Ye vada raha sanam - 3 books and stories free download online pdf in Marathi

ये... वादा रहा सनम - 3

इकडे...
कर्मवीर आर्किटेक्चरिंग कॉलेज...
वेळ सकाळी साडेआठ ची..
ऋषीकेश आणि त्याचा ग्रुप कॉलेजमध्ये खूप दिवसांनी एकमेकांना भेटलेले असतात. पण यावेळी ऋषीकेशच मात्र मित्रांच्या बोलण्या कडे आजीबात लक्ष नसत.
तो चित्र काढण्यात इतका गुंग असतो की, जस काही त्याच्या आजूबाजूला कुणीच नाही तो तिथे एकटाच बसला आहे.
त्याचे फ्रेंड्स देखील गप्पा मारण्यात मग्न झालेले असतात. सगळे फ्रेंड्स सुट्ट्यांमध्ये ही खूप बिझी असतात कारण सुट्ट्यानंतर त्यांना एका प्रोजेक्टवर काम करायचं असत. म्हणून सुट्टीत सगळ्यांना एकमेकांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो.
आणि म्हणूनच सगळ्यांना खूप काही सांगायचं असत. पण ऋषीकेश मात्र शांत बसलेला असतो एकदम विचार मग्न असतो. अजूनही त्याच्या मनात त्याला पडलेल्या स्वप्नाचाच विचार घोळत असतो.
तेवढ्यात कौशिकच त्याच्याकडे लक्ष जात तो फ्रेंड्स ना इशारा करतो आणि ऋषीकेशला विचारतो.
कौशिक: "ऋष्या, काय रे? काय झालं, तु इतका शांत का बसला आहेस? तू आम्हाला सांगू शकतोस.(त्याच चित्राकडे लक्ष जात). आणि हे काय काढल आहेस? बघू आण इकडे."
कौशिक त्याच्या कडच चित्र हातात घेतो आणि बघू लागतो. कौशिक चित्र खूप निरखून बघत असतो. आणि अचानक त्याला काही तरी आठवत. तो ऋषीकेश ला विचारतो.
ऋषीकेश: "ऋष्या हे मंदीर,(थोडस थांबत) तु गेला आहेस का हे मंदीर बघायला."
ऋषीकेश: "नाही, मी कधीच गेलो नाही. का रे? तुला या मंदीरा बद्दल काही माहीत आहे का?"
कौशिक परत एकदा चित्र बघतो आणि डोळे बंद करून आठवायचा प्रयत्न करतो.
काही क्षणा नंतर...
कौशिक: "अं... जरा थांब. मी एकदा लॅपटॉप वर एक सर्च करतो. मला आजीनी एक गोष्ट सांगितली होती तिच्या लहानपणीची त्यात जे मंदीर होत ते सेम असच होत. तिला स्वप्न पडायची मग ती स्वप्न मला गोष्टी रुपात सांगायची मी स्वतः अशी चित्रे काढलीये. थांब आपण सर्च करू. आणि एक सांग जर तु हे मंदीर बघीतल नाहीस तर अगदी हुबेहूब चित्र कस काढलस तु."
कौशिकच बोलणं ऐकून ऋषीकेश तर पुरता चक्रावूनच जातो. त्याला काय बोलाव हेच सुचत नाही. पण थोडा विचार करून तो सांगतो.
ऋषीकेश: "तुला आठवत मी एकदा तुला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं होतं.(थोडस थांबून) मी आज सकाळी हे मंदीर स्वप्नात बघीतल. त्याच बरोबर महादेव पार्वती आणि अजून दोन व्यक्ती होत्या. मी जेव्हा त्यांना बघीतल तेव्हा मला अस वाटलं की मी त्यांना ओळखतो. पण कस हेच समजत नाहीये."
हे ऐकून कौशिक सह सगळे जण हसू लागतात.
तेवढ्यात प्रिया बोलते.
प्रिया: "इनफ गाईज. तो काळजीत आहे आणि तुम्ही त्याची मजा कसली घेताय.(मनातल्या मनात हसत). बरं सोड, ते सगळं मी त्यांच्या वतीने तुला सॉरी म्हणते ठीक आहे.(थोडस थांबत). मला एक सांग तु 21व्या शतकातलाच आहेस न. अस कधी असत का?"
ऋषीकेश सगळ्यांवर खूप चिडतो. आणि कौशिक कडून आपली चित्र हिसकावून घेत सरळ लायब्ररीत निघून जातो. त्याची सगळ्यांनी मजा घेतलेली बघून कौशिकला वाईट वाटत तो आपला ग्रुप सोडून ऋषीकेशला समजवायला जातो.
कौशिक: "यार ऋष्या, आपण किती दिवसांनी भेटतोय सोड आता, इतका राग मानायचा का असतो का? सॉरी न. हे बघ सगळ्यांनी कान पकडले आहेत."
ते बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकस हसू येत. ते बघून त्याचे फ्रेंड्स देखील खुश होतात. 'अशीच त्यांची मैत्री असते. खरी मैत्री जगायला शिकवणारी'
लायब्ररीच्या बाहेर येत...
प्रिया: "चलो फ्रेंड्स, एक बार कॅन्टीन का भी मूह देख ही आते है क्यु."
ऋषीकेश हसत म्हणतो.
ऋषीकेश: "छायला, हीने इतक्या उत्साहाने कधी क्लास तरी नाव घेतल होत का रे."
हे ऐकून प्रिया थोडीशी चिडून बोलते.
प्रिया: "घोड्या, तुझ्याच साठी म्हणत होते. टेन्शन मध्ये आहेस जरा फ्रेश वाटेल म्हणून चहा पाजावा म्हणलं. तर मलाच टोमणे मारायला लागलास की. नको असेल तर जाऊ दे."
सगळे हसू लागतात..
ऋषीकेश: "झोंबली न मिरची आला न राग. तसच मला ही आला होता ."
प्रिया अजूनच चिडते आणि त्याच्या मागे धावू लागते.
प्रिया: "यु..."
काही वेळा नंतर... ऋषीकेश देखील सॉरी म्हणतो आणि सगळे कॅन्टीनकडे जातात.
कॅन्टीनमध्ये...
सगळे एकमेकांना टाळ्या देत नेहमीच्या खुर्च्यांवर येऊन बसतात.
कौशिक लगेच आपलं लॅपटॉप काढून सर्च करू लागतो.
काही वेळाने...
कौशिक: "ऋष्या. जरा तु काढलेलं चित्र दाखव." माहिती ओपन करत कौशिक म्हणतो.
पण यावेळी सुद्धा ऋषीकेश चा गैरसमज होतो. आणि सगळे कौशिक कडे वेगळ्याच नजरेने बघू लागतात. कौशिक ते बघून सगळ्यांना सांगतो.
कौशिक: "काय? तुम्ही सगळे माझ्याकडे अस काय पाहताय मला मनापासून त्याला मदत करावीशी वाटत आहे. फ्रेंड्स माझा या गोष्टींवर विश्वास नाही हे खरय पण मला आजींनी सांगितलेली एक गोष्ट लक्षात आहे त्यावरून जर ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या असतील तर मी जे करतोय ते अगदी योग्य आहे ती नेहमी म्हणायची तुला एकदा खूप मोठं काम करावं लागेल तुला कुणाची तरी मदत करावी लागेल तेव्हा मला त्याचा अर्थ समजत नव्हता पण आता कळतोय"
थोडासा विचार करून ऋषीकेश त्याला आपली चित्रे देतो कौशिकनी बसल्या बसल्या चित्रातल्या मंदिरासारखच अगदी हुबेहूब मंदीर शोधून काढलेलं असत. फरक एवढाच असतो की, मंदिराची तोडफोड झालेली असते. कौशिक चित्र आणि फोटो मॅच करून बघतो. तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो आपल्या फ्रेंड्सना जवळ बोलावतो आणि फोटो व चित्र दाखवतो. तसेच ऋषीकेशला सांगतो.
कौशिक: "हे बघा फ्रेंड्स जादू.(सगळे बघतच राहतात). मला काय वाटत माहीत आहे ऋष्या. तुला पडणारी स्वप्न, ही सगळी चित्रे, आणि हे मंदीर. यात नक्कीच काही तरी कनेक्शन आहे. काळजी घे रे बाबा."
ऋषीकेश अजूनच विचारात पडतो. आणि विषय बदलतो.
क्रमशः

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED