देवाचे ठाणे - 7

देवाचे ठाणे ७मागील भागकेला.तेव्हा अवकाशयानातून दोन तेजस्वी पुरुष खाली उतरले. डोक्यावर हिरेजडित मूकूट,कानात चमकदार कुंडल, गळ्यात रत्नखचित हार,कमरेला पिवळं पितांबर,पायात खडावा.अगदी राजा रविवर्मा यांच्या चरित्रातील देवासारखा वेष होता. तोपर्यंत आदिमानवांची जमात ओरडत तिथपर्यंत आली. समोरचे दिव्य पुरुष पाहून ते सारे गुढग्यावर बसून हात जोडून तसेच राहिले.    पुढे सुरू....  समोरच दृश्य माझ्यासाठी धूसर होत गेले.काही काळ फक्त अंधार जाणवत राहिला.एका खोल विवरातून मी बाहेर पडत आहे असं मला जाणवू लागले.जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी कातळ सड्यावर उभा होतो.समोर त्या शिल्पाच्या मानव माझ्या समोर उभा होता." तू जे बघितलेस ते दृश्य दहा हजार वर्षांपूर्वीचे होते.ती आमची पृथ्वीवरील पहिली भेट होती."" पण तुम्ही नेमके कुठून