भुगोल सूर्य, चंद्र , राजवंशाची माहिती ऐकल्यावर ऋषींनी रोमहर्षणा ना विनंती केली की आम्हांला जगाच्या भूगोला बद्दल सांगा. रोमहर्षण म्हणाले पृथ्वी ७ द्विपांमधे विभागली आहे. त्यांची नावे जंबुद्विप, प्लक्शद्विप, शाल्मली द्विप, कुशद्विप, क्रौंच द्विप, शाक द्विप आणि पुष्कर द्विप. ही द्विपे सात समुद्रांनी वेढली आहेत. ते समुद्र म्हणजे लवण, इक्शु, सुर, सर्पी, दधी, दुग्ध, जल. जंबुद्विप हे मध्य भागी आहे. व त्याच्या बरोबर मधे सुमेरू पर्वत आहे. सुमेरूच्या दक्षिणेला हिमवन, हेमकुट, निषाद पर्वत आहेत. उत्तरेला नील, श्वैत, श्रींगी पर्वत आहे. जंबुद्विप काही प्रदेशात विभागले आहे. त्याना वर्ष असे म्हणतात. इलावृत वर्ष,भरत वर्ष, भद्र वर्ष, केतुमल वर्ष, हरी वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्मय, व कुरू वर्ष. सुमेरूच्या टोकाला ब्रह्माचे स्थान आहे. तिथुन गंगा येउन चार प्रवाहामध्ये विभागली जाते. सीता पुर्वेला, चक्षु पश्र्चिमेला, भद्र उत्तरेकडे व अलकनंदा दक्षिणेला. भरतवर्षामधे सात पर्वत रांगा आहेत. त्या म्हणजे -महेंद्र, मल्य, सह्य, शुक्तिमान, रिक्ष, विंध्य आणि परीयात्रा.
पुराणातील गोष्टी - 1
पुराणातील गोष्टीभुगोलसूर्य, चंद्र , राजवंशाची माहिती ऐकल्यावर ऋषींनी रोमहर्षणा ना विनंती केली की आम्हांला जगाच्या भूगोला बद्दल सांगा. रोमहर्षण पृथ्वी ७ द्विपांमधे विभागली आहे. त्यांची नावे जंबुद्विप, प्लक्शद्विप, शाल्मली द्विप, कुशद्विप, क्रौंच द्विप, शाक द्विप आणि पुष्कर द्विप. ही द्विपे सात समुद्रांनी वेढली आहेत. ते समुद्र म्हणजे लवण, इक्शु, सुर, सर्पी, दधी, दुग्ध, जल.जंबुद्विप हे मध्य भागी आहे. व त्याच्या बरोबर मधे सुमेरू पर्वत आहे. सुमेरूच्या दक्षिणेला हिमवन, हेमकुट, निषाद पर्वत आहेत. उत्तरेला नील, श्वैत, श्रींगी पर्वत आहे. जंबुद्विप काही प्रदेशात विभागले आहे. त्याना वर्ष असे म्हणतात. इलावृत वर्ष,भरत वर्ष, भद्र वर्ष, केतुमल वर्ष, हरी वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्मय, ...अजून वाचा
पुराणातील गोष्टी - 2
पुराणातील गोष्टी २प्रिथु राजा.ब्रह्मांनी स्वतः प्रिथुला राजाचा मुकुट घातला. याचवेळी इतर भागांचे पण राजेपद दिले. सोम हा वनस्पती, झुडुपे,नक्षत्रे, तर वरुण सुर्यांचा, आदित्यांचा, अग्नी वसुंचा, यम पितर व वंशजांचा, शिव हा यक्ष,राक्षस, पिशाच्चांचा, तर हिमालय पर्वतांचा. समुद्र सर्व नद्यांचा, चित्ररथ हा गंधर्वांचा, वासुकी नागांचा, तक्षक सर्पांचा, गरुड पक्षांचा, वाघ हरिणांचा, ऐरावत हत्तींचा, उच्चश्रवा घोडे गायी बैल यांचा, अश्वथ्थ झाडांचा राजा झाला. ब्रह्मांनी चार दिशांचे दिक्पाल पण नेमले. पुर्वैचा सूधन्वा, पश्चिमेचा केतुमान, दक्षिणेचा शंखपाद, उत्तरेला हिरण्यरोम.प्रिथु राजाने त्याच्या बाणाने जमीन समांतर केली. ही मैदाने गावांना शेती, गुरांना सांभाळण्यासाठी वापरता येऊ लागली. पर्वत इतस्ततः पसरले होते ते निवडक ठिकाणी ठेवले. राजाने ...अजून वाचा
पुराणातील गोष्टी - 3
श्वेतमाधव मंदिर - Girish सत्ययुगात श्वेत नावाचा राजा होता. तो इतका पुण्यवान होता की , त्याच्या राज्यात लोक दहा वर्षे जगत. बाल मृत्यू होत नसत. त्याच्या राज्यात कपालगौतम नावाचे ऋषी राहत होते. त्यांचा मुलगा लहान असतानाच मृत्यू पावला. ऋषी राजाकडे शव आणले. राजा म्हणाला, मी मुलाला एका सप्ताहात जिवंत करू शकलो नाही तर अग्नीप्रवेश करीन. त्याने महादेवांची अकराशे कमळांनी पूजा केली. महादेव प्रसन्न झाले व त्या मुलाला जिवंत केले. श्वेत राजाने खूप वर्षे राज्य केले. पुरुषोत्तम क्षेत्रात त्याने विष्णुंचे मंदिर बांधले. ही मूर्ती चंद्रासारखी शुभ्र होती. हे मंदिर " श्री श्वेतमाधव मंदिर " म्हणून प्रसिद्ध झाले. इंद्रद्युम्नाने या क्षेत्रात ...अजून वाचा
पुराणातील गोष्टी - 4
पुराणातील गोष्टी.कुबेर.कुबेर हा विश्रवाचा मोठा मुलगा होता. विश्रवाला दोन पत्नी होत्या. दुसरी पत्नी राक्षस होती. तिने रावण, कुंभकर्ण व जन्म दिला. कुबेराचे लंकेवर राज्य होते. कुबेराचे आपल्या चुलत भावांशी चांगले संबंध होते. पण रावणाच्या आईला तीच्या मुलांचे कुबेराबरोबर राहणे पसंत नव्हते.तीने मुलांना बोलावून सांगितले की तुम्ही हे कांय करीत आहात. कुबेर देव आहे, तुम्ही राक्षस आहात. राक्षस व देवांचे वैर आहे. कुबेराचे वैभव पहा. तुमच्याकडे तसे कांहीं आहे का ?.आपले श्रेष्ठत्व कसे वाढेल पाहा.आईने असे सांगितल्यानुसार रावण, कुंभकर्ण, बिभीषण तपस्या करण्यासाठी निघून गेले. त्यांनी आपल्या प्रार्थनेंने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि वर मागून घेतला की लंकेचे राज्य मीळावे.रावणाने वर ...अजून वाचा
पुराणातील गोष्टी - 5
गरुड पुराणगरुड पुराणात नवग्रह, ज्योतिष शास्त्र, मुहुर्त, मंत्र इत्यादी माहिती आहे.जो कोणी योग्य विधी व नियमानुसार नवग्रहांची पुजा करतो चार पुरुषार्थ प्राप्त होतात. एक धर्म. दोन अर्थ . तीन काम. चार मोक्ष. आणि त्यासाठी खालील मंत्र सांगितले आहेत. सूर्य -ओम ह्राम ह्रीम सह सूर्याय नमः .चंद्र- ओम सोमाय नमःमंगळ -ओम भौमाय नमः .बुध -ओम बुधाय नमःब्रहस्पती- ओम नमो बृहस्पतये नमः .शुक्र -ओम शुक्राय नमःशनि -ओम शनैश्चराय नमः .राहू -ओम राहवे नमः .केतू -;ओम केतवे नमःमहादेवांच्या पूजेसाठी ओम ह्रां शिवाय नमः. शरीराच्या भागाशी संबंधित असलेले मंत्र. ओम ह्रां हृदयाय नमः . ओम ह्रीं शिरसे स्वाहा. ओम ह्रुं शिखाये वषट. इत्यादी.आसन ...अजून वाचा