ओम ? इथे काय करतोयस तू ? ते ही एकटाच ? ओम थोडा गोंधळून गेला होता , कदाचित घाबरला ही होता . त्याला इतका अंदाज होता सुहा ताई इकडेच कुठेतरी लपून बसली आहे . हा आवाज त्याच्या पप्पाचा होता . म्हणून तो स्वतःहून धावत पुढे गेला . म्हणाला,' काही नाही पप्पा ! मला इथे छान वाटतं! इथे खूप छान छान पक्षी दिसतात ...मला खूप आवडतात...' अस बोलता बोलता पप्पाला हाताला पकडून बाहेर खेचत घेऊन जातो . तितक्यात एक झाडाच्या मागे लपून बसलेली सुहा बाहेर आली . तितक्यात जुई आणि तीच्या मैत्रिणीही तिथे आल्या . सुहा म्हणाली , ओम ची मम्मी