मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यापेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते. मधूही आता मोठा झाला होता. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु एकाएकी त्याचे वडील वारले. वडील वारले व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती चार दिवस माहेरी आली होती. परंतु पुन्हा सासरी गेली. सारा कारभार मधूच्या अंगावर पडला. परंतु त्याला अनेकांनी फसविले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादारांचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू, त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जेवत त्याला अन्न मिळेना. जो गाद्यागिर्द्यावर झोपायचा, त्याला रस्त्यावर निजावे लागे. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता. मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे.

Full Novel

1

सोनसाखळी - 1

मधू व मालती दोघे बहीणभाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आईबाप मधू-मालतीचे सारे पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यापेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते. मधूही आता मोठा झाला होता. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु एकाएकी त्याचे वडील वारले. वडील वारले व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती चार दिवस माहेरी आली होती. परंतु पुन्हा सासरी गेली. सारा कारभार मधूच्या अंगावर पडला. परंतु त्याला अनेकांनी फसविले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादारांचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू, त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जेवत त्याला अन्न मिळेना. जो गाद्यागिर्द्यावर झोपायचा, त्याला रस्त्यावर निजावे लागे. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत, तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता. मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे. ...अजून वाचा

2

सोनसाखळी - 2

एक होता दगडफोड्या. गाढवांवर दगड घालून तो नेहमी नेत असे. एके दिवशी दगड लादलेली गाढवे घेऊन तो झा झा जात होता. तो त्याला वाटेत शिपायांनी अडविले. ते त्याला म्हणाले, हा रस्ता बंद आहे. राजेसाहेबांची स्वारी या रस्त्याने जाणार आहे. माहीत नाही का तुला, दिसत नाही का तुला? चालला गाढवे घेऊन. गाढवच दिसतोस. तो दगडफोड्या म्हणाला, मी असा राजा असतो तर किती छान झाले असते. मग मला कोणी अडविले नसते. मीच साऱ्यांना अडविले असते. त्याच्या मनात असे आले नाही तोच त्याच्यासमोर एक देवता उभी राहिली. तिने त्याला विचारले, तुला काय राजा व्हायचे आहे? ...अजून वाचा

3

सोनसाखळी - 3

एक होता राजा. त्याला शिकारीचा फार नाद. एकदा तो शिकारीसाठी गेला व रस्ता चुकला. भटक भटक भटकला. रानात त्याला लहानसा गुराखी भेटला. तो गायी चारीत होता, पावा वाजवीत होता. राजा त्याला म्हणाला, मुला मला रस्ता दाखवतोस? मुलाने विचारले, तुम्ही कोण? तो म्हणाला, मी राजा. गुराखी म्हणाला, राजासुद्धा रस्ता चुकतो! आम्ही नाही बा कधी चुकत. अंधारातसुद्धा नेमके घरी जाऊ. राजा म्हणाला, मुला तू हुशार आहेस. कोण तुला शिकवते? गुराखी म्हणाला, मला, कोण शिकविणार? झाडे, माडे, फुले, पाखरे, नद्यानाले हे माझे मित्र. गायी चारतो, घरी जातो. आई भाकर देते ती खातो. राजा म्हणाला, कोठे आहे तुझी आई? गुराखी म्हणाला, जवळच आहे झोपडी. येता का आईकडे! राजा म्हणाला, चल. दोघे निघाले. झोपडी आली. गुराखी म्हणाला, आई, आई आपल्याकडे राजा आला. हा बघ. म्हातारी लगबगा बाहेर आली. तिने घोंगडी घातली. राजा म्हणाला, म्हाताऱ्ये, तुझा मुलगा हुशार आहे. ...अजून वाचा

4

सोनसाखळी - 4

एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात, श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई. हजारो लोक पाहायला येत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. पाहि मां पाहि मां म्हणत असे. राजाकडची ती पूजा. तिचा थाट किती वर्णावा! किती सांगावा? सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई. असा त्याचा कार्यक्रम असे. ...अजून वाचा

5

सोनसाखळी - 5

एक होता राजा. तो रस्त्याने जात असता वाटेत जर लहान मुले भेटली तर त्यांना नमस्कार करी. राजा म्हाताऱ्या लोकांना करीत नसे. परंतु मुलांसमोर मात्र लवे. लोकांना याचे आश्चर्य वाटे. हळूहळू लोक राजाला वेड लागले असे म्हणू लागले. गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली. त्याच्या मनात आले की, राजाला आपण सारे सांगावे. एके दिवशी तो मुद्दाम उजाडताच राजाला भेटावयास गेला. राजाने विचारले, आज इतक्या लवकर काय काम आहे? प्रधान म्हणाला, महाराज मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे. राजा म्हणाला, विचारा. संकोच करु नका. प्रधान म्हणाला, महाराज, तुम्ही वेडे झाले आहात असे सारे लोक म्हणतात. राजा म्हणाला, का बरे? मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात? प्रधान म्हणाला, महाराज आपण दयाळू आहात, न्यायी आहात, सारे खरे. ...अजून वाचा

6

सोनसाखळी - 6

एक होता राजा. तो फार दुष्ट होता. तो प्रजेला फार छळी. प्रजेला कोणतेही सुख नाही. डोक्यावर कर मात्र वाढत प्रजा हवालदील झाली. 'असा कसा हा राजा, मरत का नाही एकदा,' असे ती म्हणे. पुढे काय झाले. राजा आजारी पडला. त्याच्या सर्व शरीराला व्रण झाले. त्या व्रणातून पू येई, रक्त येई, माशा सभोवती भणभण करीत. गावोगावचे वैद्य आले. हकीम आले, नाना उपाय झाले. परंतु गुण पडेना, व्रण बरे होई ना. ती क्षते मोठी होऊ लागली. अपार वेदना होऊ लागल्या. राजाला वाटे मरण बरे. गावाबाहेर एक नवीन साधू आला होता. लहानशी झोपडी बांधून तो राहिला होता. तो कोणाच्या आगीत नसे दुगीत नसे. रामनाम घेण्यात रंगलेला असे. राजा, गावाबाहेर एक साधू आला आहे. त्याच्याकडे जाऊन पाया पड. तो काही उपाय सांगेल. एक जुना वृद्ध मंत्री म्हणाला. न्या मला पालखीतून. पाहू या प्रयत्न करुन. राजा म्हणाला. पालखीतून राजाला नेण्यात आले. साधू रामनामात रंगला होता. महाराज, राजा तुमच्याकडे आला आहे. पाहा त्याची स्थिती. किती दुर्दशा झाली आहे! तुम्ही सांगा काही उपाय. राजाला चैन पडत नाही. त्यामुळे राज्यकारभाराकडे लक्ष लागत नाही. तुम्ही दया करा. असे मंत्री हात जोडून म्हणाला. ...अजून वाचा

7

सोनसाखळी - 7

एक होता राजा. त्याचा स्वभाव जरा विचित्र होता. लोक त्याला कधी नावे ठेवीत, कधी त्याची स्तुती करीत. त्या राजाला एका साधुपुरुषाच्या दर्शनाची इच्छा झाली. राजाने त्या साधूची कीर्ती ऐकली होती. परंतु त्या साधूचे दर्शन त्याला कधीच झाले नव्हते. जो कोणी मला साधुपुरुषाचे दर्शन करवील, त्याला मी एक हजार सोन्याची नाणी देईन. अशी राजाने सर्वत्र दवंडी देवविली. त्या साधूला कोणीच पाहिले नव्हते. साधू निरनिराळ्या वेशात वावरतो, निरनिराळी स्वरुपे धारण करतो, असे लोक म्हणत. साधूला ओळखायचे कसे? एक गरीब मनुष्य होता. त्याला बायको होती. त्याला मुलेबाळे होती. परंतु घरात खायला नव्हते. आपली उपाशी मुलेबाळे पाहून त्याला वाईट वाटे. तो राजाकडे गेला व म्हणाला, राजा, मला आजच हजार सोन्याची नाणी दे. दोन महिन्याचे आत साधूचे दर्शन तुला घडवीन. राजा म्हणाला, दर्शन न घडविलेस तर? दरिद्री म्हणाला, मरणाची शिक्षा मला दे. राजा म्हणाला, ठीक. त्या दरिद्री माणसाला एक हजार सोन्याची नाणी देण्यात आली. तो घरी गेला. मुलांबाळांना आनंद झाला. बायको आनंदली. घरी आता कशाला वाण नव्हती. ...अजून वाचा

8

सोनसाखळी - 8

एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले. सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई, आपल्या जवळ निजायला घेई, तिच्या जवळ कितीतरी खेळ, किती बाहुल्या, किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी, छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते. सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट, पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे, बाबा, मला भरवा. मी मोठी झाल्ये म्हणून काय झाले? मग प्रेमाने बाप तिला घास देई. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय