झपाटलेला वाडा - भाग 12

  • 357
  • 123

झपाटलेला वाडा - भाग 12: अकराव्या बळी नंतरसरपंच मेला होता. देवीच्या पायाजवळ. छातीत सोन्याचं त्रिशूळ. डोळे उघडे. तोंडातून काळा फेस. आणि सगळं रक्त... मूर्तीने प्यायलं होतं. मूर्तीच्या सोनेरी ओठांना ताजं रक्त लागलं होतं. जणू देवीने आत्ताच रक्त प्यायलं.गावात गोंधळ उडाला होता जिकडे तिकडे आरडाओरड चालली होती. लोक म्हणाले, ही देवी नाही ही हडळ आहे सोन्याची हडळ  काल वाडा होता, आज मंदिरात हडळ बसलीय! रोज एक बळी घेणारपोलीस आले. बॉडी पाहिली इन्स्पेक्टर म्हणाला, हा खून आहे. कोणीतरी त्रिशूळ मारलं. मंदिर बंद करा ही पन्नास कोटीची मूर्ती जप्त करा. सरकारी मालमत्ता.चार पोलिसांनी मूर्तीला हात लावला. ओढायला लागले. पण मूर्ती हलली नाही. जणू