उलगुलान २०२६

  • 1.1k
  • 324

नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानातून हजारो पावलं मुंबईच्या दिशेने निघाली, तेव्हा तो फक्त १८० किलोमीटरचा प्रवास नव्हता. त्या पावलांसोबत डोंगर होते, जंगल होतं, आश्रमशाळा आणि वसतिगृहं होती, उपोषणं होती आणि वर्षानुवर्षं कुणी न ऐकलेले प्रश्न होते. आयोजकांनी या पदयात्रेला नाव दिलं, “जेन झी उलगुलान”. शंभर वर्षांपूर्वीचा एक शब्द एका पिढीने पुन्हा आजच्या काळात आणला. तो शब्द असाच निवडलेला नाही. बिरसा मुंडांनी १८९९ मध्ये ब्रिटिश सत्तेविरुद्ध पुकारलेल्या उलगुलानची आठवण त्यात आहे. तेव्हा लढाई जंगल, जमीन आणि स्व