द्वितिय महायुद्ध - भाग 19

(135)
  • 2.8k
  • 1.1k

ब्रिटनच्या आकाशात झालेला अपमानास्पद पराभव हिटलरच्या जिव्हारी लागला होता. ब्रिटनला नमवता आले नाही, याचा अर्थ युद्ध आता लांबणार होते. पण हिटलरचा स्वभाव शांत बसण्याचा नव्हता. त्याचा खरा आणि सर्वात मोठा हेतू ब्रिटन किंवा फ्रान्स जिंकणे हा कधीच नव्हता. त्याच्या 'माईन काम्फ' या आत्मचरित्रात त्याने आधीच लिहून ठेवले होते की, जर्मन वंशाच्या लोकांना राहण्यासाठी आणि शेती करण्यासाठी जी अवाढव्य जागा (लेबेन्सरॉम) हवी आहे, ती जागा पूर्वेकडे, म्हणजेच रशियामध्ये आहे. तसेच, हिटलर आणि नाझी पक्षाचा सर्वात मोठा वैचारिक शत्रू कोणता असेल, तर तो म्हणजे 'कम्युनिझम' (साम्यवाद). रशिया हा कम्युनिस्ट देश होता. ऑगस्ट १९३९ मध्ये हिटलरने रशियाचा हुकूमशहा जोसेफ स्टालिन याच्यासोबत जो 'अनाक्रमण