अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता , सकाळचे पाच - साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती, तो जिथे झोपायचा त्या घराच्या ओसरीला लागुनच एक सार्वजनिक नळ होता सकाळी सर्व वस्ती तिकडे येऊन पाणी भरायची, तिकडे त्यांची कलकल , भांडण , पण ह्याला मात्र जणू ते नेहमी होत, त्याला त्यातही गाढ झोप लागलेली असायची. शेजारी त्याच घर होत सहा वाजले कि आई त्याच्या नावाचा सपाटा सुरु करायची " बाबू , ए बाबू , शाळेत जायचय न तुला चल उठ , बास झाली झोप, आईच्या जवळपास दहा हाका ऐकल्यानंतर बाबू एकदाची कूस बदलून अंगावरच पांघरून काढून उठून बसायचा, उठल्या उठल्याच त्याला समोरच्या नळावर पाणी भरणारी बायडा दिसायची जवळपास त्याच्याच वयाची पण ती शाळेत जायची नाही , नळावर पाणी भरायला सकाळी सकाळी आलेली, तिचा नंबर यायची वाट बघत तंबाखू मळत उभी होती , खांद्यावर शाल लपेटलेल्या सारखा एक जुनेरसा टॉवेल आणि सतत गळणार नाक , बाबू ला तिचा प्रचंड राग यायचा त्याला ती त्याच्या घरात आलेली पण चालच नाही, तो तिच्याकडे उगीच रागाने पाहतच उठला , आणि अर्वारायला घरात निघून गेला.

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday, Friday & Sunday

1

वेगळा - भाग १

भाग – १ अंगाच मुटकुळ करून बारा-तेरा वर्षाचा मुलगा एका पडलेल्या घराच्या ओसरीतअगदी डोक्या पर्यंत पांघरून घेऊन झोपला होता सकाळचे पाच - साडेपाच वाजले होते , वस्तीला बऱ्याच प्रमाणात जाग आली होती, तो जिथे झोपायचा त्या घराच्या ओसरीला लागुनच एक सार्वजनिक नळ होता सकाळी सर्व वस्ती तिकडे येऊन पाणी भरायची, तिकडे त्यांची कलकल , भांडण , पण ह्याला मात्र जणू ते नेहमी होत, त्याला त्यातही गाढ झोप लागलेली असायची. शेजारी त्याच घर होत सहा वाजले कि आई त्याच्या नावाचा सपाटा सुरु करायची " बाबू , ए बाबू , शाळेत जायचय न तुला चल उठ , बास झाली झोप, आईच्या ...अजून वाचा

2

वेगळा - भाग २

भाग -२ जवळ जवळ पंधरा दिवस बाबूचा पाय हा बांधलेल्या अवस्थेतच होता, त्या काळात बायडा दोन तीन वेळा घरी त्याची विचारपूस करून गेली, ती घरी येई तेव्हा बाबू जागा असला तरी झोपेचे सोंग घेऊन नुसता पडून राही, मग ती त्या आईकडे किंवा बहिणीकडे चौकशी करून निघून जाई, एक दिवस मात्र जेव्हा ती घरी आली तेव्हा बाबू खाटेवर चहा पीत बसला होता , तेव्हा त्याला कुठे तोंड लपवू अस झाल होत , पण आता तिच्याशी बोलण्या शिवाय काही पर्याय न्हवता., बायडा तो जागा आहे हे पाहून त्याच्या जवळ जाऊन बसली आणि त्याच्या दुखावलेल्या पायाला नकळत तिने हात लावला, बाबू वैतागतच ...अजून वाचा

3

वेगळा - भाग ३

भाग ३ दुसर्या दिवशी शाळा सुटल्यावर ठरल्याप्रमाणे बाबू अशोकला भेटला ,घरी जाताना अशोक ने बाबुला विचारल , “आज संध्याकाळी भेटशील मला ?” “ भेटेन कि , काही काम होत का “ बाबूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होत. “हो , जरा एका ठिकाणी येशील माझ्या सोबत ,माझे घरचे मला एकट्याला पाठवायचे नाहीत , म्हणून तुला विचारतोय “ “ बर , पण नक्की जायचय कुठे , कारण मला देखील घरी सांगाव लागेल आईला “ बाबू म्हणाला. “अस आहे का , आईला सांग दत्त मंदिरात जातोय म्हणून, ठीक आहे , संध्याकाळी भेटू मग “ अस म्हणून अशोक लगबगीने त्याच्या घराकडे निघून गेला. संध्याकाळी बाबू ...अजून वाचा

4

वेगळा - भाग ४

भाग - ४ नेहमी प्रमाणे बाबू शाळेत अशोकला भेटत होता , आणि कधी कधी तो त्याची इच्छा नसताना देखील सोबत डोंगरावर जाई, त्याला कळत नसे हे दोघ इतक्या लांब येऊन का भेटतात ते पण चोरून काय गरज असेल , आणि मुळात मला लांब का बसवतात , एकदा बाबू असाच अशोक सोबत गेला असताना बराच वेळ अशोक आणि सरिता बोलत बसले होते , बाबुला बसून बसून पाठीला रग लागली म्हणून तो उठला त्याने त्याचे दोन्ही हात वर ताणून धरले आणि त्याच वरच शरीर उजव्या बाजूला ताणल आणि अचानक त्याच लक्ष अशोक आणि सरिता कडे गेल , आणि पाहतो तर काय ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय