बॅग पॅक टूर टू कर्नाटका...

(7)
  • 35.8k
  • 5
  • 15.2k

"बॅग पॅकिंग' या नावातचं आमच्यासाठी काहीतरी वेगळं होतं !!आम्ही दोघांनी आतापर्यंत "महाराष्ट्र देशा" ग्रुप बरोबर गडकिल्ल्यांची भटकंती केली होती पण बॅग पॅक टूर केली नव्हती.. त्यामुळे पहिल्यांदा ही तीन दिवसाची टूर करायला आम्ही खूप उत्सुक होतो.आता बघा ना, तीन चार दिवसाच्या फॅमिली ट्रीपला जायचं असेल तरीही, नाही नाही म्हणता दोनतीन बॅगा सहज पॅक होतात...बॅगपॅक टूरमध्ये मात्र प्रत्येकी एकच बॅग असावी आणि तीही शक्यतो पाठीवर अडकवता येईल अशी..अशा टूर मध्ये आपलं जास्त लक्ष पॉइंट्स कव्हर करण्याकडे असतं. त्यामुळं वेळ प्रसंगी आपली बॅग आपल्याला बरोबर घेऊनही फिरावं लागतं.. म्हणून गरजेचं पण कमीत कमी सामान आणि कपडे = बॅग पॅक टूरठरल्याप्रमाणे गरजेपुरतं सामान

Full Novel

1

बॅग पॅक टूर टू कर्नाटका...- भाग 1

बॅग पॅकिंग' या नावातचं आमच्यासाठी काहीतरी वेगळं होतं !!आम्ही दोघांनी आतापर्यंत महाराष्ट्र देशा ग्रुप बरोबर गडकिल्ल्यांची भटकंती होती पण बॅग पॅक टूर केली नव्हती.. त्यामुळे पहिल्यांदा ही तीन दिवसाची टूर करायला आम्ही खूप उत्सुक होतो.आता बघा ना, तीन चार दिवसाच्या फॅमिली ट्रीपला जायचं असेल तरीही, नाही नाही म्हणता दोनतीन बॅगा सहज पॅक होतात...बॅगपॅक टूरमध्ये मात्र प्रत्येकी एकच बॅग असावी आणि तीही शक्यतो पाठीवर अडकवता येईल अशी..अशा टूर मध्ये आपलं जास्त लक्ष पॉइंट्स कव्हर करण्याकडे असतं. त्यामुळं वेळ प्रसंगी आपली बॅग आपल्याला बरोबर घेऊनही फिरावं लागतं.. म्हणून गरजेचं पण कमीत कमी सामान आणि कपडे बॅग पॅक टूरठरल्याप्रमाणे गरजेपुरतं सामान ...अजून वाचा

2

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 2

पहाटे लवकर स्टेशन येणार असल्याने न चुकता मोबाईल मध्ये गजर लावला .. रात्री गाढ झोप लागल्याने सकाळी उठल्यावर फ्रेश अगदी वेळेवर "होन्नावर"ला पोहचली म्हणून बरं ,नाहीतर आमचं पूर्ण दिवसाचं वेळापत्रक कोलमडलं असतं..प्लॅटफॉर्मवर अजून अंधार होता... स्टेशनच्या मुख्य इमारतीत तेवढे दिवे दिसत होते.. सारी सृष्टी अजून धुक्याची दुलई पांघरून सकाळच्या झोपेत गुडूप होती..आमची बस अगोदरच येऊन उभी होती.. इथून आम्हाला अंदाजे 60 कि. मी. प्रवास करायचा होता..जोग फॉलच्या थोड आधी "ट्रिनिटी होम स्टे " मध्ये आमची फ्रेश होण्याची सोय केली होती..सुरवातीला थोडा वेळ बाहेर काहीच दिसत नव्हतं.. बसची काच सरकवून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न केला,पण थंड हवेच्या झुळकेने सर्वांगावर शहारे आणले.. ...अजून वाचा

3

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 3

सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते.. आज पावसानेही उघडीप दिल्याने निसर्ग सकाळच्या उन्हात न्हाऊन निघाला होता ..अंदाजे तीन तासांचा प्रवास आम्ही मस्तपैकी गाणी लावून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होतो..हाही प्रवास बऱ्यापैकी जंगलामधूनच चालू होता.. मध्ये मध्ये छोटी छोटी गावं आमचं स्वागत करत होती.. स्थानिक लोकांचे रोजचे दिनक्रम चालू झाले होते..मी सहज अनीलकडे बघितलं तर आमचे राजे गुडूप झाले होते संगीत आणि निसर्गाच्या सानिध्यात तास दोन तास कसे मोडले हे समजलेच नाही..मध्येच एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मयुरेशला सांगितले की तुम्हाला जेवायचे असेल तर बाजूला जे छोटेसे हॉटेल आहे तिथं काहीतरी खाऊन घ्या नाहीतर अजून तास दोन तास तरी कुठेही ...अजून वाचा

4

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 4

"याना केवज् " बघून मन एकदम मंत्रमुग्ध होऊन गेलं होतं.. अद्वितिय, अध्दभुत अनुभव!!पण तिथेच घुटमळून चालणार नव्हतं.. आजच्या दिवसातील आकर्षण "मिर्जन किल्ला" अजून बाकी होता.. साधारण चार वाजता याना केवज् हून निघालो आणि अर्धा पाऊण तास लागतो मिर्जन किल्ल्याजवळ पोहचायला.. पण हा अर्धा पाऊण तास आमच्या साथीदारांनी त्यांच्या नृत्य अविष्कारांनी अविस्मरणीय केला..बेभान, भन्नाट, लई भारी!! कोणत्या उपमा देऊ ?शब्द नाहीत माझ्याकडे..तुमच्या सगळ्यांच्या जिंदादिलीला सलाम मित्रांनो!!नृत्याच्या जादुई दुलईवर तरंगत तरंगत कधी किल्ल्याजवळ पोहचलो समजलेच नाही..अगदी गाडीतून उतरल्या उतरल्या प्रथम दर्शनीच हा भुईकोट किल्ला आपल्याला त्याच्या प्रेमात पाडतो ..सुंदर स्थापत्यकलेसाठी ओळखला जाणारा दुहेरी तटबंदीचा हा किल्ला "लॅटराइट दगड "वापरून बांधला गेलाअसून ...अजून वाचा

5

बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 5

भगवान शंकराचा वरदहस्त लाभलेले "मुरुडेश्वर" आपल्याला "याची देही याची डोळा!!" पाहायला मिळते याहून अधिक भाग्याची गोष्ट कोणती असावी..रात्रभर शांत लागल्याने सकाळी लवकरच जाग आली.. आजचा दिवस तसा धावपळीचा नसल्याने थोडा वेळ आरामात बेडवर लोळत राहिले.. तेवढ्यात आमचे साहेब , "मी तयार आहे.तू ही उठ आणि तयार हो.. नाहीतर नंतर बीचवर ऊन लागेल आणि फोटो चांगले येणार नाहीत तुझे!"साहेबांना माझा वीक पॉईंट बरोब्बर माहीत आहे..आता अंथरुणातून उठून तयार होण्याशिवाय पर्याय नव्हता..तयार होऊन गेस्ट हाऊसच्या समोरचं असलेल्या बीचवर गेलो..भरतीची वेळ असल्याने समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील दगडांवर येऊन आपटत होत्या.फेसाळता समुद्र आपल्याचं तालात गुंग होता.. आजपर्यंत अनेक सागरकिनारे बघितले आहेत.. पण प्रत्येक ठिकाणचा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय