रानवाटा - 2

रानवाटाभाग २ – लाल डोळ्यांचं जंगलत्या रात्री...गावात एकही माणूस झोपला नव्हता.गणूच्या घराबाहेर अजूनही लोकांची गर्दी होती.घराच्या आत नवजात मुलगी आईच्या कुशीत शांत झोपली होती.पण बाहेर...संपूर्ण वातावरणात एक अनामिक भीती पसरली होती.धोंडाबाई घराच्या उंबरठ्यावर बसून त्या बाळाकडे एकटक पाहत होती.तिच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर घामाच्या धारा वाहत होत्या.ती पुटपुटली,«"तीच आहे... इतक्या वर्षांनी ती परत आली आहे..."»गणूने घाबरत विचारलं,"आजी, काय बोलताय तुम्ही?"धोंडाबाईने त्याच्याकडे पाहिलं."गणू... आजपासून या मुलीला सूर्यास्तानंतर घराबाहेर कधीही सोडू नकोस.""का?""कारण..."ती वाक्य पूर्ण करणार इतक्यात...धाड...!घराचं मागचं लाकडी दार जोरात आपटलं.सगळे दचकले.बाहेर वारा नव्हता...मग दार आपटलं कसं?गणू हातात कंदील घेऊन बाहेर गेला.घरामागे फक्त दाट जंगल होतं.रातकिड्यांचा आवाज अचानक थांबला.जंगलात अशी शांतता पसरली होती...जणू