पुराणातील गोष्टी - 5 गिरीश द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पुराणातील गोष्टी - 5

गरुड पुराण 
गरुड पुराणात नवग्रह, ज्योतिष शास्त्र, मुहुर्त, मंत्र इत्यादी माहिती आहे.
जो कोणी योग्य विधी व नियमानुसार नवग्रहांची पुजा करतो त्याला चार पुरुषार्थ प्राप्त होतात. एक धर्म. दोन अर्थ . तीन काम. चार मोक्ष. आणि त्यासाठी खालील मंत्र सांगितले आहेत. सूर्य -ओम ह्राम ह्रीम सह सूर्याय नमः .
चंद्र- ओम सोमाय नमः 
मंगळ -ओम भौमाय नमः . 
बुध -ओम बुधाय नमः
ब्रहस्पती- ओम नमो बृहस्पतये नमः .‌
शुक्र -ओम शुक्राय नमः
शनि -ओम शनैश्चराय नमः .
राहू -ओम राहवे नमः .
केतू -;ओम केतवे नमः
महादेवांच्या पूजेसाठी ओम ह्रां शिवाय नमः.
  शरीराच्या भागाशी संबंधित असलेले मंत्र. ओम ह्रां हृदयाय नमः . ओम ह्रीं शिरसे स्वाहा. ओम ह्रुं शिखाये वषट. इत्यादी.
आसन मंत्र - विष्णू - ओम वासुदेव आसनाय नमः हा मंत्र म्हणून नंतर ओम वासुदेवाय मूर्तये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम ऐम ओम नमो भगवते संकर्षणाय नमः ,, ओम ऐम ओम नमो भगवते प्रद्युन्माय नमः ओम नमो भगवते अनिरुद्धाय नमः इ. मंत्र सांगितले आहेत.
सरस्वती देवीच्या आराधने साठी ओम ह्रीं सरस्वत्यै नमः लक्ष्मी आराधनेसाठी ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र म्हणावा.
योग - अमृत योग - ज्या दिवशी असतो तो दिवस सर्व कामांसाठी शुभ मानला जातो. विष योग असेल तो दिवस शुभ कामासाठी वर्ज्य मानला जातो .
ग्रहदशा - सूर्यदशा जातकासाठी त्रासदायक घटनांची असते चंद्रदशा आनंददायी घटनांची असते. मंगळदशा अशुभ तर बुधदशा शुभ फळांची असते शनी दशा वाईट परिणामांची असते गुरुदशा शुभ असते राहू दशा अशुभ तर शुक्रदशा शुभ असते.
रत्ने, हिरे-
पूर्वी बलासुर नावाचा राक्षस होता. त्याने देवांना जिंकले होते , पण त्याने यज्ञ करण्यास परवानगी दिली होती तसेच यज्ञासाठी लागणारे सर्व सहकार्य करण्याची करण्याचे वचन दिले होते. देवतांनी एकदा यज्ञ प्रारंभ केला ,पण बळी देण्यासाठी योग्य असे कोणताही प्राणी मिळत नव्हता म्हणून त्यांनी बलासुराला विनंती केली की तू स्वतःला बली म्हणून अर्पण करावे ही विनंती त्याने दिलेल्या वचनानुसार मान्य केली आणि त्याचा बळी दिल्यानंतर त्याच्या शरीराचे रूपांतर रत्न व हिरे या मध्ये झाले. देवतांनी त्याचे हे रत्न हिरेजडीत शरीर आकाश मार्गे सुरक्षित ठिकाणी नेण्याचा प्रयत्न केला, पण अचानक ते शरीर अगणित रत्ने व हिऱ्यांच्या तुकड्यांमध्ये बदलले व ते सर्व तुकडे समुद्र नदी पर्वत जंगले इत्यादी ठिकाणी विखुरले गेले आणि कालांतराने बऱ्याच ठिकाणी रत्ने व हिऱ्यांच्या खाणी तयार झाल्या. वज्र, मुक्तमणी ,स्फटिक ,प्रवाळ , अशी अनेक रत्ने व हिरे पृथ्वीवर मिळू लागले .
सूत म्हणाले आता यात्रेची ठिकाणे सांगतो. गंगा नदीचा किनारा सर्वात पवित्र ठिकाण आहे . जरी गंगा नदी जेथून वाहते ती सर्व ठिकाणे पवित्र असली तरी प्रयाग हरिद्वार वाराणसी आणि गंगा जेथे समुद्राला मिळते ते ठिकाण जास्त पवित्र आहे. अशा पवित्र ठिकाणी पिंडदान करणे इतरांसाठी तसेच पिंडदान करणाऱ्यांसाठी पण मुक्ती दायक आहे. 
वाराणसी मध्ये विष्णू व महादेव दोघांचाही निवास आहे. कुरुक्षेत्रामध्ये दान करण्याने पुण्य मिळते. अयोध्या, चित्रकूट, गोमती, श्रीशैल ,अमरकंटक ,उज्जैन ,मथुरा, गोवर्धन पुष्कर ही क्षेत्रे पवित्र आहेत
गया-
पूर्वीच्या काळी गया नावाचा राक्षस होता तो देवतांना त्रास देत असे म्हणून देव विष्णूकडे गेले व विष्णूंनी त्याचा वध केला . गयासुराचा जेथे वध केला ते स्थान गया म्हणून ओळखले जाते. त्या ठिकाणी गदाधराची मूर्ती असलेले देऊळ आहे. 
 श्राद्धासाठी गया हे चांगले स्थान आहे क्रियाकर्म न झालेले, प्राण्यांनी हत्या केलेले, अपघाती निधन झालेले, अशा लोकांचे शास्त्रशुद्ध श्राद्ध गयेमध्ये केल्यास त्यांना स्वर्ग प्राप्ती होते. गयेमध्ये स्वतः विष्णू पितृ देवता म्हणून निवास करतात त्यामुळे त्यांच्या कृपेने माणूस मुक्त होतो. पिंडदानाने मुक्ती मिळते.
पूर्वी एका गावात पुत्रहीन व्यापारी राहत होता तो यात्रेत असता त्याला एक भूत भेटले त्याने व्यापाऱ्याला विनंती केली की माझे गया येथे पिंडदान कर त्यामुळे मी या भूतयोनीतून मुक्त होईन व तुला पण नंतर स्वर्गप्राप्ती होईल त्याप्रमाणे व्यापारी गया येथे गेला व त्याने त्या भुतासाठी व त्याच्या मित्रांसाठी पिंडदान केले आणि त्या भुताला मुक्ती मिळाली. व्यापाऱ्याच्या या पुण्यकृत्यामुळे त्याला नंतर पुत्र झाल आणि तो सुखासमाधानाने राहू लागला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा विशाला नामक देशात राजा म्हणून पुनर्जन्म झाला. त्याचे लग्न झाल्यानंतर त्याला मूल होत नव्हते म्हणून त्यांनी गुरुंना विचारले तेव्हा गुरूंनी त्याला गये मध्ये पिंडदान करण्यास सांगितले व त्याला पुत्र प्राप्ती झाली . एकदा तो बागेत फिरत असता तीन आकृती आकाश मार्गे त्याच्यासमोर आल्या आणि त्या आकृती म्हणजे त्याचे वडील , आजोबा व पणजोबा होते ते त्याला म्हणाले की तू पिंडदान केल्यामुळे आम्हाला मुक्ती मिळाली आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानण्यासाठी आलो आहोत. असे गया तिर्थक्षेत्राचे महत्व आहे.