कवी असह्य व माझा संबंध तसा जुनाच. ऋणानुबंध प्रकारात मोडतील असे आमचे संबंध मुळीच नाहीत. आज मात्र अचानकच कवी असह्यांच्या ओघवत्या वाणीतून आमच्या नात्यातील प्रेम, प्लास्टिकच्या पिशवीने गटार तुंबून वहाव तसं, वहात होतं. देवावरचा विश्वास उडून मी नास्तिक व्हायला कैक प्रसंगांचा हातभार असला तरी 'कवी असह्यांशी ओळख' हा त्यातला एक महत्त्वाचा प्रसंग. दिवसाची सुरुवात—मी हिच्यापेक्षा अमळच लवकर उठल्याने—शांततेत झाली होती. कुठूनतरी दूधात माशी शिंकावी, दूधात विरजन पडावे किंवा दुध उकळताना दूध फुटावे असंच काहीसे कवी असह्य आल्याने झालेलं होतं. घड्याळाकडे मी पुन्हा एकदा निर्विकारपणे पाहिलं. जे घड्याळ माझ्याकडे दररोज सर्कशीतल्या रिंगमास्टर प्रमाणे पाहत असतं त्याच घड्याळाचा चेहरा आज मला मलूल वाटला! त्याची जरब आज जाणवली नाही. साडेआठ उलटून गेले तरीही मी आज घरीच होतो—अर्थातच सुट्टीचा दिवस. याच सुट्टीच्या दिवसाचं औचित्य साधून असह्यांनी माझ्या घरी धाड टाकली होती. भीड रेटत असती तर मी केव्हाच कवी असह्यांना घराबाहेर रेटल असतं! कोत्या मनाचा माणूस मी, माझा स्वभाव मला खटकला.

नवीन एपिसोड्स : : Every Saturday

1

कवी असह्य. - 1

कवी असह्य व माझा संबंध तसा जुनाच. ऋणानुबंध प्रकारात मोडतील असे आमचे संबंध मुळीच नाहीत. आज मात्र अचानकच कवी ओघवत्या वाणीतून आमच्या नात्यातील प्रेम, प्लास्टिकच्या पिशवीने गटार तुंबून वहाव तसं, वहात होतं. देवावरचा विश्वास उडून मी नास्तिक व्हायला कैक प्रसंगांचा हातभार असला तरी 'कवी असह्यांशी ओळख' हा त्यातला एक महत्त्वाचा प्रसंग. दिवसाची सुरुवात—मी हिच्यापेक्षा अमळच लवकर उठल्याने—शांततेत झाली होती. कुठूनतरी दूधात माशी शिंकावी, दूधात विरजन पडावे किंवा दुध उकळताना दूध फुटावे असंच काहीसे कवी असह्य आल्याने झालेलं होतं. घड्याळाकडे मी पुन्हा एकदा निर्विकारपणे पाहिलं. जे घड्याळ माझ्याकडे दररोज सर्कशीतल्या रिंगमास्टर प्रमाणे पाहत असतं त्याच घड्याळाचा चेहरा आज ...अजून वाचा

2

कवी असह्य. - 2 - असह्यांच झेंगाट.

चेकाळलेली दहशतवादी टोळी, बोकाळलेली महागाई व ढासळलेली अर्थव्यवस्था यापेक्षा चुरगळलेली प्रेमचिठ्ठी आणि त्यात मुरगळलेली मने ही आजच्या तरुणाईला जास्त वाटतात. शरीरात रसायनांची आलबेल झाल्याने लागलीच उत्क्रांतिवादाची सूत्रे स्वतःकडे घेऊन निसर्गाला उन्नतीकडे नेणे कोणाला नको असेल? असे असले तरी प्रत्येकाने देशाकडे सुद्धा लक्ष दिलेच पाहिजे. त्यासाठी मग लग्न नावाची संकल्पना जन्मास आली! लग्न झालं की उत्क्रांतिवाद ते औद्योगिक क्रांती असा प्रवास माणूस करतो, हा माझा स्वानुभव आहे. देशातील तरुणांना धडाधड बोहल्यावर चढवल्याने पटापट देश पुढे जाईल या सरळसोट मताचा मी आहे! हे इतकं सोपं रहस्य आज मला असह्यांच्या गळी उतरवताना भगीरथ प्रयत्न करावे लागत होते. एकीकडे मला कामाला ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय