"गळफास लावून नववधूची आत्महत्या!" या घटनेने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले! कारण ती नववधू दुसरी तिसरी कोणी नसून एका प्रतिष्ठित माजी कॅबिनेट मंत्र्याची सून होती. पण त्यांना यावर्षी तिकीट देण्यात न आल्यामुळे ते राजकारणातून बाहेर पडले होते. घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. बाहेर लोकांची गर्दी जमली, तर काही लोकं समूहात कुजबुज करत उभी राहून आत ढुंकून पाहण्याचा प्रयत्न करू लागली. पंचनाम्या नंतर आतील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णालयात रवाना करण्याचे वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले आणि पोलिसांची मुख्य तुकडी घटनास्थळी तपासणी करण्यात व्यस्त झाली. ज्या खोलीत घटना घडली होती; ती खोली इथून पुढचे २४ तास पोलिसांच्या निरीक्षणात राहणार होती. त्यामुळे घरातील बाकी मंडळींना दुसऱ्या खोल्या ठरवून देण्यात आल्या. त्यांच्यावर पोलिसांची कडक नजर असणार होती! घटना घडलेली खोली पोलिसांनी बंदिस्त करवून घेतली. घरातील प्रत्येक सदस्यांवर पोलिसांची बारीक नजर होतीच. कारण बहुतांश गुन्हे जवळच्या लोकांकडून घडवून आणल्याचे पुरावे कमी नव्हते! सर्व सदस्यांना दिवाणखान्यात बोलावण्यात आले. राजकीय पार्श्वभूमी असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावरील हावभावातून वेगळाच रुतबा दिसून येत होता. माञ तो किती वेळ टिकून राहील याचा अंदाज देखील त्यांना नव्हता!

नवीन एपिसोड्स : : Every Tuesday, Thursday & Saturday

1

कूस! - ०१.

"गळफास लावून नववधूची आत्महत्या!"या घटनेने शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले! कारण ती नववधू दुसरी तिसरी कोणी नसून एका प्रतिष्ठित कॅबिनेट मंत्र्याची सून होती. पण त्यांना यावर्षी तिकीट देण्यात न आल्यामुळे ते राजकारणातून बाहेर पडले होते. घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. बाहेर लोकांची गर्दी जमली, तर काही लोकं समूहात कुजबुज करत उभी राहून आत ढुंकून पाहण्याचा प्रयत्न करू लागली.पंचनाम्या नंतर आतील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णवाहिकेने तात्काळ रुग्णालयात रवाना करण्याचे वरिष्ठांकडून आदेश देण्यात आले आणि पोलिसांची मुख्य तुकडी घटनास्थळी तपासणी करण्यात व्यस्त झाली. ज्या खोलीत घटना घडली होती; ती खोली इथून पुढचे २४ तास पोलिसांच्या निरीक्षणात राहणार होती. त्यामुळे घरातील बाकी ...अजून वाचा

2

कूस! - ०२.

आतापर्यंत आपण पाहिले, पाटलांच्या सुनेच्या आत्महत्येमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते! घटनेच्या तपासणीचे आदेश पोलीस उप निरीक्षक संजीव नाईक देण्यात आले होते. आता पुढे! काही वर्षांपूर्वी चुकीच्या आरोपांखाली संजीव नाईक यांची बदली करवण्यात पटलांचाच हात होता. पाटलांच्या कार्यकाळात त्यांनी पाटलांना सळो की पळो करून सोडल्यामुळे नाईकांवर त्यांचा राग होता. पाटलांची दुसरी बाजू आयुक्तांना माहीत असल्याने त्यांच्यासाठी या घटनेचा न्यायपूर्वक तपास करणे, वर्दीला न्याय मिळवून देण्यासारखे होते. रुग्णालयातून ते थेट पोलीस ठाण्यात पोहचले. पाण्याचा ग्लास पूर्ण खाली करत त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि काळ्या रंगाचा पेन उचलून घेत काही तरी विचार करत ते पांढऱ्या रंगाच्या फळ्यापाशी जाऊन उभे राहिले. डॉक्टरांकडून ...अजून वाचा

3

कूस! - ०३.

आतापर्यंत आपण पाहिले, पोलीस उप निरीक्षकांच्या बदलीत पाटलांचा हात असल्यामुळे घटनेच्या गुन्हेगारांपर्यंत पोहचणे त्यांच्यासाठी वर्दीला मान मिळवून देण्यासारखे होते! पुढे! "अतिगुह्यतरं तत्वं सर्वमंत्रौघविग्रहम। पुण्यात् पुण्यतरं चैव परं स्रेहाद् वदामि ते।।" तिसऱ्यांदा हा मंत्र कानी पडताच नाईकांनी एकच जोरदार काठी बाबाच्या मांडीत घातली! "आह!!!" जोरदार बसलेल्या माराने बाबा विव्हळले आणि सांगायला तयार झाले. नाईकांनी शिपायांना सांगून बाबाचे स्टेटमेंट नोंदवून घेतले. बाबाच्या माहितीनुसार एकूण एक मुद्दा उघडकीस आला. नाईकांसाठी हे प्रकरण आता स्वतःच्या आत्मसन्माना पुरतेच मर्यादित राहिले नव्हते! तर त्या निष्पाप महिलेवर केल्या गेलेल्या अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे रक्त सळसळत होते. पाटील कुटुंबियांच्या डीएनए सॅम्पलचे तात्काळ आदेश जारी करण्यात आले. ...अजून वाचा

4

कूस! - ०४. (शेवट)

आतापर्यंत आपण पाहिले, पाटील कुटुंबीयांनी केलेल्या क्रूर गुन्हेगारीचा वैयक्तिक पातळीवर पोलीस उप निरीक्षक नाईक यांना जास्तच मन:स्ताप सहन करावा होता. आता पुढे! पाटील कुटुंबियांना ताब्यात घेण्याचे आदेश निरीक्षकांनी शिपायांना दिले. पाटील कुटुंबियांना ताब्यात घेत निरीक्षकांसोबत पोलिसांची एक तुकडी ठाण्याकडे रवाना झाली. गाडीत निरीक्षकांच्या डोक्यात नको ते विचार सुरू होते; ज्यामुळे त्यांचे डोके दुखू लागले! ठाण्यात पोहचत पोलिसांकडून फौजदारी खटला नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली. मुख्य आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत सोबतंच गुन्ह्यात सामील असलेल्यांवर देखील विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले. या घटनेने निरीक्षकांना चांगलाच मनःस्ताप झाला. या घटनेचा त्यांच्या वैयक्तिक जीवनाशी संबंध असल्याचे त्यांना वारंवार जाणवत होते! विचार करून डोकं ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय