झपाटलेला वाडा - भाग 15

  • 393
  • 102

झपाटलेला वाडा - भाग 15: शेवटचा बळी आणि वाड्याचा अंत [शेवटचा भाग]वाडा बंद झाला होता. दार, खिडक्या, सगळं बंद. आत दहा आत्मे, हातात खंजीर, त्रिशूळ, दोर. आणि मध्ये आर्यन. अकरावा बळी. भिंतीवर ताज्या रक्ताने लिहिलं होतं -अकरावा मालक - आर्यन. मृत्यू - आज रात्री 12 वाजता. 2026.बारा वाजले होते. अमावस्या. बाहेर एवढा काळोख की हात दिसत नव्हता. आत फक्त एका तेलाच्या दिव्याचा मंद प्रकाश. आणि त्या प्रकाशात दहा सावल्या पुढे येत होत्या.सावित्री म्हणाली, ये बाळा... घाबरू नको... तुला दुखणार नाही... फक्त एकदा गळा दाबू... एकदा खंजीर... मग तू आमच्यात येशील... कायमचा... या वाड्याचा मालक होशील... शंभर वर्षांसाठी... हा वाडा परत