मिसटेकन आयडेंटिटी भाग १ बसस्टॉप

  • 408
  • 72

मिसटेकन आयडेंटिटी                      भाग  १  बसस्टॉप        नाशिक पुणे रोड वरचा एका बसस्टॉपवर एक मुलगी बस ची वाट बघत उभी होती. जरा विचारमग्नच होती. बस यायला अजून थोडा वेळ होता. एका बाइक वरुन दोघं जण आले आणि त्या बसस्टॉप समोर थांबले. एक पाठीमागे जो बसला होता तो उतरला. समोर असलेल्या दांडया वरुन उडी मारून तो त्या मुली समोर आला आणि त्याने खिशात ठेवलेला मोठा सुरा काढला आणि सपासप आडवे तिडवे वार त्याने मुलीवर केले. तिच्या गळ्यावर आणि पोटात मोठ्या जखमा झाल्या एक मोठी जीवाचा थरकांप उडवणारी किंकाळी आसमंतात घुमली आणि ती मुलगी क्षणार्धात खाली कोसळली. बसस्टॉप वर अजून दोघे उभे