काळी बाहुलीभाग ५ जुन्या घराची गोष्टआजीचे शेवटचे शब्द ऐकून निखिल काही क्षण तिथेच उभा राहिला. माळ्यावरच्या अंधाऱ्या खोलीत जुन्या लाकडाचा वास, ओलसर मातीचा गंध आणि बंद जागेत साचलेली कुबट हवा पसरली होती. त्याच्या हातातला मोबाईल थरथरत होता. कपाटाच्या वर ठेवलेली काळी बाहुली अजूनही त्याच्याकडे पाठ करून बसली होती. तिच्या पाठीवर लाल धाग्याने शिवलेलं गौरी हे नाव स्पष्ट दिसत होतं. पण आजी म्हणत होती की ती बाहुली गौरीची नव्हती. मग ती तिच्या नावाने इथे का ठेवली होती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाळीस वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेशी तिचा नेमका संबंध काय होता.निखिलने हळू आवाजात विचारलं, आजी, तू म्हणालीस तो माणूस अजून जिवंत आहे.