लहानपणी आजोबांनी सांगितलेली गोष्ट. आफ्रिका खंडातील बऱ्याच देशात काळ्या जादूचा उपयोग वर्षानुवर्षे चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी केला जातो. या लोकांचा त्यांच्या काळ्या जादूवर फार विश्वास असतो. बऱ्याच वेळा ती अंधश्रद्धाच असते पण काही लोकांनां त्यांच्या पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरांचा चांगला अभ्यास असतो आणि हे लोक त्यांची अघोरी विद्या पण कशी वापरावी हे जाणून असतात. घाना या देशावर अगोदर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी या देशातील लोक गोऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करत असत. अशाच एका थॉमस हार्बीन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या शेतावर माम्बो नावाचा एक स्थानिक युवक काम करत होता. माम्बो कामात चांगला होता पण त्याला एक वाईट सवय होती कि तो दिवसेंदिवस कामावरून गैरहजर राहायचा. थॉमसने बऱ्याच वेळा त्याबद्दल त्याला खडसावले होते आणि त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. प्रत्येक वेळी माम्बो त्याला असे परत होणार नाही असे आश्वासन देऊन कामावरून न काढण्यासाठी विनवणी करायचा. पण एके दिवशी कंटाळून थॉमसने त्याला कामावरून काढून टाकले आणि पुन्हा त्या शेतावर न दिसण्याचा आदेश दिला. माम्बोला याचा फार राग आला होता आणि त्याच्या भाषेत जोरजोरात शिव्या देत तो तिथून निघून गेला.
अघोरी सूड - भाग १
लहानपणी आजोबांनी सांगितलेली गोष्ट. आफ्रिका खंडातील बऱ्याच देशात काळ्या जादूचा उपयोग वर्षानुवर्षे चांगल्या आणि वाईट गोष्टींसाठी केला जातो. या त्यांच्या काळ्या जादूवर फार विश्वास असतो. बऱ्याच वेळा ती अंधश्रद्धाच असते पण काही लोकांनां त्यांच्या पिढीजात चालत आलेल्या रूढी परंपरांचा चांगला अभ्यास असतो आणि हे लोक त्यांची अघोरी विद्या पण कशी वापरावी हे जाणून असतात.घाना या देशावर अगोदर ब्रिटिशांचे राज्य होते. त्यावेळी बऱ्याच ठिकाणी या देशातील लोक गोऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतावर मजूर म्हणून काम करत असत. अशाच एका थॉमस हार्बीन नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या शेतावर माम्बो नावाचा एक स्थानिक युवक काम करत होता. माम्बो कामात चांगला होता पण त्याला एक वाईट सवय ...अजून वाचा
अघोरी सूड - भाग २
थॉमस फार घाबरला होता. त्याने ठरवले कि आता प्रत्येक वेळी शेतावर जाताना आपली शॉटगन बरोबर ठेवायची आणि एखाद्या नोकराला घेऊन जायचं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तो शॉटगन आणि एका कोडझो नावाच्या नोकराला बरोबर घेऊन शेताची पाहणी करायला गेला. त्या दिवशी सुद्धा त्याला ते डुक्कर दिसले. त्याने लगेच त्याची शॉटगन काढून एक गोळी त्या डुकरावर मारली. थॉमस चा निशाणा अचूक होता तरीपण त्या डुकराला काही झाले नाही. थॉमस ने पटकन गन लोड करून आणखीन एक गोळी झाडली. तरीपण डुकराला काही झाले नाही. बरोबर आलेला नोकर तर पुरता भांबावला होता. थॉमस भयभीत होऊन त्याच्याकडे पाहू लागला. थॉमस ने नोकराला विचारले "कोडझो, तुला ...अजून वाचा