उलट्या पायांची म्हातारी

(122)
  • 151.5k
  • 54
  • 91.3k

“ए विनू चल की लवकर. कवापासून थांबलोय!” सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला. “खरच जायचं का आपन? मला लय भ्या वाटतंय रे.” विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले. “तरी तुला म्हनत हुतो नको घ्यायला याला. लय भित्र हाय हे.” सनी नंदूकडे पाहून बोलला. आपल्याला “भित्रा” बोललेलं विनूला आवडलं नाही. तो आवेशात येऊन म्हणाला, “मला भित्रा म्हंता व्हय. मी कुनाच्या बापाला बी भीत नाय. चला….” असे म्हणून तो एखाद्या योध्याच्या आवेशात पुढे आला. तिघांनीही आपापल्या सायकलीवर टांग मारली व ते नदीच्या दिशेने निघाले. रस्ता तसा मोकळाच होता. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या उंच

Full Novel

1

उलट्या पायांची म्हातारी - भाग एक

“ए विनू चल की लवकर. कवापासून थांबलोय!” सनीने पाचव्यांदा हाक दिली तसा विनू धावतच आला. “खरच जायचं का आपन? लय भ्या वाटतंय रे.” विनू घाबऱ्या नजरेने सनी आणि नंदूकडे पाहत म्हणाला. हे ऐकून सनी आणि नंदू मोठ्याने हसले. “तरी तुला म्हनत हुतो नको घ्यायला याला. लय भित्र हाय हे.” सनी नंदूकडे पाहून बोलला. आपल्याला “भित्रा” बोललेलं विनूला आवडलं नाही. तो आवेशात येऊन म्हणाला, “मला भित्रा म्हंता व्हय. मी कुनाच्या बापाला बी भीत नाय. चला….” असे म्हणून तो एखाद्या योध्याच्या आवेशात पुढे आला. तिघांनीही आपापल्या सा ...अजून वाचा

2

उलट्या पायांची म्हातारी - भाग दोन

“घाबरू नका रे बाळांनो. कितीतरी वर्षांनी आज या बंगल्यात तुमच्या सारख्या मुलांचा पाय पडला.” असं म्हणून ती म्हातारी रडू समोरचं दृश्य तिघांसाठीही अनपेक्षित होतं. सनीला तर त्याच्या आज्जीची आठवण झाली व त्या आठवणीने त्याचेदेखील डोळे पाणावले. आता बाहेर पाऊस पडू लागला होता. “तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात का?” म्हातारीने प्रश्न केला तसा तिघांनीही एका सुरात उत्तर दिलं “होssssss” “घाबरणार नाही ना?” म्हातारीने पुन्हा प्रश्न केला. यावर आधीच भ्यायलेला विनू काहीतरी बोलणार होता इतक्यात सनीने त्याच्याकडे पाहिलं व त्याला नजरेनेच गप्प केलं. “नाय भिनार आज्जी तुमी सांगा गोष्ट. पन येक ईचारु का?” सनी म्हणाला. “विचार की?” असे म्हातारीने म्हणताच सनीने मनातील ...अजून वाचा

3

उलट्या पायांची म्हातारी - भाग तीन

“आता अजून एक गोष्ट ऐका.” आज्जी म्हणाली तसे तिघेही कान देऊन ऐकू लागले. आज्जीने गोष्टीला सुरुवात केली-ही गोष्ट आहे राहणाऱ्या बबन म्हात्रेची. बबन लहानपणापासूनच फार धाडसी होता. मिलिटरीत जाऊन देशसेवा करायचं त्याचं स्वप्न होतं. पण त्याची उंची बेताचीच होती त्यामुळे त्याला मिलीटरीत प्रवेश मिळाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकून वाचूनच तो मोठा झाला होता. त्याला शिक्षणात फारसा रस नव्हताच. मैदानी खेळात मात्र तो पटाईत होता. खोखो, कबड्डी आणि क्रिकेट हे त्याचे आवडते खेळ होते. शाळेत असताना तो ज्या कोणत्या टीमकडून खेळायचा त्या टीमचा विजय निश्चित असायचा. मग खेळ कोणताही असो. पाहता पाहता बबनचं शालेय शिक्षण संपलं. कॉलेजातही त्याने कसंबसं ...अजून वाचा

4

उलट्या पायांची म्हातारी - भाग चार

म्हातारीने गोष्ट संपवली. “लयच भारी गोष्ट सांगता हो तुमी आज्जी. माझी आज्जी पन मला अशाच भुताच्या गोष्टी सांगायची. लय वाटायची मला तवा. पन आता मी नाय घाबरत.” सनी म्हणाला. ही गोष्ट ऐकून तर नंदू आणि विनूची दातखिळीच बसली होती. भीतीतर वाटत होती पण तसं बोललो तर आपल्याला बाकीचे दोघे भित्रा म्हणतील या भीतीने दोघेही काहीच बोलत नव्हते. सनी मात्र आता चांगलाच रंगात आला होता. “आज्जी अजून एक गोष्ट सांगा ना.” असं म्हणत त्याने नंदू आणि विनूची आणखीनच पंचाईत केली. तो असं बोलायची जणू वाटच पाहात असल्यासारखं म्हातारी म्हणाली, “सांगते पण आधी एकेक कप गरमगरम दूध प्या. थंडीमुळे गारठले असाल. ...अजून वाचा

5

उलट्या पायांची म्हातारी - अंतिम भाग

कॉन्स्टेबल विजय जेव्हा नदीकाठावर पोहोचला तेव्हा पावसाचा जोर वाढला होता. त्याच्या सोबत त्याचे मित्र राजन, सोनू आणि सखाराम सुद्धा नदीकाठावर जाऊन तिथेच चूल पेटवून मस्तपैकी मटण बनवण्याचा त्यांचा प्लॅन होता. सर्व सामान घेऊन ते घरातून निघाले. पण ते वाटेत असतानाच पावसाने हजेरी लावली व त्यांचा उत्साह ओसरला. ते जेव्हा नदीकाठी पोहोचले तेव्हा चौघेही पूर्ण भिजले होते. तिथेच गाड्या लावून ते एका मोठ्या झाडाखाली थांबले. एवढ्या दूर येऊन परत माघारी जाण्यापेक्षा पाऊस थांबायची वाट पाहत ते त्या झाडाखालीच थांबले होते. त्यांना येऊन बराच वेळ झाला होता. अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. विजय वैतागून म्हणाला, “च्यायला आपलं नशीबच खराबाय. म्हनुनच ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय