मिसटेकन आयडेंटिटी भाग २ चाळीसगाव. आणखी एक म्हणजे या मुली मुंबई पुणे सोडून इतक्या दूर नाशिकला कशाला येतील? जर कोणाला भेटायला आल्या असतील, तर कोणीतरी मिसिंग ची तक्रार केलीच असती. यांचा अर्थ या मुलीचं इथे येण्याचं कारण वेगळच असावं. आणि ते घरच्या लोकांना माहीत नसावं.” – चव्हाण. सर्वांनी थोडा विचार केला आणि त्यांनी चव्हाण साहेबांचं म्हणण मान्य केलं. “करपे तुमचं काय विश्लेषण आहे?” – शेंडे. “माझ्या मते,” आता करपे बोलले, “विदर्भातल्या मुलींचा चेहरा साधारण गोल किंवा चौकोनी असतो. नाक जरा जाडसरच असतं, ओठ पण थोडे जाड असतात भुवया बाकदार असतात आणि जाड असतात. त्यामुळे विदर्भ पण बाद झाला आहे.” –