वाकडेवड - एक रोमांच

(12)
  • 34.8k
  • 2
  • 15.9k

आठ वाजले तरी माझी झोप उघडली न्हवती. रात्री खिडकीचा दरवाजा लावायला विसरलो होतो. सकाळी वाऱ्याच्या झुळूकीने खिडकी उघडली होती. सकाळची कोमल किरणे माझ्या चेहऱ्यावर पडली होती. सूर्य जसा वर येईल तसा त्या मंद तेजावणाऱ्या किराणांमुळे माझे डोळे उघडले. अचानक खडबडून जागा झाल्यासारखा ठणकरून उठून बसलो. सकाळ झाल्याच्या आनंदामुळे अचानक भरलेली धडकी कमी झाली. उठून आवरावर करून अंघोळ करून घराबाहेर पडलो. आज देसाई मामांच्या शेतावर जाऊन मातीचे सॅम्पल्स घ्यायचे होते. देसाई मामांच्या घरी गेलो. मामांनी नी बळजबरी नाष्टा करायला लावलं. आणि दोघे तसेच शेताला निघालो. तस शेत जरा लांब होतं. सकाळ सकाळी लवकर जाऊन उन्हा अगोदरच मातीचे, तणाचे सॅम्पल्स घेऊन यायचं असं ठरवलं होतं पण रात्री अशा घटना घडल्या की झोप उडाली होती. नंतर कशी बशी झोप लागलेली मलाच माहित नाहीये. सकाळी निघायला 9 वाजले. देसाई मामा तार तार चापा टाकीत पुढे सरकत होते. मलापण त्यांच्यासोबत जाणं भागच होतं. मी वाकडेवड मध्ये आल्यापासून गावाच्या या भागात पहिल्यांदाच चाललो होतो. लय भकास भाग वाटत होता. वस्तीपासून 3 की. मी. लांब.

नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday

1

वाकडेवड - एक रोमांच - 1

 वाकडेवड - एक रोमांच भाग 1 (या कथेद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा लेखकाचा मुळीच उद्देश नाही. कथेतील घटना निव्वळ कल्पित आठ वाजले तरी माझी झोप उघडली न्हवती. रात्री खिडकीचा दरवाजा लावायला विसरलो होतो. सकाळी वाऱ्याच्या झुळूकीने खिडकी उघडली होती. सकाळची कोमल किरणे माझ्या चेहऱ्यावर पडली होती. सूर्य जसा वर येईल तसा त्या मंद तेजावणाऱ्या किराणांमुळे माझे डोळे उघडले. अचानक खडबडून जागा झाल्यासारखा ठणकरून उठून बसलो. सकाळ झाल्याच्या आनंदामुळे अचानक भरलेली धडकी कमी झाली. उठून आवरावर करून अंघोळ करून घराबाहेर पडलो. आज देसाई मामांच्या शेतावर जाऊन मातीचे सॅम्पल्स घ्यायचे होते. देसाई मामांच्या घरी गेलो. मामांनी नी बळजबरी नाष्टा करायला लावलं. आणि ...अजून वाचा

2

वाकडेवड - एक रोमांच - 2

वाकडेवड-एक रोमांच भाग २ ती बाई बोलायला लागली. सुरुवातीला तीला शब्द फुटत न्हवते. ती बोलण्याचा प्रयत्न करत होती. मामा लागले "सांग कोण हायीस तू? हिला का धरलीस?" मग ती म्हणाली, "मी शेवंता हाय". ममांना आधीच कळलं होतं ती कोण आहे ते. त्यांच्या बोलण्यावरून समजलं. परत मामा म्हणाले, "उतारा सांग आणि पोरीला सोड. चालती हो." ती बाई सांगू लागली तीला काय काय हवय ते. एक भाकरी, सुखं मटण, भात, रस्सा आणि बुंदीचा लाडू. एवढं मागितलं तिने. मामांनी तिच्या नवऱ्याला सांगितलं. "काय काय सांगितलय तो उतारा पारिजातकाच्या झाडाबुडी ठेवा". उतारा ठेऊन येताना मागे बघायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही. आणि घरात जाताना ...अजून वाचा

3

वाकडेवड - एक रोमांच - 3

वाकडेवड एक रोमांचभाग 3 गडबडीत फोन उचलला आणि टॉर्च पुन्हा शेताकडे पाडली. आणि पाहतो तर काय ! समोर एक शुभ्र कुत्रं. असं कुत्रं मी जीवनात कधीच पाहिलं न्हवतं. अंगाने एकदम धिप्पाड, निळे डोळे, कंगव्याने केस विंचरले आहेत असे भासवणारे मुलायम केस. इंद्राचा शुभ्र ऐरावत जसा लख्ख उठून दिसला असता अगदी मला तसंच वाटत होतं. आपलं कसं असतं ना! एखाद्या गोष्टीचा अतिरेक जरी झाला तरी ती गोष्ट भयावह वाटू लागते. म्हणूनच एवढं देखणंपान कुत्रं पाहून देखील माझं अंग कापायला लागलं होतं. त्याची शेपूट कोल्ह्यासारखी फुगीर आणि लांबवली तर जमिनीला लोळेल एवढी मोठी होती. घोड्याचे मानेला जसे केस असतात तसे त्याचे ...अजून वाचा

4

वाकडेवड - एक रोमांच - 4

वाकडेवड - एक रोमांच भाग ४ बघतो तर काय! विहिरीत एका नग्न मुलगीचा मृतदेह पडला होता. अक्षरशः अंगावर एक कपडा न्हवता. केस सगळे सोडलेले होते. तो मृतदेह विहीरीच्या कडेला पायरीवर पडला होता. पानी हालेल तसं तिचे केस सुद्धा हालत होते. ते दृश्य फार भयावह होते. तो नग्न देह पहायला कसंतरी वाटत होतं. इतक्यात कोणीतरी आपल्या खांद्यावरचा टॉवेल काढला आणि पायऱ्या उतरून तिच्या अंगावर टाकला. तरीदेखील तिचा पूर्ण देह झाकला गेला न्हवता. गुडघ्यापासून खाली आणि पूर्ण हात तसेच उघडे होते. पाय आणि हात मी निरखून पाहिले. हातात पायात कोणताही दागिना दिसला नाही. शिवाय, अंगाला एखादा खोंबारा लागल्यावर जसे हलके ओरबडे ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय