गेली पंधरा मिनिटे, हे सर्वांच्याच लक्षात येत होतं की सरकारी वकील आरुष काणेकर सतत कोर्टातल्या घड्याळाकडे बघत , मनात अत्यंत काटेकोर पणे वेळेची नोंद करत साक्षीदाराला प्रश्न विचारत होता.वेळकाढू पणा करण्यासाठी अधून मधून उगाचच आपल्या नोट्स चाळत होता, तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता. अचानक तो ताठ उभा राहिला आणि म्हणाला, “ दॅट्स ऑल युवर ऑनर.” नंतर पाणिनी कडे वळला आणि म्हणाला, “ यू मे क्रॉस. पटवर्धन, तुम्हाला काही विचारायचं आहे?” पाणिनी उठून उभा राहिला. आरुष काणेकर ने आपल्या पुढे टाकलेला सापळा त्याने ओळखला. “ युअर ऑनर, कोर्टाचं कामकाज संपायला फक्त वीस मिनिटं बाकी आहेत.” पाणिनी म्हणाला. “ मग? त्याचा काय संबंध? ” न्यायाधीश एरंडे त्रासिक स्वरात म्हणाले. पाणिनी हसला, “ मला एवढंच म्हणायचं होतं, की माझ्या उलट तपासणीत कोर्टाचे कामकाज वेळ संपल्यामुळे थांबवलेले तुम्हाला आवडणार नाही.माझी उलट तपासणी ही जरा विस्ताराने घेणारे मी.आपण जर ती सोमवारी सकाळ पासून चालू केली तर सलग घेता येईल.”

Full Novel

1

होल्ड अप - प्रकरण 1

होल्ड अप प्रकरण १ गेली पंधरा मिनिटे, हे सर्वांच्याच लक्षात येत होतं की सरकारी वकील आरुष काणेकर सतत कोर्टातल्या बघत , मनात अत्यंत काटेकोर पणे वेळेची नोंद करत साक्षीदाराला प्रश्न विचारत होता.वेळकाढू पणा करण्यासाठी अधून मधून उगाचच आपल्या नोट्स चाळत होता, तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारत होता. अचानक तो ताठ उभा राहिला आणि म्हणाला, “ दॅट्स ऑल युवर ऑनर.” नंतर पाणिनी कडे वळला आणि म्हणाला, “ यू मे क्रॉस. पटवर्धन, तुम्हाला काही विचारायचं आहे?” पाणिनी उठून उभा राहिला. आरुष काणेकर ने आपल्या पुढे टाकलेला सापळा त्याने ओळखला. “ युअर ऑनर, कोर्टाचं कामकाज संपायला फक्त वीस मिनिटं बाकी आहेत.” ...अजून वाचा

2

होल्ड अप - प्रकरण 2

होल्ड अपप्रकरण २“ तुम्ही आरोपीला खूप कमी कालावधी पाहिलंत?” आपल्या आवाजात सहजपणा आणत पाणिनी ने विचारलं.“ कमी कालावधी कशाला हे व्यक्ती नुसार बदलतं पटवर्धन. ” ती उर्मट पणे म्हणाली.“ म्हणजे कदाचित एक मिनिटा पेक्षा कमी?” पाणिनी ने विचारलं.“ कदाचित.” मरुशिका म्हणाली“ अर्ध्या मिनिटापेक्षा ही कमी? ”“ असेल.कदाचित.”-मरुशिका“ तुम्ही सिया माथूर बरोबर गाडीने व्हिला नंबर दोन मधे आलात.?”“ हो.”“ किती अंतर होतं ? होल्ड अप झाल्याच्या ठिकाण पासून ते व्हिला नंबर दोन ?” पाणिनी ने विचारलं.“ अर्धा किमी पण नसेल.”-मरुशिका“ किती वेळ लागला जायला?”- पाणिनी ने विचारलं.“ काही मिनिटंच लागली.”-मरुशिका“ होल्ड अप चं नाट्य घडायला जेवढा वेळ लागला, त्याच्या चौपट ...अजून वाचा

3

होल्ड अप - प्रकरण 3

होल्ड अप प्रकरण ३ “ प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, उत्तरादाखल तुम्ही मला प्रति प्रश्न नका विचारू.” पाणिनी कडाडला. “ साक्षीदार म्हणाली. “ आणि तुम्हाला हे माहीत होतं की ओळख परेड च्या रांगेत, जे वेगवेगळे लोक असतील त्यात आरोपी असणार?” “ हो.”-मरुशिका “ आणि आरोपीला तुम्ही फोटो वरून आधीच ओळखलं होतं?” “ होय.” “ ज्यावेळी मिस्टर कामोद यांनी तुम्हाला आरोपीचा फोटो दिला, त्यावेळी त्यांनी तुम्हाला आरोपी शिवाय इतरही काही माणसांचे फोटो दिले का? आणि असं विचारलं का, की या पैकी कोणत्या माणसाने होल्ड अप केला असं वाटतंय? ”-- पाणिनी म्हणाला. “ नाही, असं नाही केलं त्याने. तो म्हणाला, मरुशिका, आपला ...अजून वाचा

4

होल्ड अप - प्रकरण 4

होल्ड अप प्रकरण चार प्रकरण ४ गर्दीतून वाट काढत कनक ओजस पाणिनी च्या दिशेने आला. “ काय झालं?” पाणिनी विचारलं. “ ती पळून गेली.” –कनक “ तू तिला नीट सांभाळून ठेवायला हवं होतंस.” पाणिनी नाराज होऊन म्हणाला. “ अरे ती पळून जाणाऱ्यातली नव्हती.तिलाच साक्ष द्यायची इच्छा होती मी हे शपथेवर सांगायला तयार आहे. अरे तिने मला शपथ पूर्वक सांगितलं की तिने मरुशिका ला गाडीतून नेलं पण ते होल्ड अप च्या ठिकाणाहून नाही तर त्याच्या आधी दुपारी शॉपिंग ला जाताना.” “ तर मग कनक, डाका पडला तेव्हा रात्री सिया कुठे होती?” “ ते तिला आठवत नाहीये.तिला वाटतं ती व्हिला नंबर ...अजून वाचा

5

होल्ड अप - प्रकरण 5

होल्ड अप प्रकरण ५ कनक बरोबर पाणिनी आपल्या ऑफिसला आला तेव्हा सौम्या टपाल आणि मेल चाळत होती. “ सिया ने कशी साथ दिली?” तिने पाणिनी ला आल्या आल्या विचारलं. “ खास नाही.” पाणिनी म्हणाला. “ असं कसं?” –सौम्या “ ती पळाली.” “ काय ! ” सौम्या उद्गारली. “ खरचं” “ मला जरा सविस्तर सांगा ना.”-सौम्या “ मला वाटत काहीतरी कारस्थान होत यात.” पाणिनी म्हणाला. “ मला समजत नाहीसं झालंय.प्रवासात माझ्या बरोबरच होती ती.चांगली तयारीची आणि बिनधास्त वाटत होती.” कनक म्हणाला. “ सर,तुम्ही तिच्याशी बोलला होतात का?”-सौम्या “ नाही. तशी संधीच नाही मिळाली.कोर्ट चालू होई पर्यंत ती आली नव्हती.कनक ला ...अजून वाचा

6

होल्ड अप - प्रकरण 6

प्रकरण ६त्याच रात्री पावणे दहा च्या सुमारास पाणिनी, कनक च्या ऑफिसात गेला.“ कनक आहे आत?” त्याने रिसेप्शनिस्ट ला विचारलं.“ आहेत सर आत. ते तुम्हालाच संपर्क करायच्या प्रयत्नात होते.”“ मी त्याला म्हणालो होतो की मीच येऊन जाईन इथे म्हणून.” पाणिनी म्हणाला.“ बरोबर आहे पण त्यांना वाटत होत की तुम्ही येण्यापूर्वीच तुम्हाला काही माहिती दयावी.” रिसेप्शनिस्ट म्हणाली.“ मी येतो त्याला भेटून.” पाणिनी तिला म्हणाला आणि आत जायला निघाला.“ पाणिनी पटवर्धन आत यायला निघालेत तुमच्याकडे.” रिसेप्शनिस्ट ने कनक ला फोन वरून घाई घाईत सांगितलं.कनक रिसेप्शनिस्ट चा फोन खाली ठेवे पर्यंत,पाणिनी त्याच्या केबिन मधे पोचला होता.“ अरे तू कधी भेटतोयस असं झालं होत ...अजून वाचा

7

होल्ड अप - प्रकरण 7

होल्ड अपप्रकरण ७“ तुझ्या सहवासात दिवसभराचा एकटे पणा निघून जाईल.” पाणिनी म्हणाला.“ तुम्ही मला माझं नाव सांगून बोलावून घेतलंत? –मिष्टी.“ हं ” पाणिनी म्हणाला.“ कसं काय?” –मिष्टी“ मी तुझ्या बद्दल ऐकलं होतं. तू व्यस्त होतीस कामात?”“ मी...मी इथे नव्हते. घरी होते मी.”पाणिनी काहीच बोलला नाही.“ एकटीच...” तिने वाक्य पूर्ण केलं आणि पाणिनी कडे पाहिलं.पाणिनी च्या चेहेऱ्यावर काहीच भाव उमटले नाहीत तेव्हा ताण हलका करण्यासाठी ती म्हणाली,“ मला आश्चर्य वाटलं तुम्ही मला कस काय ओळखत होता ! ”“ माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने तुझ्या बद्दल सांगितलं.”“ विशेष आहे हे. कारण मला इथे फार दिवस झालेले नाहीत.” –मिष्टी“ मला त्या व्यक्तीने तसंच ...अजून वाचा

8

होल्ड अप - प्रकरण 8

प्रकरण ८“ चला आत ” तो माणूस म्हणाला.“ पाणिनी पटवर्धन ! ” मिष्टी उद्गारली. “ मला लक्षात यायला हवं ,जेव्हा तुम्ही तुमचं नाव पाणिनी सांगितलं तेव्हाच.”“ मी जिंकलो किंवा हरलो तरी तुला पैसे मिळतील याची मी काळजी घेईन.” पाणिनी म्हणाला.“ मिस्टर पटवर्धन, इथल्या खोल्या आणि फर्निचर अगदी साधंच आहे.म्हणजे तुमच्या जीवन चर्येला साजेसं नाही. पण त्याला नाईलाज आहे.पोलिसांच्या नजरेतून सुटण्यासाठी आम्हाला हा सेट अप वरचेवर हलवायला लागतो.म्हणजे खेळायची मशीन्स हीच असतात पण त्यांची जागा बदलावी लागते.” तो माणूस म्हणाला.“ अशा वेळी जागा बदलली की तुम्ही बार बाला ना कळवता?” पाणिनी ने विचारलं.“ त्यांना नाही, संबंधित ड्रायव्हर ना कळवतो.”“ बऱ्यापैकी ...अजून वाचा

9

होल्ड अप - प्रकरण 9

होल्ड अप प्रकरण ९ “ गुड इव्हिनिंग,” तो तिला म्हणाला. “ तुम्ही इथे येणे मी अपेक्षित केले नव्हते.” ती पाणिनी फक्त हसला. “ ही जागा सापडली कशी तुम्हाला?” मरुशिका ने विचारलं. “ मागच्या वीस मिनिटात मला हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारला गेलाय” पाणिनी म्हणाला. “ मला वाटतं, मला तुमच्याशी बोलावं लागेल पटवर्धन.” “ कधी? कुठे?” पाणिनी ने विचारलं. “ तुम्हाला माहितीच आहे, व्हिला नंबर तीन शेजारच्या इमारतीत खालच्या मजल्यावर आहे.तिथे माझं ऑफिस आहे, तिथे बसून आपल्याला खाजगी बोलता येईल.”—मरुशिका “ तुमच्या सेवेला हजर आहे.” पाणिनी म्हणाला. पाणिनी ला ती तिच्या ऑफिस मधे घेऊन गेली. महागड्या फर्निचर ने ते सजवलं होतं ...अजून वाचा

10

होल्ड अप - प्रकरण 10

प्रकरण १०दुसऱ्या दिवशी सव्वा अकरा वाजता पाणिनी ऑफिसातल्या त्याच्या केबिन मधे असतांना त्याचा फोन वाजला.सौम्या फोन वर होती. “ सर तुम्ही तुमच्या सवयी प्रमाणे कोर्टाचे अद्ययावत निकाल वाचत असाल पण त्रास देत्ये कारण बाहेर अशी व्यक्ती आल्ये की तुम्ही तिच्याशी बोलायला हवं अस मला वाटतं.”कनक , सौम्या, आणि पाणिनी खास मित्र होते. वर्ग मित्र.एकमेकांना काहीही बोलू शकत होते,एकमेकांसाठी कधीही काहीहीकरू शकत होते. कनक गुप्त हेर झाला,पाणिनी च्याच मजल्यावर त्याने ऑफिस थाटले. इन्स्पे.तारकर हा त्यांच्याच बरोबरचा खास मित्र.पण तो पोलीस झाला. अनेकदा तो आणि पाणिनी एकमेकांच्या विरुध्द उभे ठाकले पण मैत्री आणि व्यवसाय ,यात त्यांनी कधी गल्लत केली नाही.मैत्रीत कधीच ...अजून वाचा

11

होल्ड अप - प्रकरण 11

होल्ड अप प्रकरण ११ पाणिनी ऑफिसात आला तेव्हा कनक त्याचीच वाट बघत होता. “ काय झालं सिया माथूर चं?” ने विचारलं. “ ती कुठे राहत्ये ते शोधलंय आम्ही. तुझी कालची भेट कशी झाली तिच्या बरोबरची?” पाणिनी ने त्याला सर्व सविस्तर हकीगत कथन केली. “ कनक, मरुशिका मतकरी चे तीन क्लब आहेत. ज्याला ती व्हिला म्हणते. तिन्ही क्लब हे छोट्याशा उपनगरात आहेत. तिन्ही ठिकाणची जागेची निवड मरुशिका ने फारच काळजी पूर्वक केल्ये.” कनक ने मान डोलावली. “तुझा जो माणूस माझ्यावर लक्ष ठेऊन होता, मी क्लब मधे गेल्या पासून, त्याने आम्ही बाहेर पडल्यावर आमचा पाठलाग केला असेल ना? ” पाणिनी ने ...अजून वाचा

12

होल्ड अप - प्रकरण 12

“ तुमचा माणूस बाहेर पडतोय पटवर्धन.आणि त्याच वेळी मृद्गंधा दारावरची बेल वाजवत्ये.” ( प्रकरण ११ समाप्त)........पुढे चालू.... प्रकरण १२ ती जर दहा मिनिटाच्या आत सिया च्या घरातून बाहेर आली तर त्याचा अर्थ तिची भेट फेल गेली.पण जर अर्धा तास ती आत राहिली तर मला वाटत की तिच्या हाताला काहीतरी लागतंय असं समजायला हरकत नाही.” पाणिनी म्हणाला. “ खूप आत्मविश्वास दिसतोय. त्या मुलीच्या चालण्यातूनच जाणवतोय.” सर्वेश उद्गारला. “ खरंच आहे तुझं निरीक्षण.” “ तुम्हाला कोर्टाने नेमलंय ना पटवर्धन, या खटल्यात?” “ हो.” पाणिनी म्हणाला. “ तुम्हाला यात पैसे दिले जातात?” “ अजिबात नाही, तुम्हाला तुमचा स्वतच्या खर्चाने आणि वेळ खर्च ...अजून वाचा

13

होल्ड अप - प्रकरण 13

होल्ड अप प्रकरण १३ “ कनक, या प्रकरणात काहीतरी जबरदस्त लोचा आहे.” पाणिनी पटवर्धन कनक च्या केबिन मधे आत शिरता म्हणाला.“ तू बोलतोयस हे पाणिनी ! ”—कनक“ ती सिया माथूर नक्कीच दुहेरी आयुष्य जगत असली पाहिजे. तिचे इथेही घर आहे आणि विलासपूर मधे पण, आणि नोकरी मरुशिका क्लब-३ मधे.”कनक ओजस ने मान हलवून संमती दिली.“ ती तसे का करत असावी? आणि कसे जमवले असावे हे तिने?” पाणिनी स्वतःशीच बोलला“ अँम्ब्युलन्स आली तेव्हा तू तिथे समोरच्या हॉटेलात होतास पाणिनी?” –कनकपाणिनी मानेने हो म्हणाला.“ माझा दुसरा माणूस अँम्ब्युलन्स च्या मागावर निघाला लगेच पण एवढया ट्राफिक मधून अँम्ब्युलन्स ला जसं पोलीस सहज ...अजून वाचा

14

होल्ड अप - प्रकरण 14

प्रकरण १४तुरुंगात पाणिनी पटवर्धन ने आरोपी सुषेम इनामदार ची भेट घेतली.“ कसा आहेस?” पाणिनी ने विचारलं.“ ठीक.”“ आज तुझ्याशी बोललं?” पाणिनी ने विचारलं.“ खूप जण बोलले. पटवर्धन साहेब माझी पुतणी देवगिरी वरून तुम्हाला भेटायला आल्ये ना !” सुषेम इनामदार म्हणाला.“ हो माहित्ये. आमची भेट झाल्ये.” पाणिनी म्हणाला.“ तिच्याकडे पैसे आहेत.मी जर न्यायाधीशांना सांगितलं असतं की माझ्या पुतणी कडून मला पैसे घेण्यासाठी व्यवस्था करा तर त्यांनी केली असती पण मग मला दुसराच वकील बघावा लागला असता. तुम्ही मिळाला नसतात. मी तसे काहीच सांगितलं नाही त्यामुळे न्यायाधीशांनी तुम्हाला नेमले. माझे नशीब आहे. ”“ असू दे.असू दे.” पाणिनी हसून म्हणाला. “ आणि ...अजून वाचा

15

होल्ड अप - प्रकरण 15

प्रकरण १५पाणिनी ऑफिसला आल्या आल्याच त्याचं काहीतरी बिनसलं असल्याचं सौम्या च्या लक्षात आलं.“ काय झालं सर?” तिने काळजीने विचारलं.पाणिनी तिला उत्तर द्यायचं टाळलं. अलिप्त पणे, खिशात हात घालून खिडकीतून बाहेर बघत राहिला.ती त्याच्या जवळ आली.त्याच्या हातात आपलं हात घालून हळूवार थोपटत राहिली.“ कितपत वाईट घडलंय?”“ फार वाईट.” पाणिनी म्हणाला.“ मला सांगणार आहात?”तिला उत्तर न देता पाणिनी येरझऱ्या घालायला लागला.“ आणखी साक्षीदार?”“ आणखी.आणि नको असलेले नेमके.” पाणिनी म्हणाला.“ सर. तुम्ही आहे ती वस्तुस्थिती बदलू शकत नाही, पण अशिलाला न्याय देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता.”“ ते सगळ मला माहित्ये.”“ काय झालंय नेमकं?” –सौम्या“ होल्ड अप च्या वेळी इनामदार ने वापरलेली ...अजून वाचा

16

होल्ड अप - प्रकरण 16

प्रकरण १६पाणिनी ऑफिसला आला तेव्हा दार बंद होत आणि दाराला चिट्ठी होती,‘ मी आणि मृद्गंधा बाहेर गेलोय.काही लागलं तर घरी फोन करा.’पाणिनी ने चिट्ठी वाचून फाडून कचरा पेटीत टाकली.दार उघडून आत आला तेवढ्यात फोन खणखणला.“ सर मी अडकल्ये.” सौम्या चा तार स्वरातला आवाज आला.“ नेमकं काय झालंय सौम्या?”“ फोन वर सांगणे योग्य नाही सर.”“ तू आहेस कुठे अत्ता?”“ ज्या घरातून ठसे घ्यायचे होते तुम्हाला, तिथे.”काय घडलं असावं ते पाणिनी च्या पटकन लक्षात आलं.त्याने मृद्गंधा ने जिथे ठसे घेण्याची उपकरणं ठेवली होती तिथे पाहिलं.तिथे काही नव्हतं त्या जागेवर.“ मृद्गंधा तुझ्या बरोबर आहे, सौम्या?” पाणिनी ने विचारलं.“ नाही तिच्या मागावर तो ...अजून वाचा

17

होल्ड अप - प्रकरण 17

प्रकरण १७सौम्या आणि पाणिनी तिथून बाहेर पडल्यावर पाणिनी आपल्या गाडीत ड्रायव्हिंग सीट वर बसताच सौम्या ने विचारलं, “ आता काय सर? ”“ आता आपण काही काळासाठी चक्क गायब व्हायचं सौम्या. पोलीस आपल्याला शोधायचा प्रयत्न करतील, आपल्या नेहेमीच्या हॉटेल मध्ये, ऑफिसात, कोर्टात वगैरे.”“ पण सर, आपण नाहीना असं करू शकत. सोमवारी कोर्टात जावच लागेल आपल्याला.केस आहे.” सौम्या म्हणाली.“ सोमवार यायला वेळ आहे, तो पर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलं असेल.” पाणिनी म्हणाला.“ या शहरातले प्रसिद्ध फौजदारी वकील पाणिनी पटवर्धन यांनी मला जो कायदा शिकवलाय, त्या नुसार पलायन करणे हा गुन्हा केल्याचा पुरावा ठरतो.” सौम्या म्हणाली.“ बरोबर शिकली आहेस सौम्या. परीक्षेत ...अजून वाचा

18

होल्ड अप - प्रकरण 18

प्रकरण १८सौम्या आणि पाणिनी पटवर्धन निवांत पणे एका हॉटेल मध्ये बसले होते. “ टोस्ट बटर आणि कडक कॉफी ”.पाणिनी वेटर ला सांगितलं.“ अजून डोक्यात गौतम चा विषय आहे?” पाणिनी च्या मनातले विचार जाणून सौम्या ने विचारलं.“ तो मला धोकादायक वाटतो सौम्या. म्हणजे नाटकी. विशेषतः स्वतःचे ठसे देताना तो जास्तच उत्साही वाटला मला.” पाणिनी म्हणाला आणि आपल्या विचारत हरवला.दरम्यान वेटर ने आणलेल्या टोस्ट आणि कॉफी चा त्या दोघांनी समाचार घेतला.“ काय सुचवायचं आहे तुम्हाला सर? ” –सौम्या.“ त्या घरातून त्याला जे काही हवं होतं, ते त्याने जाताना आपल्या बरोबर घेतलं हे नक्की.आणि ते सुध्दा अगदी आपल्या नाकावर टिच्चून, आपल्याला पत्ता ...अजून वाचा

19

होल्ड अप - प्रकरण 19

प्रकरण १९ “ अगदी थोडक्यात बचावलो ” पाणिनी म्हणाला. “ गौतम कडून पोलिसांना गेलेला फोन ? ” सौम्या “ मॉडेल एजन्सी कडून आलेल्या त्या पत्रात नेमक्या कुठल्या नावाची मॉडेल एजन्सी होती ते लक्षात आहे? ” “ नाही आठवत. ऐश्वर्या मॉडेल एजन्सी असे नाव होत असं पुसटसं वाटतंय.” “ आपण जरा समोरच्या हॉटेलात जाऊन डिरेक्टरी चाळू आणि ऐश्वर्या मॉडेल एजन्सी सर्च करू. दरम्यान मी कनक ओजस ला फोन लावतो.” पाणिनी म्हणाला. ते दोघे हॉटेलात गेले.कनक फोन वर आला “ तुझ्यासाठी एक वाईट बातमी आहे पाणिनी. डाका पडलेल्या गाडीतून पळवली गेलेली पर्स मरुशिका ची नाही असं तुला वाटत होतं ना? ते ...अजून वाचा

20

होल्ड अप - प्रकरण 20

प्रकरण २० दहा वाजता कोर्ट चालू झालं तेव्हा आधीच्या आठवड्यातल्या घडामोडींचे परिणाम जाणवायला लागले होते. पाणिनी उठून उभा राहिला. माझी कोर्टाला विनंती आहे की जो माणूस साक्षीदार नसेल तर तो या कोर्टात हजर राहणार नाही. “ आणि ज्या साक्षीदारांच्या साक्षी आधीच होऊन गेल्या आहेत,त्यांचे काय?” आरुष काणेकर, सरकारी वकील म्हणाला. “ तुम्ही जर खात्री देत असाल की त्या साक्षीदारांना पुन्हा साक्ष देण्यासाठी पाचारण केलं जाणार नाही, तर त्यांनी बसायला हरकत नाही. थोडक्यात साक्ष होऊनही कोर्टात बसणाऱ्याना मी पुन्हा साक्षीला बोलावून देणार नाही.” पाणिनी म्हणाला. “ ठीक आहे.ज्यांना साक्षीला बोलावले जाणार आहे ते सर्व लोक कोर्टाच्या बाहेरच बसतील.फक्त साक्षी पुरते ...अजून वाचा

21

होल्ड अप - प्रकरण 21

प्रकरण २१ “ मी जसा विचार करतोय तसं मला जाणवतंय की माझी चूक झाली सांगताना.मी तिला सिगारेट ऑफर केलीच आधीच्या संध्याकाळी हा प्रसंग घडला होता, त्यावेळी मी तिला सिगारेट देऊ केली होती.त्याही वेळी तिने माझा ब्रँड नाकारला होता. ती नेहेमी तिचा स्वतःचा ब्रँडच पिते. ” “ पण तुम्ही तिला सिगारेट ऑफर केल्यावर दरवेळी तिची सिगारेट तुमच्याच लायटर ने पेटवता?” पाणिनी ने विचारलं. “ नाही.तिच्या सिगारेट केस ला लायटर जोडलेला आहे.त्यामुळे ती त्यानेच पेटवते.” “ तू ती केस बघितली आहेस की कोणाकडून ऐकलं आहेस फक्त?” “ बघितली आहे अनेकदा. त्या संध्याकाळी पण आणि या पूर्वी ही अनेकदा. पण तेव्हा मला ...अजून वाचा

22

होल्ड अप - प्रकरण 22

प्रकरण २२ “ ठीक आहे तर,शुक्रवारी मरुशिका मतकरी यांची उलट तपासणी चालू होती. त्यांना पुन्हा बोलवा ” न्या.एरंडे यांनी ला आज्ञा दिली.त्याने मरुशिका च्या नावाचा पुकारा दिला.मरुशिका सर्वांकडे पहात आणि न्यायाधीशांकडे स्मित हास्य करत पिंजऱ्यात आली. पाणिनी पटवर्धन उठून तिच्या दिशेने गेला. “ मागची साक्ष झाल्या नंतरच्या कालावधीत तुम्ही कामोद शी बोलणं केलंच असेल.” पाणिनी म्हणाला. “ नाही सर, मी नाही बोलले त्याच्याशी.कारण साक्षीदाराने आपली साक्ष इतर साक्षीदारांशी बोलणे अपेक्षित नसते.”-मरुशिका म्हणाली. “ पण आरुष काणेकरांबरोबर चर्चा केलीच असेल ना?” पाणिनी ने विचारलं. “ काही विशिष्ट मुद्द्यांवर बोललो आम्ही.” “ साक्ष देताना तू काय सांगणार आहेस याची चर्चा केलीस ...अजून वाचा

23

होल्ड अप - प्रकरण 23

होल्ड अप प्रकरण २३ मरुशिका चा जळफळाट झाला. “हो. ” ती नाईलाजाने म्हणाली. “ आता मी जे बोलणार आहे,त्यात गोंधळ आणि चूक व्हायला नको आहे मला, समजुतीत.” पाणिनी म्हणाला. “ पुढच्या कोणत्याही साक्षीत जर असं सांगितलं गेलं की तुमच्या कडे दरोड्याच्या वेळी चंदेरी सिगारेट केस होती, तर ती साक्ष चुकीची समजण्यात येईल.बरोबर आहे?” पाणिनी ने विचारलं. “ पटवर्धन, तुम्ही एका विशिष्ट सिगरेट केस बद्दल बोलताय.” मरुशिका म्हणाली. “ मला वाटलंच होतं की तुम्ही आता अशी पलटी माराल म्हणून. तुम्हाला मी पुन्हा विचारतो, पुढच्या कोणत्याही साक्षीत जर असं सांगितलं गेलं की तुमच्या कडे दरोड्याच्या वेळी कोणतीही सिगारेट केस होती, तर ...अजून वाचा

24

होल्ड अप - प्रकरण 24

“ मला कशाने धक्का बसेल आणि कशाचा फायदा होईल हे तुम्ही मला सुचवायची गरज नाही,तुम्ही स्वतःच्या पायाखालची वाळू घसरत ना तेवढच बघा.” पाणिनी म्हणाला. आणि बाहेर पडला........ (प्रकरण २३ समाप्त.) पुढे चालू.... होल्ड अप प्रकरण २४ “ सरकार विरुध्द इनामदार हा खटला पुढे चालू करा.” एरंडे म्हणाले. “ सकृत दर्शनी असं दिसतंय युअर ऑनर की मला हवा असलेला साक्षीदार आज दुपारी तीन वाजे पर्यंत इथे हजर राहू शकेल.पण मी आधी म्हणालो त्या नुसार मला आरोपीला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आणायचंय पण टे अगदी शेवटचा साक्षीदार म्हणून आणि त्यानंतर मेहेरबान कोर्टावर मी निर्णय सोपवणार आहे.पण त्या आधी मला सिया माथूर ची तपासणी ...अजून वाचा

25

होल्ड अप - प्रकरण 25

होल्ड अप प्रकरण २५ “ तुम्ही हरकत घेताय?” एरंडेनी विचारलं. “ होय.” काणेकर म्हणाला. “ ओव्हररुल्ड.” “ आणि मरुशिका, या मजकुराचा उपयोग आजच्या तुमच्या सकाळच्या सत्रातील साक्षीसाठी आणि उलट तपासणीसाठी केलात?” पाणिनी ने विचारलं. “ मला सारखं सारखं ऑब्जेक्शन घ्यायला नको वाटतंय,युअर ऑनर पण या प्रश्नांसाठी काहीही आधार नाही. पुराव्यात नसलेल्या बाबींवर प्रश्न विचारले जात आहेत. मिस्टर कामोद यांनी काहीतरी खरडून एखादआ कागद मरुशिका यांचेकडे दिलं म्हणून त्या त्यांची साक्ष त्यातील मजकुराच्या आधारावर देत आहेत आणि स्वतःच्या स्मरण शक्तीच्या आधारावर देत नाहीयेत असं समजणे योग्य नाही. उदाहरणार्थ, त्याने समजा त्या कागदावर लिहिलं असतं की, आरोपी महाजन यानेच मला बंदूक ...अजून वाचा

26

होल्ड अप - प्रकरण 26

होल्ड अप प्रकरण २६ “तुम्हाला फेर तपासणी घ्यायची आहे?” आरुष ला एरंडे यांनी विचारलं. “ हो.” आरुष म्हणाला.आणि साक्षीदाराकडे “ मला समजल्यानुसार अत्ता तरी तुम्हाला माहिती नाहीये की तुम्ही मारुशिका व्हिला ला फोन लावलात की नाही.सहाजिकच आहे कारण हे घडून बरेच दिवस झालेत.म्हणूनच तुम्ही अशी भूमिका घेतल्ये की तुम्हाला आठवत नाहीये, बरोबर आहे की नाही?” “ अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते.”-कामोद म्हणाला. “ दॅट्स ऑल युअर ऑनर.” आरुष काणेकर खुष होवून म्हणाला. “ एक मिनिट, कामोद.” पाणिनी म्हणाला “ त्या वेळी घडलेले अन्य सर्व प्रसंग तुम्हाला लख्ख आठवताहेत, बरोबर ना?” पाणिनी ने विचारलं. “ होय.”—कामोद “ म्हणजे कोणत्या ...अजून वाचा

27

होल्ड अप - प्रकरण 27

होल्ड अप प्रकरण २७ कोर्टाच्या मागच्या बाजूला एकदम गलका झाला. पाणिनी ने मागे वळून पाहिले तर गौतम पिसे ला कनक येताना दिसला.त्या मागोमाग लेडीज कॉन्स्टेबल ज्योतिर्मयी सुखात्मे ला घेऊन येतांना पाणिनी ला दिसली. “ युअर ऑनर बचाव पक्षातर्फे मी आणखी दोनच साक्षीदार कोर्टासमोर आणू इच्छितो, सिया माथूर इथे येई पर्यंत. या दोघांनाही बचाव पक्षातर्फे समन्स दिले गेले आहे आणि ते अत्ता कोर्टात हजर आहेत. ” पाणिनी म्हणाला “ ठीक आहे.कोण आहेत ते दोन साक्षीदार? ” न्यायाधीशांनी विचारलं. “ त्यापैकी पहिला आहे गौतम पिसे.” न्यायाधीशांनी बेलीफ ला सांगून गोतम ला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं रहायला सांगितलं. “ गौतम, आपली प्रथम भेट ...अजून वाचा

28

होल्ड अप - प्रकरण 28

होल्ड अप प्रकरण २८ “ तुम्हाला काही विचारायचं आहे? ” न्यायाधीशांनी काणेकर ना विचारलं.तेवढयात कोर्टाच्या मागे पुन्हा गलका झाला पाणिनी ला दिसलं की एका तरुणीला घेऊन लेडी कॉंन्स्टेबल आत शिरत होती. “ मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे आरोपी इनामदार चा संबंध आम्ही अजून खुनाशी लावलेला नाही.त्यामुळे त्या गाडीत कोण बसले होते या बद्दल सुखात्मे काय म्हणते याच्याशी मला काही घेणे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पटवर्धन ना हवी असलेली सिया माथूर इथे अत्ता हजर झाली आहे.” काणेकर म्हणाला. पाणिनी म्हणाला, “मी पिसेच्या साक्षीचे वेळी पिसे ला जे पॅड हातात धरायला दिले होते त्यावरचे ठसे आईना हॉटेल मधे तो उतरलेल्या रूम मधे ...अजून वाचा

29

होल्ड अप - प्रकरण 29 - अंतिम भाग

होल्ड अप प्रकरण २९ ( शेवटचे प्रकरण. ) “ काणेकर, तुम्हाला काय विचारायचं आहे?” –एरंडे. “ मला या संपूर्ण हरकत नोंदवायची आहे. मूळच्या होल्ड अप च्या गुन्ह्याशी काहीही सबंध नसलेली ही साक्ष आहे.पटवर्धन यांनी पूर्ण पढवून तयार केलेली ही साक्षीदार आहे.बचाव पक्षाला हवयं ते बोलणारी आणि सरकार पक्षाच्या साक्षीदारांना वेगळ्याच प्रकरणात गोवू पाहणारी.” काणेकर म्हणाला. “ तुम्हाला काय म्हणायचंय, पाणिनी पटवर्धन यांच्या ताब्यात ही साक्षीदार होती? ” एरंडे म्हणाले. “ नक्कीच युअर ऑनर.केवळ पटवर्धन म्हणतात की ती त्यांच्या ऑफिस मधून पळून गेली.कशावरून पटवर्धन यांनीच तिला लपवून ठेवलं नसेल? ” –काणेकर. “ मिस्टर काणेकर, मी स्वतः तुमच्या आणि पटवर्धन यांच्या ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय