स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर जयसिंग भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग ५ भाग ४ वरुन पुढे वाचा........ “जयसिंग ने आणला. तो म्हणाला की तुझ्या बरोबर गोष्टी झाल्या आहेत आणि समाधान झाल्यावरच तू सही केली म्हणून.” – अप्पासाहेब. “शेवटी त्याने डाव साधलाच. मला आधी पासूनच त्याचा संशय येत होता. आणि म्हणूनच त्याने मी, तुम्ही आणि बिल्डर अशी मीटिंग होऊ दिली नाही. मग आता? तुमचा काय विचार आहे?” – प्रशांत. “आता तूच