अठ्ठ्याहत्तर एकरवर पसरलेले एक अनोखे बेट म्हणजे पाणखोल बेट! चाळीस एक घरे...सुमारे नव्वद माणसे बेटावर वस्तीला. सभोवार पाणी.... भन्नाट वारा...निळ्या आकाशात उडणारे सीगल पक्षी.किनाऱ्याला मासे टिपण्यासाठी टपून बसलेले बगळे. बेटावरून बाहेर जाण्या येण्यासाठी होडी शिवाय दुसरा पर्याय नाही.प्रत्येक कुटुंबाची स्वतःची होडी.या होडीतून मुलांचं शाळेत जाणं व येणं तसच मालवणला बाजारासाठी जाणं येणे होते.बाहेरच्या माणसाला बेटावर जायचं असेल तर बेटावरूनच एखाद्या होडीवाल्याला बोलवावं लागत. मी व अशोक(माझा मित्र) बेटाजवळ गेलो तेंव्हा आमचा नावाडी(बावकर) तिथे धक्क्यावर हजर होता.पाणखोलच्या खाडीकडे पोहचेपर्यंत पावणेतीन वाजले होते.पोटातले कावळे कोकलून मलूल पडले होते.पण समोरच दृश्य बघितल्यावर डोळ्यांची व पोटाची भूक उलट वाढली .उन्हात चमकणार पाणी...बेभान वारा...बेटाला कवटाळून बसलेली माडाची झाड...पाणी कापत एक होडी चालली होती. बहुधा बेटावरच एक कुटुंब होडीतून मालवणला चाललं होतं.

1

योगीनींचा बेट - भाग १

योगीनींचे बेटभाग१- बेटावरची कातळ शिल्पेअठ्ठ्याहत्तर एकरवर पसरलेले एक अनोखे बेट म्हणजे पाणखोल बेट! चाळीस एक घरे...सुमारे नव्वद माणसे बेटावर पाणी.... भन्नाट वारा...निळ्या आकाशात उडणारे सीगल पक्षी.किनाऱ्याला मासे टिपण्यासाठी टपून बसलेले बगळे. बेटावरून बाहेर जाण्या येण्यासाठी होडी शिवाय दुसरा पर्याय नाही.प्रत्येक कुटुंबाची स्वतःची होडी.या होडीतून मुलांचं शाळेत जाणं व येणं तसच मालवणला बाजारासाठी जाणं येणे होते.बाहेरच्यामाणसाला बेटावर जायचं असेल तर बेटावरूनच एखाद्या होडीवाल्याला बोलवावं लागत. मी व अशोक(माझा मित्र) बेटाजवळ गेलो तेंव्हा आमचा नावाडी(बावकर) तिथे धक्क्यावर हजर होता.पाणखोलच्या खाडीकडे पोहचेपर्यंत पावणेतीन वाजले होते.पोटातले कावळे कोकलून मलूल पडले होते.पण समोरच दृश्य बघितल्यावर डोळ्यांची व पोटाची भूक उलट वाढली .उन्हात चमकणार पाणी...बेभान ...अजून वाचा

2

योगीनींचा बेट - भाग २

योगीनींचे बेट भाग २योगीनिंचे बेट दुसर्या दिवशी सकाळी नाष्टा झाल्यावर मी व अशोक बाळा खोत व त्या भ्रमिष्ट झालेल्या घरी गेलो.त्यांच्या कुटुंबियांकडून फारशी माहिती कळली नाही.मग आम्ही आमचा मोर्चा कातळ शिल्पंकडे वळवला. वर पोहचल्यावर मी सर्वत्र नजर फिरवली.सगळीकडे शांतता होती मंद वरा होता.वाळू काढणारी होडकी खाडी परिसरात दिसत होती." अशोक ,तू यातल्या प्रत्येक शिल्पाचा जवळून फोटो घे" मी अशोकला सुचवले.मी प्रत्येक शिल्पं बारकाईने न्याहाळत पुढे सरकत होतो.माझ्या टिपण वहीत टिपण काढत होतो.त्यातल्या वेगळेपणाची नोंद घेत होतो.मी त्या अवकाशयाना सारख्या दिसणाऱ्या आकृतीकडे पोहचलो.त्याचे खालचा ,मधला व वरचा तीन भाग पडत होते. कदाचित वरच्या भागात अवकाश यात्री बसत असावेत.अर्थात त्याची आतली ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय