श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत) म्हणून पाठवले. अंगदाने रावणाच्या सभेत (राजदरबार) जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले, पण रावणाने ते ऐकले नाही. व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे. श्रीराम सेतू पार करून लंकेत पोहोचले. तेंव्हा त्यांनी सर्वाना विचारले की आता पुढे काय करायचे ते सांगा. सर्वजण म्हणाले की युद्ध करून लंकानाथाला सैन्यासह मारावे. तेव्हा श्रीराम म्हणाले की राजधर्माला व शास्त्राला अनुसरूनच कार्य करावे त्यामुळेच परमार्थ साधला जातो. त्याप्रमाणे आपला दूत लंकेला पाठवावा.

Full Novel

1

अंगद शिष्टाई - भाग १

अंगद शिष्टाई - संत एकनाथ.श्रीराम सैन्यासह लंकेत पोहोचले. राजधर्माला अनुसरून त्यांनी रावणाकडे अंगद याला वकील (राजदूत) म्हणून पाठवले. अंगदाने सभेत (राजदरबार) जाऊन त्याला सीतेला परत पाठविण्याविषयी सांगितले, पण रावणाने ते ऐकले नाही. व अंगद श्रीरामांकडे परत आला. या प्रसंगाचे वर्णन यामध्ये केले आहे.श्रीराम सेतू पार करून लंकेत पोहोचले. तेंव्हा त्यांनी सर्वाना विचारले की आता पुढे काय करायचे ते सांगा. सर्वजण म्हणाले की युद्ध करून लंकानाथाला सैन्यासह मारावे. तेव्हा श्रीराम म्हणाले की राजधर्माला व शास्त्राला अनुसरूनच कार्य करावे त्यामुळेच परमार्थ साधला जातो. त्याप्रमाणे आपला दूत लंकेला पाठवावा. तेव्हा वानर म्हणाले की त्यानी सीता चोरून नेली व आपणच दूत पाठवायचा हे ...अजून वाचा

2

अंगद शिष्टाई - भाग २

हे अंगदाचे मर्मभेदक असे बोलणे ऐकून रावण स्वत: बोलला. तू राजवाड्याच्या दरवाजाच्या मार्गाने न येता दुसऱ्याच मार्गाने आलास यामुळे मौन राहिलो होतो. असे चुकीच्या मार्गाने आलेल्याशि संभाषण करणे आम्हाला दुषणास्पद आहे. अंगदाला हे बोलणे ऐकून हसू आले व तो म्हणाला समोरच्या व्यक्तिचे अवगुण तुम्हाला दिसतात पण स्वत:चे अवगुण दिसत नाहीत. खरे तर चोरी करणे अधर्म आहे, त्यातून परदारा हरण हे तर मोठें पाप आहे. तू पापी आहेस. तुझी तिन्ही लोकांत दुष्किर्ती झाली आहे. अंगद रागावलेला पाहून रावण घाबरला. राक्षस म्हणू लागले की हे तर मोठे संकट आहे. पहिल्या ने होळी केली आणि हा तर त्याहूनही बलवान वाटतो. राक्षस चळचळा ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय