स्मशानी किल्ला

(5)
  • 12.4k
  • 0
  • 5.6k

तो किल्ला शापमुक्त झाला होता व त्या किल्ल्याला अतूल, सारंग व हेमलतानं शापमुक्त केलं होतं. त्यासाठी त्यांनी भुतांशी व भुतांना उठविणाऱ्यांशी लढाई केली होती जणू आपल्या जीवावर खेळून. त्यात प्रसंगी त्या तिघांनाही मृत्यूच आला असता. परंतु सुदैवं हे की त्या प्रसंगातून ते वाचले होते. तो किल्ला शापयुक्त किल्ला होता. तसं पाहिल्यास त्या किल्ल्यावर भुतं होती व ती भुतंच त्या किल्ल्यावर अधिवास करुन होती. आपला अधिकार जमवून होती. त्याला कारण होतं त्या किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांचं मरणं. त्या किल्ल्यावर राहणारे लोकं व त्या किल्ल्यावरील शासक उपासमारीनं मरण पावले होते. त्याचं कारण होतं किल्ल्याला वेढा पडणं. तो किल्ला सुखी होता व त्यामध्ये राहणारे लोकं व त्याच किल्ल्याच्या परीसरातील प्रजाही सुखीच होती. परंतु काळाचं दृष्ट्रचक्र त्या किल्ल्यावर चालून आलं व किल्ल्याला वेढा पडला.

1

स्मशानी किल्ला भाग 2

स्मशानी किल्ला भाग दोन हलधर सांगत होता आपली व्यथा. त्यानं कितीतरी माणसांचा बळी घेतला होता त्या किल्ल्यावर. परंतु आता जीव जाईल या यातनेनं तो तळपत होता व पोपटासारखा बोलत होता तो सारंग, हेमलता व अतूलसमोर. तसं पाहिल्यास दयाही येत होती त्याची. सारंग आणि हेमलता तर डोळे विस्फारून पाहात होते. तशी हेमलता म्हणाली, "आपण याची दया घेवूच नका. अहो आपण सोडून द्याल तर हा दुसऱ्याच किल्ल्यावर जावून तिथं आपलं बस्तान बसवेल आणि तिथंही पुन्हा भुताची खेळी खेळत पुन्हा लोकांना मुर्ख बनवेल व कित्येक लोकांचा बळी घेईल." ते हेमलताचं बोलणं. त्यावर विचार करतच होता अतूल. तोच हलधर म्हणाला, "नाही हो, मी ...अजून वाचा

2

स्मशानी किल्ला भाग 1

स्मशानी किल्ला (कादंबरी) भाग एक अंकुश शिंगाडे तो किल्ला शापमुक्त झाला होता व त्या किल्ल्याला अतूल, सारंग व हेमलतानं केलं होतं. त्यासाठी त्यांनी भुतांशी व भुतांना उठविणाऱ्यांशी लढाई केली होती जणू आपल्या जीवावर खेळून. त्यात प्रसंगी त्या तिघांनाही मृत्यूच आला असता. परंतु सुदैवं हे की त्या प्रसंगातून ते वाचले होते. तो किल्ला शापयुक्त किल्ला होता. तसं पाहिल्यास त्या किल्ल्यावर भुतं होती व ती भुतंच त्या किल्ल्यावर अधिवास करुन होती. आपला अधिकार जमवून होती. त्याला कारण होतं त्या किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांचं मरणं. त्या किल्ल्यावर राहणारे लोकं व त्या किल्ल्यावरील शासक उपासमारीनं मरण पावले होते. त्याचं कारण होतं किल्ल्याला वेढा पडणं. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय