आषाढ महिन्याची सुरवात झाली होती. पहिल्याच दिवशी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु झाला होता. मस्त थंडगार, हवेहवेसे वातावरण होते. मी भिंतीवरच्या घड्याळात पाहिले. चार वाजत होते.सेवानिवृत्त माणसाला दुपारच्या चारचे एक वेगळे आकर्षण असते ते म्हणजे चहा! कुणासाठी प्राणप्रिय, कुणासाठी अमृततुल्य तर बहुतांश लोकांना हवाहवासा असा! त्यातच जर वातावरण पावसाळी असेल तर मग हमखास चहा हवाच असतो. त्यामुळे जसजसा काटा चार या अंकाकडे सरकत होता तसतशी माझी तगमग, अस्वस्थता, चुळबूळ वाढत होती कारण अजूनही सौभाग्यवतीने स्वयंपाक घरात प्रवेश केला असल्याचे जाणवत नव्हते. कदाचित वातावरणाचा परिणाम असल्यामुळे त्यांचा शयनगृहातील मुक्काम काही मिनिटांसाठी वाढला असण्याची दाट शक्यता होती. ही शक्यताच मला बेचैन करत होती. जसा 'बुडत्याला काडीचा आधार..' तसा 'बेचैन निवृत्त मानवाला टीव्हीचा आधार' याप्रमाणे मी टीव्ही सुरु केला आणि माझी गाण्याची आवडती वाहिनी सुरु केली. वाहिनीवर माझे आवडते गाणे लागले होते. तेही त्या वातावरणाला साजेसे असेच होते. पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत झिनत अमान गात होती..
Full Novel
पाऊसः आंबट-गोड! - 1
(१) आषाढ महिन्याची सुरवात झाली होती. पहिल्याच दिवशी सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरु झाला होता. मस्त थंडगार, हवेहवेसे वातावरण होते. भिंतीवरच्या घड्याळात पाहिले. चार वाजत होते.सेवानिवृत्त माणसाला दुपारच्या चारचे एक वेगळे आकर्षण असते ते म्हणजे चहा! कुणासाठी प्राणप्रिय, कुणासाठी अमृततुल्य तर बहुतांश लोकांना हवाहवासा असा! त्यातच जर वातावरण पावसाळी असेल तर मग हमखास चहा हवाच असतो. त्यामुळे जसजसा काटा चार या अंकाकडे सरकत होता तसतशी माझी तगमग, अस्वस्थता, चुळबूळ वाढत होती कारण अजूनही सौभाग्यवतीने स्वयंपाक घरात प्रवेश केला असल्याचे जाणवत नव्हते. कदाचित वातावरणाचा परिणाम असल्यामुळे त्यांचा शयनगृहातील मुक्काम काही मिनिटांसाठी वाढला असण्याची दाट शक्यता होती. ही शक्यताच मला बेचैन करत ...अजून वाचा
पाऊसः आंबट-गोड! - 2
(२) भज्यांवर मनसोक्त ताव मारुन सुंठ-मीऱ्याच्या चहाचा आस्वाद घेत आमच्या गप्पा सुरू झाल्या..."काहीही म्हणा पाऊस पडत असताना भज्यांपाठोपाठ असा म्हणजे एक अलौकिक आनंद...""आणि सोबत तात्यांच्या पावसाळी आठवणी म्हणजे आमच्यासाठी कपिलाषष्टीचा योग!" मी म्हणालो. तसे हसत तात्या म्हणाले,"व्वा! कविराज, व्वा! आलो होतो या विचाराने की, मोसम बनला आहे. आषाढदिन आहे. तुमच्याकडून छान कवितांचा त्यातच पावसाळी कवितांचा आस्वाद घ्यावा. पण तुम्ही तर आम्हालाच बोलते करीत आहात...""कसे आहे तात्या, आम्ही कवी तर नेहमीच अगदी समोरच्या माणसांना कंटाळा येईपर्यंत ऐकवत असतो. तुमच्या आठवणी का नेहमी नेहमी ऐकायला मिळणार आहेत? महत्त्वाचे काय तर तुमच्या आठवणी अर्थात तुमच्या परवानगीने शब्दबद्धही करता येतीलच की...""क्या बात है। ...अजून वाचा
पाऊसः आंबट-गोड! - 3 - अंतिम भाग
(३) चहा घेत असताना पुन्हा पावसाचा जोर वाढला. मी तात्यांना विचारले,"तात्या, घरी सांगून आला आहात ना? नाही तर वहिनी...""कसे सांगून आलो तरी उशीर झाला म्हणून आगपाखड आणि नाही सांगितले तर मग काय रौद्ररूप..."मी म्हणालो, "तात्या, तुम्ही बालपण आणि विद्यालयीन जीवनातील पावसाच्या आठवणी सांगितल्या. तुम्ही शिक्षक होता. या काळातीलही काही आठवणी असतीलच..."" हो ना. निश्चितच आहेत. शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. नोकरीचे गाव एक आडवळणी खेडे होते. म्हातारी आई आणि तरुण बहिणीला घेऊन त्या खेड्यात राहणे शक्य नव्हते म्हणून मग तालुक्याच्या ठिकाणी घर केले आणि इतर दोन शिक्षकांप्रमाणे मीही सायकलवर जाणे-येणे करु लागलो. चौदा किलोमीटरचे अंतर तोही कच्चा, खडकाळ रस्ता! अशा ...अजून वाचा