हरिश्चंद्रगडावर

(7)
  • 28.3k
  • 3
  • 13.6k

केदारनाथ ट्रेक करून आल्यानंतर दोन तीन आठवडे सर्दी आणि खोकल्याने सगळे बेजार झालो होतो.जरा कुठे बरं वाटायला लागले नाही तर लगेच नवऱ्यानं जाऊया का एखाद्या ट्रेकला.?"अरे, आताशी कुठं थोड बरं वाटतंय. पुढच्या महिन्यात जाऊया. तुला जायचं असेल तर तू जा."माझं हे निर्वाणीच बोलणं ऐकून आमच्या साहेबांनी चेहरा पाडला."तुला माहीत आहे . मी एकटा तुझ्याशिवाय ट्रेकला जात नाही. राहुदे, बघू पुन्हा कधीतरी."स्वारी अशी बोलली खरी . पण चेहरा उतरलेलाच होता."बरं बाबा, चल जाऊया. पण जरा सोप्पा ट्रेक बघ."पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून राजे लगेच ट्रेकग्रुप वर येत्या आठवड्यातील अपडेट पाहू लागले."हरिश्चंद्रगड जाऊया. पाचनाई मार्गे आहे. मार्ग जास्त अवघड नाहीये आणि आपण

Full Novel

1

हरिश्चंद्रगडावर - भाग 1

केदारनाथ ट्रेक करून आल्यानंतर दोन तीन आठवडे सर्दी आणि खोकल्याने सगळे बेजार झालो होतो.जरा कुठे बरं वाटायला लागले नाही लगेच नवऱ्यानं जाऊया का एखाद्या ट्रेकला.?"अरे, आताशी कुठं थोड बरं वाटतंय. पुढच्या महिन्यात जाऊया. तुला जायचं असेल तर तू जा."माझं हे निर्वाणीच बोलणं ऐकून आमच्या साहेबांनी चेहरा पाडला."तुला माहीत आहे . मी एकटा तुझ्याशिवाय ट्रेकला जात नाही. राहुदे, बघू पुन्हा कधीतरी."स्वारी अशी बोलली खरी . पण चेहरा उतरलेलाच होता."बरं बाबा, चल जाऊया. पण जरा सोप्पा ट्रेक बघ."पडत्या फळाची आज्ञा शिरसावंद्य मानून राजे लगेच ट्रेकग्रुप वर येत्या आठवड्यातील अपडेट पाहू लागले."हरिश्चंद्रगड जाऊया. पाचनाई मार्गे आहे. मार्ग जास्त अवघड नाहीये आणि आपण ...अजून वाचा

2

हरिश्चंद्रगडावर - भाग 2

रात्री कुठं कुठं गाडी थांबली रस्त्यावर किती ट्रॅफिक जाम लागली याचा मला जराही थांगपत्ता लागला नाही. पहाटे पहाटे कुठंतरी थांबली होती. बहुतेक फॉरेस्ट चेकपोस्ट असावं .. हळूच खिडकीची काच सरकवून बाहेरचा अंदाज घेऊ लागले. सपकन पावसाची एक सर तोंडावर आली. बाहेर पावसाची संततधार सुरूच होती. मी बसमध्ये पाठी वळून बघितले तर रात्री जागुया म्हणणारे हवशे गवशे मस्त गाढ झोपेत होते. साधारण तासभरात आम्ही पाचनाईला पोहचलो. बस पार्किंग करत असताना तिथं अगोदरपासूनच उभ्या असलेल्या बसेस आणि कार बघून आज गडावर नक्कीच जत्रा भरणार याची खात्री पटली.हल्ली त्या इंस्टाग्रामवर रिल्स टाकून स्वतःचे फॉलोअर्स वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणाईचा कल गड किल्ल्यांवर वाढू लागला ...अजून वाचा

3

हरिश्चंद्रगडावर - भाग 3

गडावरील मंदिरांचा समूह प्राचीन आणि पाहण्यासारखा आहे. आदिदैवत हरिश्चंद्रेश्वराचे अतिशय देखणे हेमाडपंथी मंदिर असून आजूबाजूला इतर देवीदेवतांची दगडी बांधकाम मंदिरे आहेत. मंदिर परिसरात भली मोठी पुष्करणी आहे. आवारात एक गणेशमंदिर असून आतील गणेशमूर्ती अतिशय भव्य व देखणी आहे या मंदिर समूहातील प्रमुख आकर्षण असलेलं केदारेश्वर मंदिर मुख्य मंदिरापासून थोड खाली उतरून गेल्यावर आहे.आता मी प्रमुख आकर्षण म्हणतेय म्हणजे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल या मंदिराचे काहीतरी खास वैशिष्टय असले पाहिजे.अगदी बरोबर ओळखलं तुम्ही सर्वांनी. शिवाची अवाढव्य दगडी पिंड ( कमीत कमी दोन पुरुष उंचीची) एका गुहेत चहू बाजूंनी पाण्याने वेढलेली आहे. पिंडीच्या चारही कोपऱ्यात चार दगडी खांब असावेत त्यातील ...अजून वाचा

4

हरिश्चंद्रगडावर - भाग 4

कोकणकडा म्हणजे सह्याद्रीतील एक सुंदर आविष्कार .सुंदर तेवढाच थरारक आणि रौद्र. साधारण अर्धा किलोमीटर परीघ असलेला हा कडा एखाद्या आकाराचा आहे. याचं सौंदर्य पाहायचे असेल तर पावसाळ्यानंतर धुकं नसताना जावे. इथून कोकणचे दर्शन होते म्हणून याला कोकणकडा म्हणत असावेत बहुतेक.गडावरील मंदिरापासून अर्धा तास चाललो की आपण कोकणकड्यावर पोहचतो. ऐन पावसाळ्यात दाट धुकं आणि आजूबाजूचे घनदाट जंगल त्यामुळे सोबत गाईड असावा. मी आणि अनिल अगदी रमतगमत बागेत फिरायला आल्यासारखं फोटो काढत व्हिडिओ बनवत चाललो होतो. तेवढ्यात आजूबाजूला कोणीच नाही हे आमच्या लक्षात आलं. सगळे पुढं निघून गेले होते. तसं काही आम्ही घाबरलो नव्हतो. पण आमचा चालण्याचा वेग सांगत होता आमची ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय