मधुमती

(71)
  • 42.3k
  • 19
  • 11.5k

रोजच्या प्रमाणे आजदेखील आफिसातून बाहेर पडल्यावर थोडे भटकून जरा उशिराच पद्माकर घराकडे निघाला .किती वेळ जरी फिरले तरी घरी जाणे भागच होते .आफिस्तल्या लोकांच्या सहवासात दिवस कसातरी निघून जायचा आणि त्याच्या एकटेपणाची जाणीव कमीत कमी होत असायची. घरी आल्यावर बंद असलेलें दरवाजा मात्र - तू एकटाच आहेस , याची जाणीव करून देत असायचा .आजही तो आत आला ,उघडलेला दरवाजा तसाच सताड उघडा ठेवून तो खुर्चीत बसून राहिला.दुपारी केव्न्हां तरी येऊन गेलेल्या पोस्टमनने त्याच्या नावाचे टपाल खिडकीतून आत टाकलेले दिसत होते .त्याने ते पत्र हातात घेतले..त्याच्या सासुरवाडीहून आलेले पत्र, -त्याच्या मेहुणीचे लग्न होते , पद्धतीप्रमाणेत्या ला रीतसर निमंत्रण -पत्र आले होते. पण पद्माकर कसा जाणार या लग्नाला ? जिच्या माहेरचे हे कार्य होते ..ती त्याची बायको - मधुमती ..त्याला सोडून गेली होती,