दॅट्स ऑल युअर ऑनर

(40)
  • 166.2k
  • 18
  • 93.7k

आकृती सेनगुप्ता ने आपली गाडी लुल्ला रोलिंग या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या जागेत लावली तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती.थंड बोचरी हवा पडली होती. तिने गाडीच्या काचा लावल्या आणि आपला रेन कोट कसाबसा गुंडाळला आणि झपाझप चालत ‘ फक्त कंपनीच्या सेवकांसाठी ‘ अस लिहिलेल्या दारातून आत आली.दुपार पर्यंत पाऊस पडतच होता पण आकृती ला ती इमारत सोडायची गरज नव्हती कारण कॅफेटेरीया असलेल्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तळ घरातील बोगद्याचा रस्ता होता.

Full Novel

1

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-१)

(माझी रहस्यकथा दॅट्स ऑल युअर ऑनर यातील सर्व पात्रे,प्रसंग, कथानक, काल्पनिक असून त्याचा जिवंत,मृत व्यक्तींशी किंवा वास्तवाशी, तसेच कोणत्याही भाषेतील, कथे शी संबंध नाही)दॅट्स ऑल युअर ऑनरप्रकरण १आकृती सेनगुप्ता ने आपली गाडी लुल्ला रोलिंग या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवलेल्या जागेत लावली तेव्हा पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती.थंड बोचरी हवा पडली होती. तिने गाडीच्या काचा लावल्या आणि आपला रेन कोट कसाबसा गुंडाळला आणि झपाझप चालत ‘ फक्त कंपनीच्या सेवकांसाठी ‘ अस लिहिलेल्या दारातून आत आली.दुपार पर्यंत पाऊस पडतच होता पण आकृती ला ती इमारत सोडायची गरज नव्हती कारण कॅफेटेरीया असलेल्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना तळ घरातील बोगद्याचा रस्ता होता.ऑफिस ...अजून वाचा

2

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-२ आणि ३)

दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण दोन)तपन लुल्लाने अंदाज केल्या प्रमाणे दुसरा दिवस स्वच्छ सूर्य प्रकाशाचा होता. पाऊस पूर्ण थांबला होता.आकृती सेनगुप्ता ने तिची गाडी दुरुस्त करायला माणूस आणला होता. त्याने गाडीचा डिस्ट्रिब्यूटर बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू केली होती. त्या दिवशी आपले काम ती कृत्रिम पणे करत राहिली. तपन हा एक वाया गेलेला मुलगा होता आणि त्याला धडा शिकवायचाच असा तिने निश्चय केला होता.भले तिला तिची नोकरी गमवावी लागली तरी बेहत्तर. तिने त्याच्या विरूध्द दावा ठोकला असता तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता असे तिला वाटून गेले.कारण त्यांनी तिची माहिती गुप्त हेरांकडून मिळवली असती, ती कुठल्या पुरुष बरोबर कधी , ...अजून वाचा

3

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-४)

दॅट्स ऑल युअर ऑनर(प्रकरण चार) सायंकाळी बरोब्बर पाच चाळीस ला कनक ओजस ने पाणिनीच्या ऑफिस चा दरवाजा त्याच्या खास वाजवला. पाणिनीने सौम्या ला मानेने खून करून त्याला आत बोलवायला सांगितले.‘‘ हाय सौम्या, ‘‘ आत येत असतानाच ओजस म्हणाला. ‘‘पाणिनी तुला लुल्ला प्रकरणात अद्ययावत माहिती हवी आहे? ‘‘‘ अर्थातच. काय आहे विशेष ?‘‘ पाणिनीने विचारले.‘‘पाणिनी या प्रकरणात तुला किती माहिती झाली आहे याची मला कल्पना नाही आणि मला ते माहित करून घ्यायचे पण नाही. ही कंपनी काही विशिष्ट वस्तूंचे उत्पादन करते. त्यांची कारखान्याची जागा बंदिस्त आहे ,म्हणजे कोणीही आले आणि आत गेले असे होत नाही.वरिष्ठ अधिकाऱ्यांना विशेष पार्किंग आहे.दारावर रखवालदार असतो.येणाऱ्या ...अजून वाचा

4

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-५)

दॅट्स ऑल युवर ऑनर प्रकरण पाच. पाणिनीने आपल्या जवळच्या किल्लीने ऑफिस चे दार उघडले.आत येताच कॉफीचा मस्त दरवळ आला.‘‘ हव्ये एक मस्त कप भरून.आहे ना शिल्लक ? ‘‘पाणिनीने सौम्या ला विचारले.‘‘ आपल्या दोघांसाठीच केली आहे.‘‘ कॉफीचा कप पाणिनीसमोर ठेवत सौम्या म्हणाली. ‘‘ कशी झाली तुमची मैथिली आहुजा बरोबरची भेट ?‘‘‘‘ चांगली झाली आणि नाही पण. पोलीस आकृतीच्या मागावर आहेत.‘‘मैथिलीआहुजा च्या स्कर्ट चा जो तुकडा त्याने कापून आणला होता तो त्याने खिशातून बाहेर काढला.‘‘ काय आहे हे ?‘‘सौम्या ने विचारले.‘‘ मला दोषी धरण्यात येऊ शकेल या सबबीवर मी या तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. ‘‘पाणिनी मिश्कील पणे म्हणाला. ‘‘ बर तुला ...अजून वाचा

5

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -६)

दॅट्स ऑल युअर ऑनर भाग ६दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजताच पाणिनी ऑफिसला आला तेव्हा कनक ओजस आणि सौम्या वर्तमान पत्र वाचताना दिसले.“ फोटो ओळखण्या बाबत काही प्रगती?” पाणिनीने विचारले.“ खास अशी नाही काहीच.” कनकने उत्तर दिले. “ आपला तो वॉचमन रात्रपाळी करतो आणि त्यामुळे सकाळी उशिरा पर्यंत झोपतो.पोलीस त्याला सकाळी लौकरच झोपेतून उठून त्यांच्या बरोबर कुठेतरी घेऊन गेलेत.नेमके कुठे ते समजले नाही.मी माझा एक माणूस तिथे पेरून ठेवलाय.मला कळवेलच तो.त्याला माझा माणूस फोटो सुद्धा दाखवेल आणि प्रश्न विचारेल.दरम्यान तुला सांगायचे म्हणजे तुझे नाव पेपरात आलय, पोलिसांना काही नवीन पुरावा मिळालाय म्हणे.”“ कसे काय ?”“ आपल्या दोघांचा लाडका मित्र ...अजून वाचा

6

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-७)

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण ७पाणिनी पटवर्धन ठीक दहा वाजून पस्तीस मिनिटांनी त्याची गाडी चालू करून पार्किंग लॉट च्या पडण्याच्या दारात तयार होता.ती येई पर्यंत वेळ काढायचा म्हणून गाडी चालू करण्यात काहीतरी अडचण आल्याचा बहाणा त्याने केला. दहा चाळीस होऊन पंचवीस सेकंद झाली आणि मैथिली ची गाडी रोरावत आत आली. ती अक्षरशः उडी मारूनच पाणिनीच्या गाडीत बसली. “ एवढे केले तरी जरा उशीर झालाच.” ती दिलगिरी व्यक्त करीत म्हणाली.“ काही हरकत नाही, तू बऱ्यापैकी जमवलस.”“ वेळेबाबत इतका आग्रह का होता ” तिने उत्सुकतेने विचारले.“ मला माझी बाहेर जायची वेळ सहज आणि स्वाभाविक वाटेल आणि ती पार्किग मधल्या रजिस्टर वर ...अजून वाचा

7

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-८)

दॅट्स ऑल युअर ऑनर भाग ८पाणिनी त्याच्या ऑफिस मध्ये परत आला तेव्हा ओजस त्याची वाट बघत होता.“ पोलिसांनी आकृती ला पकडलंय.” ओजस म्हणाला.“ त्यांनी तिला कुठे शोधून काढले?”“ देवनारमध्ये, मैथिली च्या अपार्टमेंटमध्ये.” “ पण त्यांना तिच्याच घरी शोधावे हे सुचले कसे?” पाणिनी ने विचारले.“ बहुदा तिच्या सगळ्याच मैत्रिणींकडे त्यांनी चौकशी केली असावी.”“ सौम्या, मला अॅड.खांडेकर ना फोन लाऊन दे .” पाणिनी ने सौम्या ला सांगितले. “ मला त्यांच्याशीच वैयक्तिक बोलायचं आहे,पण ते अगदी नसतीलच तर त्यांच्या हाताखालच्या वकिलाशी बोलेन .”सौम्या ने फोन लावला आणि पाणिनी ला खूण केली. “ ते येताहेत फोन वर.”पाणिनी ने तो उचलला. “ हॅलो अॅड.खांडेकर ,” ...अजून वाचा

8

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण-९)

दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण नऊ) वकिलांसाठी राखून ठेवलेल्या खोलीत पाणिनी पटवर्धन, आकृती समोर बसला होता.“ तू मला जे घडलंय ते सर्व च्या सर्व सांगितलं आहेस?” त्याने विचारले.“ एकूण एक गोष्ट सांगून झाल्ये माझी.” आकृती म्हणाली.“ ते तुझ्यावर आरोप पत्र ठेवताहेत. त्यांच्याकडे काहीतरी छुपा पुरावा आहे जो मला माहीत नाहीये.”“ त्यांच्याकडे काय पुरावा आहे मला माहीत नाहीये पण मला एकाच माहीत आहे की मी त्याला मारले नाही. माझ्याकडे सुरा असता तर मी त्याला नक्की मारला असता.” उद्वेगाने आकृती म्हणाली.‘’ अं हं असल काही उच्चारू सुध्दा नकोस ! तू पोलिसांना सर्व काही सांगितलस?”“ हो. मी खरे म्हणजे सांगणार नव्हते, म्हणजे सांगायला नको ...अजून वाचा

9

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१०)

प्रकरण दहा. दैविक दयाळ, सरकारी वकील, अॅड.खांडेकर यांचा मानस पुत्र समजला जायचा. तो कोर्टात उठून उभा राहिला. “ ऑनर, राज्य सरकार विरुद्ध आकृती सेनगुप्ता हा खटला उभा राहिलाय आणि ही फक्त प्राथमिक तपासणी आहे. हे पाहण्यासाठी की आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध होण्या एवढा पुरेसा पुरावा सरकार पक्षाकडे आहे का . सरकार पक्षातर्फे मी खटल्याचे काम पाहणार आहे. इथे आरोपी तर्फे पाणिनी पटवर्धन हजर आहेत. ते कामकाज सुरु करायला तयार आहेत असे मी समजतो.” “ आम्ही बचाव पक्ष तयार आहोत.” पाणिनी म्हणाला. “ आम्ही सरकार पक्ष तयार आहोत.” “ तर मग कामकाज सुरु करा.तुमचा पहिला साक्षीदार बोलवा.” न्यायाधीश कार्तिक भाटवडेकर म्हणाले. “ माझा पहिला साक्षीदार आहे, ...अजून वाचा

10

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -११)

दॅट्स ऑल युअर ऑनर (प्रकरण ११)“ माझा पुढचा साक्षीदार आहे, तुषार संघवी ” दैविक दयाळ ने जाहीर केले. “ लुल्ला रोलिंग कंपनीत रखवालदार म्हणून त्यांच्या पार्किंग च्या ठिकाणी आहेस? ” त्याच्या शपथा , ओळख वगैरे झाल्यावर दैविक ने विचारले. “ आणि आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या गाडया तपासण्याचे तुझे काम आहे?” “ आत येणाऱ्या गाड्याच फक्त.पण आम्ही बाहेर जाणाऱ्या गाड्यांवरही लक्ष ठेवतो.” “ या महिन्याच्या पाच तारखेला तू नोकरीत होतास? ” “ होतो.” “ तपन लुल्ला ला तू ओळखत होतास? ” “ वैयक्तिक ओळख नव्हती परंतु मालक या नात्याने तोंड ओळख होती.” “ त्यांची गाडी तुझ्या परिचित होती का? ” “ हो होती. “ पाच तारखेला संध्याकाळी तपन ला त्याच्या ...अजून वाचा

11

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण १२)

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण १२“ फेर तपासणी मधे काही विचारायचे आहे ? ” न्यायाधीशांनी दैविक दयाळ कडे बघून नाही विचारायचे काही.माझा पुढचा साक्षीदार आहे ओमकार केसवड ” दैविक दयाळ म्हणाला.ओमकार केसवड हा चाळीशीच्या घरातील , एक तरतरीत आणि सावध असा वाटणारा रुंद खांदे असणारा माणूस होता,त्याने शप्पथ घेतल्यावर दैविक ने त्याचा ताबा घेतला.त्याने साक्षीत सांगितले की ज्या जागेत खून झाला त्या पासून दोन किलोमीटर अंतरावर एका भाड्याच्या घरात तो राहतो.तो माळीकाम, आणि इतर झाडलोटीची कामे करत असे.एका जुनाट आणि पुरातन अशा गाडीतून तो ये जा करत असे.त्याला विशिष्ट अशी कामाची वेळ दिली गेली नव्हती पण कधी कधी तो ...अजून वाचा

12

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१३)

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण तेरा. पाणिनी पटवर्धन सौम्या सोहोनी ला घेऊन मैथिली आहुजा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये गेला.दारावरील बेल वाजवून सुद्धा दार उघडले गेले नाही. तेव्हा तो अपार्टमेंट च्या स्वगातिके कडे गेला. ती चांगली तरतरीत मुलगी होती.“ मला तातडीने मैथिली आहुजाला भेटायचं होत . पण ती दिसत नाहीये ”. पाणिनी म्हणाला.“ ती नाहीये .” ती मुलगी म्हणाली. “ तिला मी दुपारीच दोन मोठ्या सुटकेसेस घेऊन बाहेर पडताना पाहिलंय. बहुदा ती बरेच दिवसांसाठी जात असावी. तुम्ही तिच्या नोकरीच्या ठिकाणी चौकशी केली का? ’“ ती कुठे नोकरी करते ,माहित्ये का तुम्हाला?” पाणिनी ने विचारले.“ कुठल्या तरी खाजगी कंपनीत ती सेक्रेटरी आहे म्हणे.पण नाव ...अजून वाचा

13

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१४)

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण चौदासकाळी दहाला अर्धा मिनिट बाकी असतानाच अॅड.खांडेकर लांब टांगा टाकत कोर्टात आले आणि कडे शिष्ठाचार म्हणून ओळखीचा कटाक्ष टाकून आपल्या सहकाऱ्याशेजारी म्हणजे दैविक दयाळ शेजारी बसले. न्या.भाटवडेकर स्थानापन्न झाले.अॅड.खांडेकर ना कोर्टात बघून त्यांना आश्चर्यच वाटले. “ तुमचे काही काम होते का अॅड.खांडेकर ? ” त्यांनी विचारले. “ नाही नाही.मी फक्त खटला ऐकायला आलोय. ” ते म्हणाले. पण न्यायाधीशांचे या उत्तराने समाधान झाले नाही. “ मला नवल वाटतय, हा अत्यंत साधा खटला आहे, प्राथमिक सुनावणी आहे. आणि जवळ जवळ संपताच आला आहे.अगदी एखादी दुसरी साक्ष बाकी आहे.” “ ते काहीही असले तरी मी बसतो आहे कोर्टात.मी कोर्टाला सांगू ...अजून वाचा

14

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१५)

दॅट्स ऑल युअर ऑनर प्रकरण १५इन्स्पे.तारकर आत्मविश्वासाने पिंजऱ्यात आला. त्याचा देह बोलीवरून त्याने साक्ष देण्यासाठी आणि पटवर्धन च्या उलट साठी चांगलीच तयारी केली असावी असे जाणवत होते. “ तू आधीच शप्पथ घेतली आहेस तेव्हा पुन्हा घेण्याची गरज नाही.” दैविक दयाळ म्हणाला, “ काल संध्याकाळी तुला देवनार येथील मैथिली आहुजा राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये जाण्याचा योग आला.? ” “ हो सर्.” “ त्यापूर्वी पुरावा म्हणून कोर्टात सादर झालेला ड्रेस, जो एका विशिष्ठ ठिकाणी फाटला होता, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलास का? ” “ “ काय केलेस तू?” “ मी दोन गोष्टी केल्या, एक म्हणजे, तो पोषाख ज्या दुकानातून खरेदी केला होता त्याचा शोध घेतला. तो देवनार मधूनच ...अजून वाचा

15

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१६)

दॅट्स ऑल युअर ऑनर -१६“ पण पटवर्धन हे आरोपीचे वकील आहेत.तिच्याच वतीने ते काम बघत आहेत.म्हणजे त्यांची उपस्थिती आरोपीची उपस्थिती असल्या सारखीच आहे.” दैविक दयाळ म्हणाला. “ मी माझा आदेश दिलाय. ” न्या.भाटवडेकर म्हणाले. अॅड.खांडेकर उठून उभे राहिले. ते एकदम जाड जुड आणि भरदार शरीर यष्टीचे होते. दमदार आवाजात ते म्हणाले, “ कोर्ट माझं म्हणणे ऐकून घेईल का? ” “ बोला.” न्या.भाटवडेकर म्हणाले. “ हे गंभीर प्रकरण आहे आणि अचानक उद्भवले आहे त्यामुळे आम्हाला या बाबतीत न्यायालयाने दिलेले निवाडे वानगी दाखल देण्यासाठी वेळ मिळाला नाही परंतु माझी खात्री आहे की पटवर्धन आणि आरोपीचे परस्पर संबंध हे एजन्सी म्हणजे प्रतिनिधी या व्याख्येत बसणारे आहेत ...अजून वाचा

16

दॅट्स ऑल युअर ऑनर - (प्रकरण -१७)

दॅट्स ऑल युअर ऑनर- १७“ कोणालाच नाही.” इन्स्पे.तारकरम्हणाला.“ का sssय ” पाणिनी उद्गारला.उत्तर ऐकून पाणिनी पटवर्धन आश्चर्याने उडालाच. होणे शक्यच नव्हते. जर मयत तपन च्या अंगावर असणारे कपडे आणि बूट कोरडे होते तर त्याचा अर्थ त्याने कोरडे कपडे आणि बूट या दोन्ही गोष्टी त्याने मागवून घेतल्या असल्या पाहिजेत.आणि फोन केल्या शिवाय त्या आणून कोण देणार? आणि तारकर तर म्हणतो की कोणालाच फोन केले गेले नव्हते.इन्स्पे.तारकर खोटे बोलत नाही कधीच याची पाणिनी ला खात्री होती.मग हे कसे संभव आहे?“ अर्थात आम्ही येणारे फोन नाही बघू शकलो पण तिथून बाहेर गेलेला एकमेव फोन म्हणजे,लुल्लाकंपनीच्या ऑफिस मधे केलागेलेला फोन.”इन्स्पे.तारकरम्हणाला.“ किती वाजता केला ...अजून वाचा

17

दॅट्स ऑल युअर ऑनर - १८ - (शेवटचे प्रकरण)

दॅट्स ऑल युअर ऑनर -१८ (शेवटचे प्रकरण)या निकाला नंतर आकृती ,सौम्या कनकओजस पाणिनी पटवर्धन बरोबर त्याच्या ऑफिसात बसले.आकृती आनंदाने वेडी व्हायचीच बाकी होती.आपल्या डोळ्यातून अश्रूंना मोकळे पणाने वाट करून देत होती.सौम्या तिला प्रेमाने थोपटत होती.“ चला , एक प्रकरण संपले ! ” पाणिनी उद्गारला.“ तुमच्या दृष्टीने अनेक खटल्यातला एक खटला संपला पण माझ्या दृष्टीने एक नवी सुरुवात झाली आहे.नव्या जीवनाची सुरुवात.” आकृती म्हणाली.“ पाणिनी काय झालं नक्की ? बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत.”ओजसम्हणाला. “ म्हणजे मैथिली पूर्वीच अभिज्ञा बोरा कशी पोचली तिथे.आणि मैथिली आधी पोचली असती तर काय बदल झाले असते ?”“ साधे आणि सोपे आहे.” पाणिनी म्हणाला “ मैथिली हुशार ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय