मंतरलेली काळरात्र

(24)
  • 40.6k
  • 5
  • 15.5k

मंतरलेली काळरात्र भाग-१. अचानक लाईट गेली....! सगळीकडे अंधार पसरला कोणालाच कोणी दिसत नव्हते इतका भयाण अंधार जणू डोळण्यांची दृष्टी नाहीशी व्हावी.. काही क्षणासाठी इतका अंधार आम्ही घरातील सर्व जण जेवत होतो आई, मी माझा मोठा भाऊ(दादा) आणि आमची आजी..माझे वडील मिलिटरी मध्ये होते,ते आताच काही महिन्यांपूर्वी येऊन गेले होते, आता घरात अंधार पसरला होता आणि तेव्हा आई म्हटली घाबरू नका मी मेणबत्ती लावते.जाग्यावर बसून रहा..!आई ने कशी तरी चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात मार्ग काढत काडेपेटी सापडत मेणबत्तीचा घरात शोध घेऊ लागली.इकडे आम्ही दोघे भाऊ जाग्यावरती बसून होतो बाहेर सोसाट्याचा वाऱ्याचा आवाज आता माझ्या कानावर स्पष्ट येऊ लागला मनात भीती निर्माण झाली होती असा

नवीन एपिसोड्स : : Every Friday

1

मंतरलेली काळरात्र (भाग-१)

मंतरलेली काळरात्र भाग-१. अचानक लाईट गेली....! सगळीकडे अंधार पसरला कोणालाच कोणी दिसत नव्हते इतका भयाण अंधार जणू डोळण्यांची नाहीशी व्हावी.. काही क्षणासाठी इतका अंधार आम्ही घरातील सर्व जण जेवत होतो आई, मी माझा मोठा भाऊ(दादा) आणि आमची आजी..माझे वडील मिलिटरी मध्ये होते,ते आताच काही महिन्यांपूर्वी येऊन गेले होते, आता घरात अंधार पसरला होता आणि तेव्हा आई म्हटली घाबरू नका मी मेणबत्ती लावते.जाग्यावर बसून रहा..!आई ने कशी तरी चमकणाऱ्या विजांच्या प्रकाशात मार्ग काढत काडेपेटी सापडत मेणबत्तीचा घरात शोध घेऊ लागली.इकडे आम्ही दोघे भाऊ जाग्यावरती बसून होतो बाहेर सोसाट्याचा वाऱ्याचा आवाज आता माझ्या कानावर स्पष्ट येऊ लागला मनात भीती निर्माण झाली होती असा ...अजून वाचा

2

मंतरलेली काळरात्र (भाग-२)

(मंतरलेली काळरात्र भाग-२)ही कहाणी आता आता आपण जशीच्या तशी पणजोबाच्या तोंडून ऐकणार आहोत , ज्या रात्री ही घटना घडली होती एक मंतरलेली काळरात्र........बाळाला जो पर्यंत माझा आणि तिच्या आईचा चेहरा दिसत नाही तो पर्यंत ते रडत असते .हे मला ठाऊक होते ,म्हणूनच ह्या भयाण रात्री मला माझ्या मनाविरुद्ध गावात जाणे भाग होते , मी एका रिकाम्या गोणीची(पोते) कोपरी केली आणि ती माझ्या डोक्या पासून मागच्या बाजूने कमरेपर्यंत आली जेणे करून मला पावसात मी कमीत कमी भिजवे म्हणून मी ही युक्ती केलती.तसेच एका हातात रिकामे रॉकेल आणण्यासाठी पत्र्याचा डब्बा घेतला.मी जसा छपराला बाहेरून कडी लावून निघालो तसे मला समोर फक्त ...अजून वाचा

3

मंतरलेली काळरात्र (भाग-३)

( मंतरलेली काळरात्र भाग-३)मी आता गावाच्या दिशेने भर भर पाय उचलत निघालो होतो. आता गावाच्या खूप जवळ पोहोचलो परंतू आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या काळ्याकुट्ट अंधारात गाव हरवले होते मला गाव दिसेनासे झाले होते, मी आता तसाच त्या अंधारात गाव शोधू लागलो , गावाच्या खूप जवळ आलोय हे माझ्या लक्षात आले कारण गावातील मोकाट कुत्रे मला भुंकायला लागली ,त्यावरून मला अंदाज आला , मी माझा दुकानदार मित्र रघू कडे जाण्याचे ठरवले होते , त्याच्या घरासमोर येऊन पोहोचलो होतो आता कुठे पावसाचा जोर कमी झाला ,परंतु रिमझिम अजूनही चालू होती,मी रघुच्या घरासमोर उभा होतो तसे रघुचे घर आणि दुकान एकत्रच होते ...अजून वाचा

4

मंतरलेली काळरात्र (भाग-४)

मला आता झुडपात काहीतरी हालचाल झालेली दिसून आली, तसा मी सावध झालो आणि माझ्या लक्षात आले हे तर बकरीचे आहे .जे की, मी जाताना इथे ह्या ठिकाणी ठेवून गेलो होतो, त्याच्या जवळ गेलो खांद्याला पिशवी अडकवली एका हातात भाला आणि दुसऱ्या हाताने मी त्याच्या कानाला पकडले त्याचा स्पर्श मला वेगळाच जाणवला जाताना त्याला स्पर्श केलता तसाच आताचा स्पर्श ही सारखाच जाणवला जसे की एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला आहे. खरं तर कळत नव्हते आता नियतीच्या मनात काय चालू आहे माझ्याविषयी पण इथे एक नक्की होते की, माझे सर्व संकटे सम्पली नव्हती.खरं तर त्याला ह्या विराण स्थळी एकट्याला सोडून जाणे मनाला पटत ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय