या कथेतील सर्व पात्र प्रसंग घटना आणि कथानक हे संपूर्णपणे काल्पनिक असून . त्याचा वास्तवाशी किंवा दुसऱ्या कोणत्याही भाषेतील कथे तील पात्र प्रसंग व घटना यांच्याशी संबंध नाही तसा तो आढळल्यास तो योगायोग समजावा या कथेचे हक्क माझ्या कडे आहेत,अन्य कोणी माझ्या पूर्व परवानगी खेरीज कोणत्याही माध्यमातून ही कथा प्रसिद्ध करू नये. **प्रकरण एक.रात्री बारा वाजता पाणिनी पटवर्धन चा खाजगी फोन अचानक खणखणला पाणिनी त्यावेळी आपल्या घरी गाढ झोपेच्या अंमलाखाली होता, बाहेर पाऊस म्हणजे ‘मी’ म्हणत होता. त्यातून पाणिनी चा हा फोन नंबर म्हणजे स्वतः पाणिनी पटवर्धन व्यतिरिक्त फक्त सौम्या सोहोनी, कनक ओजस, यांनाच माहीत होता, अन्य

Full Novel

1

ॲ लि बी. ( प्रकरण १ )

ॲलिबी ( प्रकरण १)* या कथेतील सर्व पात्र प्रसंग घटना आणि कथानक हे संपूर्णपणे काल्पनिक असून . त्याचा वास्तवाशी दुसऱ्या कोणत्याही भाषेतील कथे तील पात्र प्रसंग व घटना यांच्याशी संबंध नाही तसा तो आढळल्यास तो योगायोग समजावा या कथेचे हक्क माझ्या कडे आहेत,अन्य कोणी माझ्या पूर्व परवानगी खेरीज कोणत्याही माध्यमातून ही कथा प्रसिद्ध करू नये. **प्रकरण एक.रात्री बारा वाजता पाणिनी पटवर्धन चा खाजगी फोन अचानक खणखणला पाणिनी त्यावेळी आपल्या घरी गाढ झोपेच्या अंमलाखाली होता, बाहेर पाऊस म्हणजे ‘मी’ म्हणत होता. त्यातून पाणिनी चा हा फोन नंबर म्हणजे स्वतः पाणिनी पटवर्धन व्यतिरिक्त फक्त सौम्या सोहोनी, कनक ओजस, यांनाच माहीत होता, अन्य ...अजून वाचा

2

ॲ लि बी. ( प्रकरण २ )

ॲलिबीप्रकरण २.(©अभय बापट)पाणिनी पटवर्धन झपाट्याने ऑफिस मधे आला तेव्हा सौम्या सोहोनी टपालातून आलेली पत्रे बघत होती.“ तुम्ही चक्क लौकर आज.” ती म्हणाली.“ मी आजची वर्तमान पत्रे जरा बारकाईने पाहण्यासाठी आलोय लौकर.”“ वर्तमान पत्रांचे काय?”“ काल मध्यरात्री नंतर मला रिटेनर म्हणून दोन हजाराच्या दोन नोटा आणि आणखी एका नोटेचा एक तुकडा मिळाला.एका बुरखाधारी स्त्री बरोबर माझी उत्कंठावर्धक अशी भेट झाली.आणि तिच्या बरोबरचा तो माणूस. सतत काहीतरी काळजीत असल्यासारखा होता.त्याने सांगितलं की आजच्या वर्तमान पत्रात काहीतरी सनसनाटी बातमी आहे.”“ आणि तुम्हाला ती सापडली नाहीये असंच ना?” सौम्या ने विचारले.“ खरं म्हणजे मी ती बघितली नाहीये.” “ कामातच सगळा दिवस निघून जातो.”“ ...अजून वाचा

3

ॲ लि बी. ( प्रकरण ३ )

ॲलिबीप्रकरण ३आपल्या कॉटवर पाणिनीआडवा पडून वाचत होता.कंटाळून दिवे बंद करण्याच्या विचारात होता तेव्हाच फोन वाजला, कपाळाला आठ्या पडून त्याने उचलला, तर सौम्या चा आवाज आला.“ हॅलो सर, संध्याकाळच्या पेपर चं काय?“ काय त्याच्या बद्दल?” -पाणिनी” म्हणजे तुम्ही वाचला का तो?” -सौम्या “ नुसतीच नजर टाकली त्यावरून.काय विशेष?” –पाणिनी“अमर हुबळीकर हॉस्पिटल ची हिशोब पुस्तके तपासण्यासाठी ऑडीटर ची नेमणूक केली गेली आहे.हुबळीकर कुटुंबातील एकाने हॉस्पिटल च्या संचालकांवर गैर कारभाराचा आरोप केलाय.देणगी पोटी मिळालेले निधी एका ट्रस्ट मध्ये आणले जातात आणि त्याचे ट्रस्टी आहेत,अजित टोपे.राजेंद्र पळशीकर आणि प्रकाश पसरणीकर.” सौम्या ने उत्तर दिले.पाणिनी थोडा वेळ विचारात गुंतला.” जेव्हा पळशीकर म्हणाला की उद्याच्या पेपरात ...अजून वाचा

4

ॲ लि बी. (प्रकरण ४)

ॲ लि बी भाग ४कनक ला घेऊन पाणिनी शहराच्या दक्षिण बाजूला असलेल्या टेकडी च्या दिशेने गाडीने चालला होता.पुढे आठ –दहा बंगली वजा घरांचा समूह दिसायला लागला.” या पैकीच एक बंगला असणार” ओजस म्हणाला.पाणिनीने अनुक्रमांक पाहिले आणि म्हणाला,” या रांगेतला शेवटचा दिसतोय. .. हाच तो.”बंगल्याचे तोंड आग्नेय दिशेला होते.त्याच्या वरील बाजूला पश्चिमेकडे टेकडीचे टोक दिसत होते तर पूर्वे कडे खालील बाजूस शहर पसरले होते, पांढऱ्या इमारतींवर सूर्य किरणे पडून त्या चमकत होत्या.वर तिरके लाल छत आणि त्याखाली स्वच्छः पांढऱ्या आणि उन्हात चमकणाऱ्या भिंती असे मनोहर दृष्य होते.घराची घंटा वाजवण्यापूर्वी पाणिनीने ते दृष्य मनात साठवून ठेवले.त्या प्लॉट चे जिथे दोन भाग ...अजून वाचा

5

ॲ लि बी. (प्रकरण ५)

ॲलिबी प्रकरण ५प्रकरण ५दुसऱ्या दिवशी पाणिनी पटवर्धन ऑफिसात आला तेव्हा सौम्या सोहोनी दारातच त्याची वाट बघत होती.“ माझ्या साठी विशेष वाढून ठेवलंय का पुढे?” पाणिनी ने तिचा अविर्भाव बघून संशयाने विचारले.“ मिसेस मिसेस टेंबे आणि गेयता बाब्रस.” –सौम्या.“ त्याच्या बरोबरची भेटीची वेळ दुपारी दोन ची होती ना पण ! “ –पाणिनी“ मला माहित्ये ते, पण त्या दोघी काहीतरी ठरवूनच आल्या आहेत. मनाशी. त्या म्हणताहेत की काही झालं तरी त्यांना भेटायचच आहे तुम्हाला., तुम्ही मला आज जेवायला नेणार होतात बाहेर त्यामुळे मी त्यांना कटवायचा प्रयत्न केला पण त्या हलायला तयार नाहीत, सारखी नखं कुरतुडत आणि पुटपुटत बसल्येत.”“ ती मुलगी कशी ...अजून वाचा

6

ॲ लि बी. (प्रकरण ६)

ॲलिबी भाग ६प्रकरण ६पाणिनी पटवर्धन ऑफिस मधे आला तेव्हा ओजस दारातच त्याची वाट बघत होता. काहीतरी महत्वाचे असणार हे पाणिनी ने हाताला धरून त्याला आत घेऊन मानेनेच काय ते पटकन सांग असे सुचवले.“ पळशीकर गायब आहे, ना पोलीस त्याला शोधू शकले, ना मी. हॉस्पिटल च्या व्यवहारात टोपे बरोबर त्याच्याही चेक वर सह्या होत्या त्यामुळे त्यांना तो हवाय.” – ओजस“ त्याच्या मैत्रिणी बद्दल काय कळले का?” -पाणिनी“ काहीच नाही.”“ बर, तुला अजून एक काम देतो.माझ्या पेपरातल्या जाहिरातीला उत्तर देण्यासाठी कोणीतरी पेपर च्या ऑफिस ला येईल. तिथे एक तुझा हेर पेरून ठेव.आणि जो येईल त्याचा पाठलाग करायला त्याला सांग.”आणखी एक काम. ...अजून वाचा

7

ॲ लि बी (प्रकरण ७)

अॅलिबीभाग ७.ऑफिस मधे सौम्या त्याची वाटच बघत होती. “ कशी झाली मिटींग?” तिने पाणिनी आत येताच विचारले.“ त्या ब्रोकर मी चांगलंच काळजीत टाकलंय. आता तेच इन्स्पे.होळकर वर दबाव टाकतील टोपे च्या मृत्युची पूर्ण चौकशी करायला. आणि त्वरित करायला.”-पाणिनी“ मस्त झालं. बर कनक चा फोन येऊन गेला, तुम्हाला फोन करायला सांगितलाय त्याने. लाऊन देऊ का?”“ हो, दे जोडून.”“ पाणिनी, तू मला एक काम दिले होतेस. तुझ्या जाहिरातीला उत्तर द्यायला वर्तमान पत्राच्या ऑफिस मधे एक मुलगी गेली होती. तिथे एक पाकीट देऊन पुढे एका ब्युटी पार्लर मधे गेली आहे. माझा हेर तिच्या मागावर तिथेच बाहेर थांबलाय. तुला तिच्याशी बोलायचं असेल तर ...अजून वाचा

8

ॲ लि बी. (प्रकरण ८)

ॲलिबी ( भाग ८): प्रकरण ८आदिती हुबळीकर ला भेटून काहीच निष्पन्न न झाल्याने पाणिनी वैतागूनच ऑफिस मधे परत आला काय झालं ते जाणून घेण्यासाठी सौम्या ने त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली.त्याने तिला सर्व इत्यंभूत सांगून टाकलं.“ ओजस सांगत होता की त्याची माणसे टेंबे बाईच्या मागावर होती, त्यातून ते तुम्हाला अपेक्षित असलेल्या, माणसा पर्यंत म्हणजे अनाथाश्रमाच्या सेक्रेटरी पर्यंत पोचले. आदिती हुबळीकर ने ब्युटी पार्लर मधे जाण्यापूर्वी , आपल्या जाहिरातीला जे उत्तर पेपरवाल्यांना देण्यासाठी दिले होते त्याची प्रत ओजस ने मिळवली आहे.” सौम्या ने माहिती पुरवली.“ काय लिहिलंय उत्तरात? ” - पाणिनी“ परिस्थितीत बदल नाही. सध्या मुलाखत करणे किंवा भेटणे शहाणपणाचे नाही.तुम्ही ...अजून वाचा

9

ॲ लि बी. (प्रकरण ९)

ॲलिबी भाग ९: प्रकरण ९पाणिनी पटवर्धन, पळशीकर रहात असलेल्या अपार्टमेंट च्या बाहेर टॅक्सीतून उतरला. दोन मोठाल्या सुटकेसेस ड्रायव्हरने डिकी काढून खाली ठेवल्या. पाणिनी ने त्याला मीटर चे भाडे आणि टिप म्हणून आणखी थोडे पैसे देऊन खुश केले.त्याच्या सुटकेसेस वर डझन भर वेगवेगळया देशांचे आणि विमान कंपनीचे स्टीकर होते. एकंदरीत त्याचा अवतार मोठा प्रवास करून आलेल्या प्रवाशा सारखा दिसत होता. एक जाड माणूस टेबल खुर्ची मांडून बसला होता पेपर वाचनातून त्याने पाणिनी कडे पाहिले आणि पुन्हा पेपरात डोके खुपसले. “ मी इथे २ महिन्यासाठी रहायला आलोय. साधारण दहाव्या मजल्या पर्यंत मला जागा हवी आहे.कितीही भाडे असेल तरी चालेल., दुसरी गोष्ट, ...अजून वाचा

10

ॲ लि बी. - (प्रकरण १०)

ॲलिबीप्रकरण १०टोपे चा सेक्रेटरी मंदार याने दारावर टकटक झाली म्हणून दार उघडले.दारात पाणिनी पटवर्धन ला बघून तो उडालाच ! अरे पटवर्धन तुम्ही? या आत या. काय विशेष काम काढलंत?”“ मी कोणाची नावे घेत नाही पण असं म्हंटल जातंय की शेअर चा व्यवहार ब्रोकर च्या ऑफिस मधून केल्यावर तू टोपे च्या केबिन मधे गेलास, तिथे त्याने तुझ्यावर आरोप केला की तुझा या व्यवहारात वैयक्तिक स्वार्थ होता, तुमचं त्यामुळे भांडण झालं आणि त्यात तू त्याचा खून केलास.”“ हे हास्यास्पद आहे.”“ म्हंटल तुला या गोष्टीची आधी कल्पना दयावी म्हणजे तू स्वतःची भूमिका स्पष्ट करू शकशील.”“ पाहिली गोष्ट म्हणजे मी ब्रोकर च्या ऑफिसातून ...अजून वाचा

11

ॲ लि बी. - (प्रकरण ११)

ॲलिबी (प्रकरण ११): प्रकरण ११पाणिनी पटवर्धन शुक्रवारी सकाळी ऑफिस ला आला तेव्हा त्याच्या टेबल वर टपालातून पत्र आले होते सौम्या ने त्याला सांगितलं की टेंबे बाई ऑफिस मध्ये त्याची आतूर होऊन वाट बघत्ये.पाणिनी ने पत्रातला मजकूर वाचला. पत्र आदिती हुबळीकर ने पाठवले होते. त्याचा मजकूर असा होता.संबंधित व्यक्तींशी संपर्क झाला आहे. आज पर्यंत ज्या ज्या घटना घडल्या आहेत,त्यात काळजीचे कारण नाही. पुढे काम चालू राहू दे.पाणिनी ने कागत खिशात टाकला. “ सौम्या, त्या बाई ला आत बोलव काय म्हणायचयं तिला ते ऐकू आणि वाटेला लावू.”“ कसे आहात पटवर्धन तुम्ही?” आत येत असतानाच ती म्हणाली. ” काय विशेष अस शोधून ...अजून वाचा

12

ॲ लि बी. - (प्रकरण १२)

अॅलिबीप्रकरण १२“ सर. मिसेस टोपे ला तुम्ही पेपरात आलेल्या त्या बातमी बद्दल का नाही सांगितले? “ – सौम्या“ कोणती ““ पळशीकर चा कोट गाडीत सापडल्याची.”“ ते मी इन्स्पे.होळकर वर सोपवल आहे.”“ तो तिला फार मोठा धक्का ठरेल., तुम्ही तिला अप्रत्यक्ष रित्या सुचवायला हवं होत की हा एक सापळा असल्याचे कानावर येतंय.”“ नाही, नाही.”“ का बरं ?”“ ती सापळा खरे तर आदिती साठी रचला होता. पळशीकर जेथे कुठे असेल तर बाहेर येईल किंवा मेला असेल तर कोणीतरी बोलेल हा हेतू होता. तो जर मिसेस टोपे चा सहारा घेऊन लपला असेल तर ती बोलेल.”“ तो तिच्या आधारावर लपला असेल खरंच?’’ सौम्या ...अजून वाचा

13

ॲ लि बी. - (प्रकरण १३)

अॅलिबी प्रकरण १३पाणिनी पटवर्धन ने ऑफिस मध्ये प्रवेश केला आणि सौम्या सोहनी ला म्हणाला, स्वागत कक्षात जाऊन गतीला सांग आलोय पण आज कोणालाच भेटणार नाहीये.”सौम्या बाहेर जाऊन आत आली आणि आपल्या ओठावर बोट ठेऊन गप्प बसण्याची खूण करत पाणिनी ला म्हणाली,” आधीच एक माणूस येऊन बसलाय पण तो आपले नाव सांगायला तयार नाहीये.”“ कोण आहे तो ? ““गती ने खूप आग्रह धरला पण तो तिला बाजूला सारून तुमच्या लायब्ररी मध्ये बसला जाऊन.”“ तो राजेंद्र पळशीकर असणार.” पाणिनी ने अंदाज व्यक्त केला.आणि उठून लायब्ररीत त्याला भेटायला गेला.त्याला बघून पळशीकर उभा राहिला. “ पटवर्धन काय घडलंय हे? माझा कोट रक्तबंबाळ अवस्थेत ...अजून वाचा

14

ॲ लि बी. - (प्रकरण १४)

अॅलिबीप्रकरण १४पाणिनी पटवर्धन इन्स्पे.होळकर बरोबर पोलीस चौकीत पोचला.बघतो तर कनक ओजस आधीच एका पोलिसा बरोबर तिथे बसलेला दिसला.पाणिनी आश्चर्याने झाला. “ कनक काय भानगड आहे ही ? तू इथे कसा? ““ या घटके पर्यंत तरी मला कोणी काही सांगितलं नाही.” ओजस म्हणाला आणि जागे वरून उठून पाणिनी कडे गेला.“ चल, पाणिनी, सरकारी वकील वाट बघताहेत आत.” इन्स्पे.होळकर म्हणाला.ओजस पाणिनी जवळ येऊन म्हणाला, ” पाणिनी त्यांनी काहीही सांगू दे, पण मी तुझ्याच बाजूने आहे. तू काही गोष्टी वाकड्या पद्धतीने केल्या आहेस अशी माझी समजूत मी कोणालाही करू देणार नाही.” असे बोलून त्याने पाणिनी च्या हातात हात मिळवले आणि कोणाच्याही नकळत ...अजून वाचा

15

ॲ लि बी. - (प्रकरण १५) - शेवटचा भाग

अॅलिबीप्रकरण १५ ( शेवटचे प्रकरण.)पाणिनी पटवर्धन त्याच्या ऑफिस मधे, केबिन मधे फिरत्या खुर्चीत आरामात बसला होता.समोर इन्स्पे.होळकर होता. “ वेळेला माझ्या हातात तुझ्या अटकेचे वॉरंट आहे. ““ मला वाटत नाही की खांडेकर ना ते द्यायची इच्छा असेल,.” – पाणिनी.“ परत एकदा विचार कर पाणिनी, पूर्ण तयारीत आहोत आम्ही .”“ मोकाशी ने स्वतःच्या सही चा कबुली जबाब वर्तमान पत्राच्या संपादकांकडे स्वतः जाऊन सादर केलाय “ – पाणिनी.“ ही काय नाटकं आहेत पाणिनी ? तयारी कर, जायचयं आपल्याला , माझ्या हातात तुझ्या अटकेचे वॉरंट आहे. ““ ते शब्द उच्चारून झालेत तुझे मगाशी., मला नेलंस तर तूच अडचणीत येशील.” – पाणिनीपाणिनी ने ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय