बाबा माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले, पाणी विसरले म्हणून ताट तिथेच ठेवून पाणी आणायला गेले आणि नेमका हेमंत आत आला. त्याला बघितले .... ताट हातात घेऊन त्याला जोरात फेकून मारले. हेमंतचा जोरात ओरडण्याचा आणि ताट पडल्याचा आवाज ऐकून सगळेच आत धावत आले. हेमंतला कपाळाला खोच आलेली बघून काकू एकदम पिसाळल्या,"एकतर काही बोलत नाहीये. घुम्यासारखी बसून राहिली आहे, वर हेमंतला ताट फेकून मारते...." त्यांना जास्त बोलू न देता काकूंच्या हाताला धरून आज्जी त्यांना बाहेर घेऊन गेल्या. इतकावेळ स्तब्ध होऊन उभा राहिलेला हेमंतपण लगेच बाहेर पळाला. आईबाबा माझ्या जवळ येऊन बसले नि माझा सगळा बांध सुटला. मी जोरजोरात रडायला लागले. रडताना नेहमी शांत करणारे बाबा ह्यावेळी मात्र थोडे आनंदी झाले होते. खूपवेळ रडून मी हळूहळू शांत झाले. हळूहळू गोळीचा असर होऊन मी झोपी गेले. थोड्यावेळाने जाग आली आणि मला माझा भूतकाळ डोळ्यासमोर आला.

नवीन एपिसोड्स : : Every Wednesday

1

अश्रुतपुर्व - 1

बाबा माझ्यासाठी जेवणाचे ताट घेऊन आले, पाणी विसरले म्हणून ताट तिथेच ठेवून पाणी आणायला गेले आणि नेमका हेमंत आत त्याला बघितले .... ताट हातात घेऊन त्याला जोरात फेकून मारले. हेमंतचा जोरात ओरडण्याचा आणि ताट पडल्याचा आवाज ऐकून सगळेच आत धावत आले. हेमंतला कपाळाला खोच आलेली बघून काकू एकदम पिसाळल्या,"एकतर काही बोलत नाहीये. घुम्यासारखी बसून राहिली आहे, वर हेमंतला ताट फेकून मारते...." त्यांना जास्त बोलू न देता काकूंच्या हाताला धरून आज्जी त्यांना बाहेर घेऊन गेल्या. इतकावेळ स्तब्ध होऊन उभा राहिलेला हेमंतपण लगेच बाहेर पळाला. आईबाबा माझ्या जवळ येऊन बसले नि माझा सगळा बांध सुटला. मी जोरजोरात रडायला लागले. रडताना नेहमी ...अजून वाचा

2

अश्रुतपूर्व - 2

घरीच खूप मोठा दिवाणखाना असल्याने तिथेच सगळ्यांचे साखरपुडा व बारसे झाले होते अर्थात माझे बारसेपण तिथेच होणार होते. आता दिवशी काय नाव ठेवायचे हे ठरवल्यानंतर जेवणाचा बेत, अजून कुठली तयारी करायची, कोण काय काम करणार हे सगळे ठरवणे सुरु झाले होते. आपापल्या कामाची प्रत्येकाने यादी करून जेवण करून सगळे घरी परतले. घरी माझ्या पिढीत शेवटचेच बारसे असल्याने जोरदार तयारी केली होती. जवळपास २००-२५० जण बारश्यासाठी आले होते. सगळीकडे उत्साह पसरला होता. मला काकू व मावशीने खूप छान तयार केले होते. नीलूआत्या माझे नाव ठेवणार होती. एक नाव ठरलेले असल्याने बाकीची ४ नावे आईने सुचवली होती तेव्हा तिने आईला,”तू तीन ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय