ये... वादा रहा सनम

(8)
  • 24.3k
  • 1
  • 8.5k

ही एक काल्पनिक कथा आहे. याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही.'ये वादा रहा सनम' एक अनोखी कहानी. एक प्रेम करायला शिकवणारी कथा. एक अशी कथा ज्यात रहस्य आहे प्रेम आहे शोध आहे आणि एक वचन सुद्धा आहे धर्तीवर परत परत जन्म घेण्याचं.हिमालय पर्वतावर...महादेव ध्यानस्थ बसलेले असताना पार्वती माता येतात आणि महादेवांना विचारतात.पार्वती माता: "स्वामी. तुम्ही खूपच चिंतेत दिसताय. मी तुमच्या चिंतेच कारण समजू शकते का?" आपले डोळे उघडत महादेव आपल्या चिंतेच कारण सांगू लागतात.महादेव: "प्रिये. मी चिंतेत आहे ते धर्तीवर पसरलेल्या आतंकामुळे. ही तीच धरती आहे जिला कधी काळी आपण स्वर्ग म्हणायचो बघ आज त्याच धर्तीची काय अवस्था झाली आहे."पार्वती

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday

1

ये... वादा रहा सनम - 1

ही एक काल्पनिक कथा आहे. याचा वास्तविक जीवनाशी कुठलाही संबंध नाही.'ये वादा रहा सनम' एक अनोखी कहानी. एक प्रेम शिकवणारी कथा. एक अशी कथा ज्यात रहस्य आहे प्रेम आहे शोध आहे आणि एक वचन सुद्धा आहे धर्तीवर परत परत जन्म घेण्याचं.हिमालय पर्वतावर...महादेव ध्यानस्थ बसलेले असताना पार्वती माता येतात आणि महादेवांना विचारतात.पार्वती माता: "स्वामी. तुम्ही खूपच चिंतेत दिसताय. मी तुमच्या चिंतेच कारण समजू शकते का?" आपले डोळे उघडत महादेव आपल्या चिंतेच कारण सांगू लागतात.महादेव: "प्रिये. मी चिंतेत आहे ते धर्तीवर पसरलेल्या आतंकामुळे. ही तीच धरती आहे जिला कधी काळी आपण स्वर्ग म्हणायचो बघ आज त्याच धर्तीची काय अवस्था झाली आहे."पार्वती ...अजून वाचा

2

ये... वादा रहा सनम - 2

तेवढ्यात ऋषीकेशची आई रूचीका खोलीत येते. रुचीका खूप धार्मिक वृत्तीची असते. तिची महादेवांवर अपार श्रद्धा असते. म्हणूनच की काय वर्षानंतर ऋषीकेश चा जन्म झालेला असतो. ऋषीकेश घरात एकुलता एक मुलगा असतो म्हणून घरात सगळ्यांचा तो अगदी लाडका असतो. त्याला थोडासा जरी त्रास झाला तर सगळ घर एकत्र येत असत.असच आजही ऋषीकेशला डोक्याला हाथ लावून बसलेलं बघून रुचीका काळजीने विचारते.रुचीका: "बाळ काय झाल तुला? डोकं दुखतय का तुझ आपण डॉक्टर कडे जायचं का? एसीतही तु इतका घामाघूम कसा झालास बेटा?" रुचीकाची काळजी बघून ऋषीकेश तिचे हात आपल्या हातात घेत तिला समजावतो.ऋषीकेश: "आई... आई... अग थांब जरा माझी इतकी काळजी करू ...अजून वाचा

3

ये... वादा रहा सनम - 3

इकडे...कर्मवीर आर्किटेक्चरिंग कॉलेज...वेळ सकाळी साडेआठ ची..ऋषीकेश आणि त्याचा ग्रुप कॉलेजमध्ये खूप दिवसांनी एकमेकांना भेटलेले असतात. पण यावेळी ऋषीकेशच मात्र बोलण्या कडे आजीबात लक्ष नसत.तो चित्र काढण्यात इतका गुंग असतो की, जस काही त्याच्या आजूबाजूला कुणीच नाही तो तिथे एकटाच बसला आहे.त्याचे फ्रेंड्स देखील गप्पा मारण्यात मग्न झालेले असतात. सगळे फ्रेंड्स सुट्ट्यांमध्ये ही खूप बिझी असतात कारण सुट्ट्यानंतर त्यांना एका प्रोजेक्टवर काम करायचं असत. म्हणून सुट्टीत सगळ्यांना एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो.आणि म्हणूनच सगळ्यांना खूप काही सांगायचं असत. पण ऋषीकेश मात्र शांत बसलेला असतो एकदम विचार मग्न असतो. अजूनही त्याच्या मनात त्याला पडलेल्या स्वप्नाचाच विचार घोळत असतो.तेवढ्यात कौशिकच त्याच्याकडे लक्ष ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय