कोंबडा अरवला तसा वेडा बाळू खडबडून जागा झाला. त्याने घाईगडबडीत सदरा अंगावर चढवला, खालची सतरंजी गुंडाळली व तो धावतच स्वयंपाकघरात गेला. त्याने गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं व एका बाजूला चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं. चहा तयार होताच त्याने तो कपात ओतला व कप घेऊन तो थेट व्हरांड्यात आला. पण रावसाहेब तिथे नव्हते. इतक्या वर्षात असं पहिल्यांदाच घडत होतं. बाळू अंगणात गेला पण तिथेही रावसाहेब दिसत नव्हते. बाळू पुन्हा वाड्यात आला. तो थेट रावसाहेबांच्या खोलीपाशी आला. आतून घोरायचा आवाज येत होता. बाळूने हळूच खोलीचा दरवाजा सरकवला. आत बेडवर रावसाहेब गाढ झोपले होते.

Full Novel

1

वेडा बाळू - 1

कोंबडा अरवला तसा वेडा बाळू खडबडून जागा झाला. त्याने घाईगडबडीत सदरा अंगावर चढवला, खालची सतरंजी गुंडाळली व तो धावतच गेला. त्याने गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं व एका बाजूला चहा बनवण्यासाठी एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं. चहा तयार होताच त्याने तो कपात ओतला व कप घेऊन तो थेट व्हरांड्यात आला. पण रावसाहेब तिथे नव्हते. इतक्या वर्षात असं पहिल्यांदाच घडत होतं. बाळू अंगणात गेला पण तिथेही रावसाहेब दिसत नव्हते. बाळू पुन्हा वाड्यात आला. तो थेट रावसाहेबांच्या खोलीपाशी आला. आतून घोरायचा आवाज येत होता. बाळूने हळूच खोलीचा दरवाजा सरकवला. आत बेडवर रावसाहेब गाढ झोपले होते. ...अजून वाचा

2

वेडा बाळू - 2

त्या रात्री रावसाहेबांना झोपच लागली नाही. मनात बकुळाच्या आठवणींचा पूर आला होता. त्यांनी घड्याळात पाहिले. सकाळचे आठ वाजून गेले बाळूदेखील गाढ झोपला होता. ती पेंटिंगमधली बाई त्याच्या स्वप्नात आली होती. ती बीछान्यावर पहुडली होती व बाळूकडे लडिवाळ हसत पाहत होती आणि बाळू एकेक पाऊल टाकत तिच्या जवळ जात होता. आता बाळू तिच्या अगदी जवळ आला होता इतक्यात त्याच्या पाठीत वेदना उसळली व पाठोपाठ रावसाहेबांचे तिखट शब्द त्याच्या कानावर आदळले. “भाsssssडया उठोतोस की हणू अजून एक लाथ पाठीत!” रावसाहेब कडाडले, तसा बाळू पाठ चोळतच उठला व थेट स्वयंपाकघरात गेला व पाचच मिनिटात हातात चहाचा कप ...अजून वाचा

3

वेडा बाळू - 3 - अंतिम भाग

रावसाहेब वाड्यावर पोहोचले तेव्हा त्यांचं मन पश्चातापाने व्यापलं होतं. बाळूवर आपल्या मुलावर आपण किती अन्याय केले हा एकच त्यांच्या मनात घोळत होता. वाड्यात येताच बाळूला शोधत पूर्ण वाडा त्यांनी पालथा घातला. शेवटी ते गोठ्यात गेले. तिथे बाळू गाईंना चारा देण्यात मग्न होता. बाळूला पाहताच रावसाहेबांनी त्याला आलिंगन दिले आणि ते लहान मुलासारखे रडू लागले. रडक्या घोगऱ्या आवाजात ते बोलत होते, “मला माफ कर बाळा, माफ कर! तुला गुरासारखा वागवला, वाटेल ते बोललो, पाठीत लाथा हणल्या, तुझा गाल सुजवला, मी चुकलो बाळा मी खूप मोठी चूक केली, माफ कर, मला माफ कर!” रावसाहेबांच्या अश्रूंमुळे बाळूचा मळका शर्ट खांद्यापाशी भिजला होता. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय