कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है!

(7)
  • 25.8k
  • 3
  • 11.2k

रसिका लहानपणापासूनचं अतिशय तल्लख बुद्धी आणि जात्याच हुशार असणारी मुलगी.तिच्या या गुणांची छाप तिच्या पालकांना आणि शिक्षकांना अगदी शालेय जीवनापासून ते ती मेकॅनिकल इंजिनिअर होईपर्यंत दिसून येते.मुंबई आय आय टी मधून डिस्टिंक्शन मध्ये पास होऊन कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत तिला गलेलठ्ठ पगाराची मिळालेली नोकरी, यावरून तिच्या कठोर परिश्रमाची आणि बुद्धिमत्तेची कोणालाही कल्पना येईल..कॉलेजमध्ये असताना तिच्याच वर्गात शिकणाऱ्या कुणालशी तिची ओळख होते काय आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात होत काय.. दोघंही आपापल्या घरी सांगतात. घरून कसलाही विरोध होत नाहीं .अगदी थाटामाटात त्यांचं लग्न पार पडतं. कुणालची आई शिक्षिका पण आता सेवानिवृत्त असते.. मोठा भाऊ आणि वहिनी दोघंही नोकरी करणारे.

Full Novel

1

कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है! - भाग 1

रसिका लहानपणापासूनचं अतिशय तल्लख बुद्धी आणि जात्याच हुशार असणारी मुलगी.तिच्या या गुणांची छाप तिच्या पालकांना आणि शिक्षकांना अगदी शालेय ते ती मेकॅनिकल इंजिनिअर होईपर्यंत दिसून येते.मुंबई आय आय टी मधून डिस्टिंक्शन मध्ये पास होऊन कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत तिला गलेलठ्ठ पगाराची मिळालेली नोकरी, यावरून तिच्या कठोर परिश्रमाची आणि बुद्धिमत्तेची कोणालाही कल्पना येईल..कॉलेजमध्ये असताना तिच्याच वर्गात शिकणाऱ्या कुणालशी तिची ओळख होते काय आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात होत काय.. दोघंही आपापल्या घरी सांगतात. घरून कसलाही विरोध होत नाहीं .अगदी थाटामाटात त्यांचं लग्न पार पडतं. कुणालची आई शिक्षिका पण आता सेवानिवृत्त असते.. मोठा भाऊ आणि वहिनी दोघंही नोकरी करणारे. ...अजून वाचा

2

कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है! - भाग 2

समोर इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसलेली स्त्री आनंदी पाटील असते. रसिकाच्या अगोदरच्या ऑफिसमधील ज्युनियर असते. जिणे एके काळी रसिकाच्या हाताखाली काम असते. तिचा हातात रसिकाची बायोडेटा फाईल असते. रसिकाला पाहताच ती कुत्सित हसते.तिला पाहून न पाहिल्यासारखं करते आणि परत तिच्या फाईल बघण्यात गुंग होते."मे आय सीट मॅडम""ओ.. येस येस, यू कॅन""मी पाहिली तुमची फाइल, तुमची मागील रेकॉर्डस् खूप चांगली आहेत. पण तुम्ही जो पाच वर्षाचा गॅप घेतलात त्यामुळे आता तुमच्या सध्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर कंपनी कसा विश्वास ठेवणार. आम्हाला या पदासाठी खूप अनुभवी आणि कार्यक्षम व्यक्ती हवी आहे.तुम्ही हुशार आणि कार्यक्षम आहात हे मी माझ्या वैयक्तिक पातळीवर सांगू शकेन पण नोकरीत ...अजून वाचा

3

कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है! - भाग 3

कुणाल पुरता जाणून होता की बाळासाठी रसिकाने तिचं करियर पणाला लावलं होतं. तिनं नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला आपल्या करीयरच्या उच्च बिंदूवर असताना नात्यांसाठी एवढा मोठा त्याग करण्यासाठीही धैर्य आणि समजूतदारपणा लागतो. तो रसिकाने दाखवला म्हणूनच आज त्यांचं बाळही निरोगी आहे आणि कुणाल स्वतः हा त्याच्या करियरमध्ये प्रगती करू शकला.याचा अर्थ आज त्यांच जे हसतं खेळतं आणि सुखी कुटुंब आहे त्याचं बऱ्यापैकी श्रेय रसिकाला जातं.आज पुन्हा ती आपल्या करिअरची नवीन सुरवात करू पाहत आहे. अशा वेळी आजच्या सारखं अनुभव तिला येतच राहणार आहेत. पण तिनं निराश न होता याचा सामना करायला हवा.खूप विचाराअंती त्यानं ठरवलं की एक दोन ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय