स्टॅम्प पेपर पात्र परिचय प्रशांत. वाड्याचा मालक विशाखा प्रशांतची बायको. विजय राघव प्रशांतचा मित्र आणि बिल्डर जयसिंग भाडेकरू. मल्हार भाडेकरू. अप्पासाहेब भाडेकरू. विश्राम आप्पासाहेबांचा मुलगा. गणेश भाडेकरू सुधाकर भाडेकरू भाग ६ भाग ५ वरुन पुढे वाचा........ दोन दिवसांनी रविवार होता आणि सगळे ठरल्या प्रमाणे प्रशांतच्या घरी जमले. प्रशांतने सर्वांना काय काय झालं याचं अपडेट दिलं, आणि म्हणाला की, “कोर्टाने पुढच्या आठवड्यातली तारीख दिली आहे, तेंव्हा अमृतलाल पण हजर असेल. सुनावणी होईल. बघू काय होतं ते. आपले निंबाळकर वकिल म्हणाले की अजून एक दोन तारखा पडतील पण आपली बाजू भक्कम आहे