शहराच्या थोड्या बाहेरच्या अंगाला ठिगळ लावल्यासारखी वसलेली ती झोपडपट्टी. अस्वच्छता आहेच त्याचबरोबर या झोपडपट्टीला मिळणारं पाणी सुद्धा तसंच अस्वच्छ आहे. तरीही ही झोपडपट्टी त्या घाणेरड्या पाण्यावर पोसुन टणकपणे ताठ उभी आहे. शहरातील इमारतींसारखी ती नाजूक नाही. आजार तर तिच्या पाचवीला पुजलेले होते. औषधं तिनं कधी बघीतली का?अशी शंका येण्याइतपत या झोपडपट्टीची प्रकृती दिसायची. खायला कधी मिळेल कधी नाही. खायला मिळालं तर तेही शिळपाकं असायचं ज्यात जीवनसत्व नावाची गोष्टं नसायची तरीही ती झोपडपट्टी ताठ उभी आहे. अरूंद खोलीत अनेक जण राहतात ऑक्सीजन मिळतो तोही बेताचाच तरीही ती झोपडपट्टी ताठ उभी आहे कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना जगवते. शिक्षण म्हणजे काय त्यांना माहित नाही. पाटी पेन्सील त्यांना माहित नाही पण अनुभवांनी त्यांना शिक्षण मिळतं. त्यांच्या आयुष्यात हे महत्वाचं वाटतं म्हणून ते पाटी पेन्सीलचा विचार करत नाहीत.
नवीन एपिसोड्स : : Every Monday, Wednesday & Friday
ग...गणवेशाचा - भाग १
कथा... ग…गणवेशाचा. शहराच्या थोड्या बाहेरच्या अंगाला ठिगळ लावल्यासारखी वसलेली ती झोपडपट्टी. अस्वच्छता आहेच त्याचबरोबर या झोपडपट्टीला मिळणारं पाणी सुद्धा अस्वच्छ आहे. तरीही ही झोपडपट्टी त्या घाणेरड्या पाण्यावर पोसुन टणकपणे ताठ उभी आहे. शहरातील इमारतींसारखी ती नाजूक नाही. आजार तर तिच्या पाचवीला पुजलेले होते. औषधं तिनं कधी बघीतली का?अशी शंका येण्याइतपत या झोपडपट्टीची प्रकृती दिसायची. खायला कधी मिळेल कधी नाही. खायला मिळालं तर तेही शिळपाकं असायचं ज्यात जीवनसत्व नावाची गोष्टं नसायची तरीही ती झोपडपट्टी ताठ उभी आहे. अरूंद खोलीत अनेक जण राहतात ऑक्सीजन मिळतो तोही बेताचाच तरीही ती झोपडपट्टी ताठ उभी आहे कारण जगण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती त्यांना जगवते. शिक्षण म्हणजे ...अजून वाचा
ग...गणवेशाचा - भाग २
ग…गणवेशाचा भाग २मागील भागावरून पुढे…हल्ली मुन्नीचं कशात लक्ष्य नसायचं हे तिच्या आईच्या आणि आजाच्या लक्षात आलं होतं. बाप शुद्धीवर तर त्याला मुन्नीत झालेला बदल कसा कळणार?मुन्नीला आता त्या मुलांच्या दप्तरात काय आहे याची उत्सुकता लागली होती. एक दिवस त्यातील एका मुलाचं दप्तर खाली पडलं. त्याने ऊचलण्या आधी ते दप्तर ऊघडल्या गेलं. दप्तरातील पुस्तकं वह्या खाली पडली. ती पुस्तकं त्या मुलाने पुन्हा आत ठेवली. मुन्नीची इच्छा पूर्ण झाली. दप्तरात वह्या पुस्तकं असतात हे कळलं. लांबुन प्रत्येक पुस्तकाचा रंग नाही कळला पण जे कळलं त्यामुळे तिचे डोळे चमकले. भान हरपून ती दप्तराकडे बघत होती. एवढ्यात कोणीतरी तिचा दंड धरल्यामुळे ती भानावर ...अजून वाचा
ग...गणवेशाचा - भाग ३
ग…गणवेशाचा भाग३मागील भागावरून पुढे…दुपारचं ऊन डांबरी रस्त्याला चमकवत होतं. सामानानं गच्च भरलेला तो ठेला चढावावर चढवणं लख्याला त्रासाचं जातं पण तो काय करणार?पैशाची जाणीव त्याला ठेला ओढायला सांगत होती. त्यातच काल लख्याने मिळालेले सगळे पैसे दारुत ऊडवल्यामुळे घरातले सगळेच उपाशी राहिले होते. रखमाला सारखं पैसे उधार मागणं बरोबर वाटायचं नाही.भुकेमुळेही लख्याचा ठेला ओढायला जोर लागत नव्हता. त्याच्या बरोबर त्याची दहा वर्षांची मुलगी मुन्नी होती.आज लख्याबरोबर तिच्या आईनेच तिला पाठवलं होतं मिळालेली मजूरी घरी घेऊन यायला.कारण लख्या मजुरी हातात पडली की सरळ दारूच्या गुत्त्यावर जायचा आणि अर्धे पैसे संपवूनच घरी यायचा.मुन्नीचां जीव ऊन्हानी कासाविस झालेला होता.पायातल्या चपलेला मध्येच भगदाड पडल्याने ...अजून वाचा
ग...गणवेशाचा - भाग ४
ग…गणवेशाचा भाग ४मागील भागावरून पुढे…रखमाला एका शाळेचं आंगण जाण्याचं काम आहे असं कळलं तेव्हा रखमाने मुन्नीला बरोबर घेऊन जायचं लहान मुलांना आज्याला सांभाळायला सांगीतलं." राणे तू रोजच्या कामावर कधी जाशील?"" हे साळचं काम झालं की जाईन." रखमा म्हणाली."साळेचं काम लवकर झालं नाही मंजी! त्यापेक्सा तू ऊद्या सांगून दे का परवा कामाले न्हाई येनार. तू सुट्टीचं घेत नाय कदी. एखांदी घेतली तर का होते!" रखमालापण आज्याचं म्हणणं पटलं. ती कामाला निघाली. कामावर गेलं की ऊद्या येणार नाही म्हणून सांगायचं हे तिनी मनाशी पक्कं ठरवलं.****सकाळी सकाळी रखमा आणि मुन्नी दोघी शाळेकडे निघाल्या. एवढ्या सकाळी कामाला जायचं मुन्नीच्या जीवावर आलं होतं. पण ...अजून वाचा
ग...गणवेशाचा - भाग ५
ग…गणवेशाचा भाग ५मुन्नीमध्ये असलेली हुशारी, चिकाटी बघून मालकिणीने मनोमन निश्चय केला की या हि-याला चांगले पैलू पाडायचेच. तो असा हरवू द्यायचा नाही.असं होता होता दोन चार महिने निघून गेले. मुन्नीला आता अक्षर ओळख चांगली झाली होती. पाढे बिनचूक म्हणून लागली होती .गाळलेले अंक कोणते ते समजू लागलं होतं. शाळेच दार, शाळेतील वर्ग बघण्याची मुन्नीला झालेली घाई तिच्या बोलण्यातून नजरेतून मालकिणीलाच नाही तर रखमा आणि आज्यालाही दिसू लागली होती.****एकदा शाळेची तयारी करत असताना मालकिणीच्या मुलीने विचारले," आई मुन्नीला आमच्या शाळेत घेतील?"" बघू.कोणत्या वर्गात तिला घेतील हे मला माहीत नाही.जर तुमची शाळा नाही म्हणाली तर तिला काॅर्पोरेशनच्या शाळेत घालू."" काॅर्पोरेशनच्या शाळेत ...अजून वाचा