिला होता (ज्याला डॅन्झिग कॉरिडॉर म्हटले जायचे). हिटलरला हा भाग कोणत्याही परिस्थितीत परत हवा होता. पण पोलंडवर हात टाकणे सोपे नव्हते. ब्रिटन आणि फ्रान्सने यावेळी पोलंडला वचन दिले होते की, जर जर्मनीने हल्ला केला, तर ते पोलंडच्या मदतीला धावून येतील. हिटलर-स्टालिन करार: दोन शत्रूंची भयंकर खेळी हिटलरला फ्रान्स आणि ब्रिटनची भीती नव्हती, पण