स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर जयसिंग भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग 3 भाग 2 वरुन पुढे वाचा........ “काय नाव आहे तुझ्या मित्राचं? त्यालाच का बोलवत नाहीस इथे? जे काही ठरायचं असेल, ते सर्वांसमोरच ठरू दे.” – गणेश. “अरे गणेश तुला काही कळत नाही. काही गोष्टी अश्या असतात, की ज्या सर्वांसमोर उघड करायच्या नसतात. जरा धीर धर. यात तुझाही फायदा आहे.” – जयसिंग. मीटिंग संपली. गच्चीवरून खाली उतरातांना गणेश थांबला, सुधाकरकडे