शेवटचा संदेश

सीता लहानपणापासूनच सुखवस्तू कुटुंबात वाढली होती.ती तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. आई, बाबा, आजी, आजोबा आणि घरातील प्रत्येक व्यक्ती तिच्यावर खूप प्रेम करायची. तिच्या घरात तिच्या प्रत्येक इच्छेला महत्त्व दिले जायचे. तिला एखादी गोष्ट हवी असेल, तर ती मिळायचीच.या सगळ्यामुळे सीता थोडी हट्टी आणि अधीर झाली होती. पण तिच्या या स्वभावामागे एक प्रेमळ आणि दयाळू मनही होते.अभ्यासात ती खूप हुशार होती. बारावीमध्ये तिने ९५ टक्के गुण मिळवले. त्यानंतर JEE परीक्षेतही तिने उत्कृष्ट कामगिरी केली आणि ९५ पर्सेंटाइल मिळवले. तिच्या या यशामुळे तिला देशातील एका प्रसिद्ध इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला.सीतासाठी हे तिच्या आयुष्यातील एका नवीन पर्वाची सुरुवात होती.कॉलेज तिच्या घरापासून