काळी बाहुलीभाग ३ बंद खोलीतला आवाजदरवाजावर झालेल्या त्या तीन टकटकांनी संपूर्ण घर हादरल्यासारखं झालं. निखिलच्या कानात अजूनही त्या आवाजाचा प्रतिध्वनी घुमत होता. बाहेर कोणी आहे याची त्याला खात्री होती, पण त्या व्यक्तीला आत येऊ द्यायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. आजी त्याच्या शेजारी उभी होती. तिच्या हाताची पकड इतकी घट्ट होती की निखिलच्या मनगटाला दुखायला लागलं होतं.बाहेर पुन्हा शांतता झाली.काही सेकंद गेले.मग दरवाजाच्या पलीकडून हळू आवाज आला.आजी, मला आत येऊ दे.आजीच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले. तिचे डोळे दरवाजावर खिळले. निखिलने पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतकी खोल भीती पाहिली होती.तो हळू आवाजात म्हणाला, आजी, कोण आहे ती.आजीने उत्तर दिलं नाही.बाहेरून पुन्हा आवाज आला.आजी,