लग्नाअगोदर आणि लग्नानंतर

(10)
  • 24.5k
  • 1
  • 12k

खूप दिवसांनी , नाही नाही खूप वर्षांनी आम्हा मैत्रिणींची चांडाळ-चौकडी आज भेटली होती. कॉलेजपासूनची आमची चौघींची मैत्री.त्यावेळच्या आमच्या उचापती बघून आम्हाला चांडाळ-चौकडी हे नाव पडलं होतं.. धम्माल करायचो आम्ही कॉलेज मध्ये असताना.. कॉलेज विश्व संपलं आणि प्रत्येकीचा मार्गही बददला.. भेटणं खूपचं कमी झालं.पण आम्ही फोन वरती आणि व्हिडिओ कॉल्सवरती नेहमी एकमेकींच्या संपर्कात असायचो.त्या फोनरुपी भेटीला समोरासमोर मारलेल्या गप्पांची सर थोडीच येणार ! तरीही आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घ्यायचो.. एक दिवस मात्र नीलाचा फोन आला.." स्वाती मी ,राधा आणि मीनाला फोन करून सांगितलं आहे की आपण पुढच्या महिन्यात दोन दिवस वेळ काढून भेटतोय. त्यांनी अगोदर थोडे आढेवेढे घेतले पण मी कोणाचंही ऐकलं नाही.." "अरे यार ! किती वर्षे आपली भेट नाही आणि मी तुम्हाला महिनाभर आधी सांगतेय.मला काही कारणं सांगू नका. आपण नक्की भेटतोय.." शेवटी नीलाच ती.. मीही हसत हसत ओके म्हणून ग्रीन सिग्नल दिला..

Full Novel

1

लग्नाअगोदर आणि लग्नानंतर - भाग १

खूप दिवसांनी , नाही नाही खूप वर्षांनी आम्हा मैत्रिणींची चांडाळ-चौकडी आज भेटली होती. कॉलेजपासूनची आमची चौघींची मैत्री.त्यावेळच्या आमच्या उचापती आम्हाला चांडाळ-चौकडी हे नाव पडलं होतं.. धम्माल करायचो आम्ही कॉलेज मध्ये असताना..कॉलेज विश्व संपलं आणि प्रत्येकीचा मार्गही बददला.. भेटणं खूपचं कमी झालं.पण आम्ही फोन वरती आणि व्हिडिओ कॉल्सवरती नेहमी एकमेकींच्या संपर्कात असायचो.त्या फोनरुपी भेटीला समोरासमोर मारलेल्या गप्पांची सर थोडीच येणार ! तरीही आम्ही दुधाची तहान ताकावर भागवून घ्यायचो..एक दिवस मात्र नीलाचा फोन आला.." स्वाती मी ,राधा आणि मीनाला फोन करून सांगितलं आहे की आपण पुढच्या महिन्यात दोन दिवस वेळ काढून भेटतोय. त्यांनी अगोदर थोडे आढेवेढे घेतले पण मी कोणाचंही ऐकलं ...अजून वाचा

2

लग्नाअगोदर आणि लग्नानंतर - भाग २

सगळ्यात अगोदर मी तिच्या नकळत सतीशला भेटायचं ठरवलं.. कोणत्याही नाण्याला दोन बाजू असतात आणि असे प्रॉब्लेम्स हल्ली बऱ्याच जणांना वेळी विचारविनिमय करून मग त्यावर सल्ला देणं कधीही चांगलं..सतीश माझाही कॉलेज मित्र असल्याने सहज एकदा वाट वाकडी करून त्याच्या ऑफिसमध्ये गेले.. आमचे साहेब कामात एकदम गढून गेले होते.. मला बघितल्यावर , अगं इकडे कुठे तू ??आले सहज, मित्राला भेटायला अपॉइंटमेंट लागते का ?? मी हसत हसत विचारलं..अगं असं नाही ...You are most welcome..इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या..मग तोच म्हणाला, कशी झाली तुमची ट्रीप .नीला खुश आहे आल्यापासून.सतीश, मला थोडं पर्सनल बोलायचं आहे. येथे बोलू शकतो का की बाहेर जाऊया ?त्याने थोडा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय