स्मशानी किल्ला भाग 1 Ankush Shingade द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्मशानी किल्ला भाग 1

स्मशानी किल्ला (कादंबरी) भाग एक
अंकुश शिंगाडे
तो किल्ला शापमुक्त झाला होता व त्या किल्ल्याला अतूल, सारंग व हेमलतानं शापमुक्त केलं होतं. त्यासाठी त्यांनी भुतांशी व भुतांना उठविणाऱ्यांशी लढाई केली होती जणू आपल्या जीवावर खेळून. त्यात प्रसंगी त्या तिघांनाही मृत्यूच आला असता. परंतु सुदैवं हे की त्या प्रसंगातून ते वाचले होते.
तो किल्ला शापयुक्त किल्ला होता. तसं पाहिल्यास त्या किल्ल्यावर भुतं होती व ती भुतंच त्या किल्ल्यावर अधिवास करुन होती. आपला अधिकार जमवून होती. त्याला कारण होतं त्या किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांचं मरणं. त्या किल्ल्यावर राहणारे लोकं व त्या किल्ल्यावरील शासक उपासमारीनं मरण पावले होते. त्याचं कारण होतं किल्ल्याला वेढा पडणं.
तो किल्ला सुखी होता व त्यामध्ये राहणारे लोकं व त्याच किल्ल्याच्या परीसरातील प्रजाही सुखीच होती. परंतु काळाचं दृष्ट्रचक्र त्या किल्ल्यावर चालून आलं व किल्ल्याला वेढा पडला.
तो वेढा...... तो वेढा एवढे दिवस चालला की त्यामुळं किल्ल्यावरील शासक व प्रजेला किल्ल्याबाहेर जाता येणं बंद झालं. त्यातच किल्ल्यावरील अन्नधान्य संपलं. परंतु शासक व लोकं स्वाभीमानी असल्यानं त्यांनी शरणागती पत्करली नाही व ते सर्वजण तडपू तडपू किल्ल्यातच उपासानं मरण पावले. परंतु त्यांची इच्छा पुर्ण झाली नव्हती व ते सर्वजण भूत बनले व ते किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना सतावू लागले होते. त्यातच त्याचाच फायदा त्याच किल्ल्यावर तद्नंतर आलेल्या एका व्यक्तीनं घेतला. ज्याचं नाव हलधर होतं. त्यानं त्या भुतांना मंत्रानं बांधून टाकलं व त्यानंतर त्यांना आपल्या इच्छेनुसार हवं तसं वागवलं. तद्नंतर ती भुतं हलधरचं ऐकत तो जसे म्हणेल तसं करु लागले होते.
अतूलनं गत काही वर्षापुर्वी त्या किल्ल्याची भुतांपासून सोडवणूक केली होती, जेव्हा तो तरुण होता. त्यानंतर तो परत आपल्या घरी विदर्भात आला होता. त्याला बरीच वर्ष झाली होती व आज तो म्हाताराही झाला होता. परंतु आजही त्याला त्या किल्ल्याची आठवण येत होती आणि जसजशी आठवण येत होती. तसतसा तो बेचैन होत होता. आजपर्यंत त्याला त्या किल्ल्याकडे जावंसं वाटायचं. परंतु कामं जास्त असल्यानं व त्याला पुरेसा वेळ न मिळाल्यानं त्याला किल्ल्यावर जाता येत नव्हतं. कधीकधी पैशाचाही प्रश्न असायचा. कारण तिथंपर्यंत जायला पैसाही जास्त लागत असे. परंतु सरकारची एक योजना त्याला माहीत होती. ती म्हणजे म्हातारे होताच बसमध्ये प्रवास निःशुल्क. त्याच योजनेचा लाभ घेत एकदा संधी मिळताच अतूल तो किल्ला पाहायला निघाला नव्हे तर त्या किल्ल्याची भेट घेण्यास. त्यावेळेस त्याच्या मनात आठवणींचं काहूर माजले होतं व ज्यावेळेस त्यानं किल्ला भुतांपासून शापमुक्त केला होता. आता त्या गोष्टी त्याला आठवू लागल्या होत्या. म्हातारपणाच्या अखेरच्या उंबरठ्यावर असतांना. आज त्या सर्व गतकाळातील आठवणी जीवंत झाल्या होत्या भुतासारख्या.

************************************************

तो बंद किल्ला. अजूनही बंदच होता तो किल्ला. त्या किल्ल्यावर कोणी राहात नव्हतंच. तसं पाहता त्या किल्ल्यानं आज बऱ्याच लढाया पाहिल्या होत्या आणि अनुभवल्याही होत्या कित्येक लढाया. आज मात्र तो किल्ला शाबूत होता. परंतु त्या किल्ल्यावर आज पाहिजे त्या प्रमाणात वसाहत नव्हतीच.
किल्ल्यावर पर्यटक लोकं येत व तो किल्ला पाहून जात. मात्र कोणीही त्या किल्ल्यावर रात्रीला मुक्कामानं राहात नसे. त्याचं कारणही तसंच होतं. आख्यायिका होती की त्या किल्ल्यावर अनेकांनी येत असलेला आवाज ऐकला होता व तो आवाज कुणाचा येतोय. ते काही कळत नसे.
किल्ला थोडासा उंचावर होता व त्या किल्ल्याच्या पायथ्याशी एक गाव होतं. त्या गावातून किल्ला दिसायचा भरदिवसा. परंतु दिवसा त्या किल्ल्यात स्मशान शांतता असायची. रात्रीला मात्र किल्ल्यावर काय चालायचं ती कल्पनाही न केलेली बरी.
ती रात्र भयाण व विराण असायची रात्रीला. कधीकधी नाही तर नेहमीच त्या किल्ल्यातून अचानक वीज चमकायला लागायची. अचानक आवाज येवू लागायचा व आवाज यायचा, 'वाचवा, वाचवा, माझाजीव जातोय.'
वाचवा वाचवा असा येणारा आवाज. आवाज रोजच त्या किल्ल्यातून येत असे. शिवाय रात्रभर त्या किल्ल्यावर चित्रविचित्र आवाज येत असायचे. मात्र दिवसा त्या किल्ल्यावर कोणाचेच आवाज यायचे नाहीत. त्याचं कारण काय असायचं ते कळेनासं होतं.

************************************************

अलिकडील काळात किल्ल्याला महत्व नसल्याचे जाणवते. त्याचं कारण आहे किल्ल्याची आजच्या काळात होत असलेली दुरावस्था. आपण जेव्हा जेव्हा तो किल्ला पाहतो. तेव्हा तेव्हा आपल्याला किल्ल्याची दुरावस्था होत असलेली आढळते.
किल्ल्याची दुरावस्था ही अतिशय विचार करणारी गोष्ट आहे. कारण अलिकडील काळात किल्ले पडत आहेत. पडक्या अवस्थेत आहेत.
किल्ला........ किल्ला आपल्या इतिहासाचा महान ठेवा आहे व त्या किल्ल्याला सुदृढ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. कारण त्या काळात आपल्याच महापुरुषांनी आपल्याच देशाची अस्मिता टिकविण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. एक एक किल्ला लढवला. परंतु किल्ला जावू दिला नाही. तसं बलिदान देवून स्वराज्य टिकवलं. शिवाय किल्ला असेल तर राज्य टिकतं, हाच उद्देश धरुन आपल्या महापुरुषांनी किल्ले बांधले. जे आज पडत आहेत. ज्यांची आजच्या काळात नुतनीकरण करण्याची गरज आहे. परंतु ते नुतनीकरण करीत नाहीत आजचे लोकं.
आज प्रत्यक्षदर्शी निदर्शनास येते की राजकारणात असलेले व निवडून आलेले राजकारणी हे आपले मोठमोठे बंगले बांधतात. ते अतिशय श्रीमंत आहेत. काही स्वतःला अशा हौतात्म्य पत्करणाऱ्या राजांचे वारस समजतात. त्यातील काही लोकं अतिशय गर्भश्रीमंत आहेत. तरीही या दोन्ही मंडळींपैकी कोणतीही व्यक्ती आपले स्वतःचे राहते बंगले बांधत असले तरी ते किल्ल्याची डागडुगी करीत नाहीत वा त्यात सुधारणा घडवून आणत नाहीत. आज बर्‍याचशा किल्ल्याचे बुरुज ढासळलेले असून बरेचसे किल्ले जमीनदोस्तही झालेले आहेत. काही ठिकाणी किल्ले शाबूत आहेत. परंतु ते स्थानिक लोकांच्या ताब्यात नाहीत. ते सरकारनं अशा लोकांना प्रदान केलेले आहेत की ज्यांनी त्या किल्ल्याला पाहणीसाठी येणाऱ्या लोकांसाठी खानावळी उघडल्या. अशा खानावळी की ज्यात राहायचीही सोय होते. शिवाय अशा खानावळीत राहून लोकं बिभत्स प्रकार घडवून आणतात.
विशेष सांगायचं म्हणजे त्या खानावळीत बिभत्स प्रकार घडो की काहीही होतो. त्यांना त्यांचं काहीही घेणंदेणं नसतं. हं, होईलच बदनामी तर ती त्या गावची. आपली नाही. अशा आविर्भावात खानावळ निर्माण कर्ते वागत असतात. शिवाय खानावळ निर्माण कर्ते हे काही त्या गावात राहात नाहीत. ते बऱ्याच लांबपर्यंत राहतात व ते खानावळीच्या ठिकाणी आपला एक मॅनेजर नियुक्त करुन कामकाज चालवत असतात. पैसा कमवीत असतात. परंतु खरं सांगायचं झाल्यास त्यांनाही किल्ल्याची डागडुगी करायला वेळ नसतो. ते फक्त नि फक्त राहायला जागा देतात पर्यटकांना. शिवाय खाण्याच्या पुर्ण सोयी. असे पर्यटकही जेवन करायचंच असेल तर स्थानिक लोकांच्या हातचं जेवन करीत नाहीत. शिवाय त्यांच्या पडक्या घरात राहात नाहीत. जेणेकरुन त्यांनाही दोन पैशाची मदत होईल. त्यांनाही थोडासा का होईना रोजगार मिळेल.
काही किल्ले असेही आहेत की त्या किल्ल्याचं सरकारनं ऐतिहासिक महत्वच कमी केलं आहे. त्या किल्ल्यावरच चक्कं पक्के रस्ते काढले आहेत. ज्यातून त्या किल्ल्याचं स्वरुप साधारण बनलं आहे. जसा पन्हाळा किल्ला.
पन्हाळा किल्ला हा असाच एक ऐतिहासिक किल्ला की त्या किल्ल्यानं त्या काळात एक सिद्धी जौहरचा वेढा पाहिला. शिवाय त्या किल्ल्यानं बाजीप्रभूचाही पराक्रम पाहिला. ती पावनखिंड आजही इतिहासात महान ठरली आहे. जी वीर बाजीप्रभूच्या बलिदानाची साक्ष देते. ती याच किल्ल्याच्या पराक्रमाची गाथा आहे. शिवाय याच किल्ल्यावरुन शिवरायांची सुटका करण्यासाठी रचलेला शिवरायांचा डाव तडीस नेणारा व बलिदानास पात्र ठरलेला दुसरा शिवाजी की जो हुबेहुब दिसायचा शिवरायांसारखा. तो शिवा काशिद याच भागातील नेमापूरचा. ते गावही पन्हाळ्याच्या पायथ्याशी असून त्याची समाधी याच गावात आहे. शिवाय दुसऱ्याच मार्गाने पळून जाणारा शिवाजी, ज्याला राजदिंडी नाव दिलं आहे. तेही पन्हाळ्यावर आहे. पन्हाळ्यावर आजही शाळेला दिलेला शिवरायांचा राजमहाल आजही शाबूत आहे व त्या ठिकाणी शाळेचे वर्ग बसतात आणि ज्या ठिकाणी संभाजी राजे राहात होते, तिथं मंत्री खासदारांच्या पार्ट्या होतात असे गावकऱ्यांचे म्हणणे. किल्ल्यावर दोन मोठमोठे कोठारं आहेत की ज्यात कमीतकमी पाच लक्ष धान्याची पोती त्या काळात मावत होती. त्यामुळंच सिद्धी जौहरच्या लढ्याला चार महिने शिवरायांनी झुंज दिली तडाक्याची. किल्ल्याच्या आजुबाजूला दऱ्या असून त्या दऱ्यातून कोणताच शत्रू अगदी सहज किल्ल्यावर येवू शकत नसे, अशी बांधणी आहे किल्ल्याची, ती आजही पाहायला मिळते. शिवाय ते दोन दरवाजे आजही शाबूत असून आपली शान राखून आहेत. त्यापैकी एक दरवाजा म्हणजे कोकण दरवाजा. या दरवाज्यातून शिवाजी महाराज त्या काळात कोकणातून यायचे. मात्र आज प्रशासनानं हा दरवाजा साधारण केलेला असून या दरवाज्यातून कोकणातून येणारी वाहतूक सुरु केलेली आहे. आता हा किल्ला अजिबात किल्ला वाटत नाही. तर त्यालाही प्रशासनानं साधारण करुन टाकलं आहे. लोकं या किल्ल्यावर पर्यटक म्हणून तर येतात. परंतु स्थानिक लोकांच्या सेवा स्विकारत नाहीत. साधी तोंडाला रुची आणणारी व गावकऱ्यांनी अतिशय मेहनत करुन गोळा केलेली जांभळं सुद्धा पर्यटक घेत नाहीत व दोन पैसे स्थानिक लोकांना देत नाहीत. मात्र फोटो काढण्यात ते मश्गुल असतात. ते खानावळीत कितीतरी रुपये खर्च करतात. परंतु स्थानिक पातळीवर साधे दहा रुपये खर्च करायला मागंपुढं पाहतात ही शोकांतिकाच आहे.
पन्हाळा एकमेव असा किल्ला आहे की जो आजही शाबूत आहे बराचसा. त्याचे बांधकाम जबरदस्त आहे आणि ते पाहण्यासारखे आहे. शिवाय पर्यटकांना आपल्या शाबूतपणानं वेड लावणारा आहे. या ठिकाणी गेल्यास ज्याला इतिहास माहीत आहे. त्याला तो नक्कीच आठवतो. तो सिद्धी जौहर आठवतो की जो त्या काळात जहरासारखाच होता. ती ताराबाई आठवते की जी याच किल्ल्यावर पुढील काळात कैदेत पडली होती औरंगजेबाच्या. परंतु हाती लागली नाही. तिही शिताफीनं पळून गेली होती. शिवाय आठवतो तो संभाजी राजा. ज्याचे हालहाल करुन औरंगजेबानं अतिशय क्रुरपणे हत्या केली. तोही काही काळ याच पन्हाळ्यावर अधिवास करीत होता आणि आठवतो तो शिवा काशिद. ज्याची समाधी याच भागात आहे. परंतु आज त्या किल्ल्याला किल्ल्यासारखं न ठेवल्यानं व प्रशासनानं आपली वापरच या किल्ल्यात नेल्यानं भविष्यात हा किल्ला तर शाबूत राहील. परंतु त्याचा इतिहास शाबूत राहीलच की काय? अशी चिंता सतावते. हा नेमका प्रशासनाचा प्रयत्न किल्ला शाबूत ठेवण्याचा आहे की आणखी कोणता? ते कळायला मार्ग नाहीच. परंतु तुर्तास मात्र पन्हाळ्यावर मोठमोठे हॉटेल उभारण्याची जणू स्पर्धाच लागली आहे असं चित्र दिसतं. हे जर थांबवलं नाही तर उद्या तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी पन्हाळ्यावरचं अस्तित्व संपेल व तो एक ऐतिहासिक किल्ला होता व त्याही किल्ल्यावर ऐतिहासिक कामगीरी झाली. तसाच तो किल्ला शिवाजी व ताराबाईनं काही काळ का होईना, लढवला. तसंच त्या किल्ल्यावर संभाजी राहात होता. त्या किल्ल्यासाठी शिवा काशिद व बाजीप्रभूंनी आपले प्राण दिले. हा सर्व इतिहास जग विसरेल आणि हा किल्ला फक्त मौजमजा करायचं व व्याभीचार करायचं केंद्र ठरेल यात शंका नाही. तेव्हा हे सर्व घडून येण्यापुर्वी तुर्तास तरी सावधान होणं गरजेचं आहे. कारण ते आपले किल्ले आहेत. लोकांनी त्या किल्ल्यांना आपले समजावे. आपल्यासारखेच त्या किल्ल्यालाही वागवावे. जेणेकरुन त्यांचा इतिहास टिकेल. तसंच त्यांचं अस्तित्वही. हे तेवढंच खरं. किल्ला खरंच पाहण्यासारखा आहे. जर कोणी कोल्हापूरला गेलं तर पन्हाळा त्यांनी अवश्य पाहावा. तसंच फक्त पाहण्यासाठीच जावू नये तर त्याला चिकटून असलेला पुरातन इतिहास आपल्या नजरेच्या आठवणीत साठवून ठेवण्यासाठी व जतन करण्यासाठी जावे हेही तेवढंच खरं. शिवाय एक शेवटचं सांगायचं म्हणजे समजा तुम्ही जर किल्ला पाहायला गेलेच तर या किल्ल्यावर विकायला बसणाऱ्या स्थानिक लोकांच्या टोपल्यातील जांभळं अवश्य खा म्हणजे झालं आणि लागलीच तर मदत स्थानिक प्रशासनाला द्या. जेणेकरुन तुमच्या खर्चातून किल्ल्याची डागडुगी करता येईल व ऐतिहासिक असलेल्या आपल्याच स्मृतींना कायम स्वरुपात शाबूत ठेवता येईल यात शंका नाही.

************************************************

अतुल नाव होतं त्याचं. तो एक साहित्यिक होता व त्याला एक मोठा पुरस्कार जाहीर झाला होता. त्या निमित्यानं तो किल्ल्याजवळच्या गावाला जाणार होता. मनात होतं की त्या किल्ल्याला भेट देणं. त्यातच त्याची उत्सुकता होती त्या किल्ल्याला भेट द्यायची. त्याचं कारणही तसंच होतं. ते म्हणजे त्या किल्ल्यावरची एक आख्यायिका होती की तिथं भूतं दिसतात. तसंच जो कोणी त्या किल्ल्यावर एक रात्र काढून देईल, त्याला रोख बक्षीसही जाहीर केलं होतं. शिवाय अशीही एक आख्यायिका होती की विवाहीत जोडपेच याठिकाणाहून गायब होतात. त्याच आख्यायिकेनं कोणताही विवाहीत पुरुष त्या किल्ल्याला पाहण्यासाठी जात नसे आणि गेलाच तर तो कधी परत आलाच नाही असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. तसं पाहिल्यास त्या किल्ल्याच्या गावाजवळ जो कोणी जात असे, त्याला गावातील लोकं सांगायचे की त्यांनी तिथं जावू नये व आपला जीव गमावू नये. शिवाय लोकांमध्ये असे कोणीही हिंमतवान नव्हते की जे आपला जीव धोक्यात घालतील.
अतुल हा नावाप्रमाणेच अतुल होता. तो हिंमतवान होता व त्यानंही या किल्ल्याची माहिती ऐकली होती बरेचदा. तसं पाहिल्यास त्याला ते थोतांड वाटायचं. वाटायचं की भुतं वैगेरे काहीही नसतात. ती आपली शंका असते. त्यामुळंच त्यानं ठरवलं होतं की आपण त्या किल्ल्याजवळच्या गावात गेलोच तर त्या किल्ल्याला भेट द्यायची. तसा तो फार शिकलेला होता व अंधश्रद्धा आणि भूत प्रेत मानत नव्हताच.
गाव तसं चांगलं होतं. गावातील लोकं अडाणी होते. गावात एक कालीमातेचं मंदीर होतं. त्या मंदीरात रोजच आरती चालत असे. रोजच भजन पुजा चालत असे आणि रोजच धूप अगरबत्तीही लावली जात असे. त्यामागं एक प्रथा होती. ती म्हणजे रोज देवाची आरती केल्ल्यानं व पुजापाठ केल्यानं किल्ल्यावरची भुतं मानवी वस्तीत येत नाहीत व लोकांना त्रास देत नाहीत.
गाव अडाणी होतं व शिक्षण शिकलेली होतकरु मुलं गावात नव्हती. त्याचं कारण होतं की ती शिकलेली मुलं गावात त्यांना त्यांच्या शिक्षणाला अनुसरून काम नसल्यानं गाव सोडून नोकरी निमीत्यानं शहरात गेली होती. शिवाय त्यांना बुवाबाजी पटत नसल्यानं ती मुलं गाव सोडणार नाहीत कशावरुन. तेही कारण घडलं होतं गाव सोडण्याला कारणीभूत.
गावात तसं पाहता तांत्रीक मांत्रीक भरपूर होते. ते सतत अंधश्रद्धा पसरवीत होते. त्यात त्यांचाही फायदा होताच. कोणी मानसीक विकृतीतून डिप्रेशनमध्ये गेलाच तर त्याला भूत लागलं असा कांगावा करून अशी तांत्रीक माणसं पैसा उकळत असत. परंतु हा नेमका काय प्रकार आहे, याचा अंदाज घेत नसत.
किल्ल्याच्या पायथ्याशी कधी फिरायला गेलंच तर तिथं कित्येक शवांचे सांगाडे पडलेले दिसत असत. ते सांगाडे माणसांचेच असत. किल्ल्यावर भुतानं मानवांचा जीव घेतला व त्या किल्ल्यावरुन तो सांगाडा फेकून दिला असेल अशी ओरड करुन गावातील लोकं मोकळे होत. ते सांगाडे बहुतांश आजुबाजूच्या गावचे कमी व किल्ला पाहायला आलेल्या बऱ्याचशा लोकांचे असायचे. जे पर्यटक म्हणून किल्ला पाहायला येत. शिवाय भुताटकी किल्ला म्हणून कोणीही त्या किल्ल्याच्या जवळपास खानावळी बांधल्या नव्हत्या. त्याचं कारण होतं की एकदा एक खानावळ कुणीतरी हिंमत करून त्या ठिकाणी बांधली होती व पर्यटक तिथं येवूनही राहू लागले होते. परंतु एकदा अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती तिथं व तिथं एका नवविवाहित दांपत्यांची हत्या झाली होती. ती जणू भुतानंच केली असेल असं वाटून ती खानावळ बंद पडली होती नव्हे तर आताही त्या खानावळीमध्येही कोणी राहात नव्हतं. ती खानावळ आज अगदी भकास अवस्थेत उभी होती.
अतुल हा शिकलेला एक तरुण होता. तो कोसो दूर होता अंधश्रद्धेपासून. भुतं व देवं ही नसतात असे विचार त्याच्या मनात होते. तो तसा लेखकही होता आणि तो प्रवासाला निघाला होता. वाटेत तो किल्ला पाहावा असं त्याला वाटत होतं. तसा त्याला पुरस्कार मिळाल्यानं तो पुरस्कार घेण्यासाठी त्या किल्ल्याच्या जवळच्या भागातील शहरात निघाला होता.
अतूलचे प्रवासात फार हालहाल झाले होते. त्याचं कारण होतं महिलांची अर्धी तिकीट व म्हाताऱ्यांना मुफ्त प्रवास. त्यामुळंच बसमध्ये कितीतरी जास्त प्रमाणात महिला व म्हाताऱ्यांचीच गर्दी दिसत होती. शिवाय बसायला त्यांनाच प्रथम प्राधान्य असल्यानं अतूलला बराचसा प्रवास हा उभ्याउभ्यानंच करावा लागला होता.
ती अर्धी तिकीट होती व म्हाताऱ्यांना निःशुल्क प्रवास होता, त्यामुळंच सामान्य प्रवाशांना अतिशय मनस्ताप होत असे. तसं पाहिल्यास अतूल हा आपल्या महाराष्ट्र राज्यात राहणारा एक तरुण होता.
अतूलचा महाराष्ट्र हा आधीपासूनच सुजलाम सुजलाम होता. इथे पुर्वी बारमाही नद्या वाहात होत्या आणि आजही बऱ्याचशा भागात बारमाही नद्या वाहात असत. तसं पाहता या राज्याला चांगली अशी ओळख होती. मग ते क्षेत्र शेतीचं असो की उद्योगाचं. तसंच नद्याही भरपूर असून त्या नद्यांनी आपल्या परीसरातील भुभाग अतिशय समृद्ध केलेला होता. असेच या राज्यातील काही जिल्हे त्यांच्यामध्ये असलेल्या विविधांगी गुणानं प्रसिद्ध होते. जसे. संत्र्यासाठी नागपूर, गुळासाठी कोल्हापूर, नाशिक द्राक्षासाठी, जळगाव केळीसाठी, रत्नागीरी हापूस आंब्यासाठी. तशीच या राज्यात दळणवळणाचीही साधनं पर्याप्त आणि पुरक होती. अशाच या सुजलाम सुफलाम महाराष्ट्रात अतूलला त्यावेळेस फिरण्याचा योग आला, तो त्याला मिळालेल्या महाराष्ट्र भुषण पुरस्काराच्या निमित्याने. तसा तो त्याआधीही महाराष्ट्रात फिरायला गेला होता. त्यात त्यानं भरपूर स्थळं पाहिली होती. परंतु तो त्या किल्ल्याच्या स्थळी गेला नव्हता.
ते तप्त उन्हाळ्याचे दिवस होते आणि त्याला महाराष्ट्र भुषण पुरस्कार एका खाजगी संस्थेनं जाहीर केला होता व तो पुरस्कार वितरण सोहळा त्याच शहरात होता. ज्या शहरात तो किल्ला आपली आन बाण व शान ठेवून होता. तसा तो नेहमीच फिरायला रेल्वेने जात असायचा. परंतु यावेळेस त्यानं ठरवलं होतं की आपण महाराष्ट्राची लाडकी लालपरी अर्थात एसटीनं जायचं. तसं ठरवताच त्यानं शिवशाही बसची पास काढली व नागपूरवरुन शिवशाही बसमध्ये बसला. जी एसटी यवतमाळ पर्यंतच होती.
शिवशाहीची पास काढण्यामागं त्याचा उद्देश होता. तो उद्देश म्हणजे आरामदायकरितीनं जाणं व उन्हाची तीव्रता टाळणं. कारण शिवशाहीत एसी सिस्टम असल्यानं उन्हाची तीव्रता कमी होणार होती. तसा तो नागपूरवरुन शिवशाहीत बसून यवतमाळला पोहोचला आणि यवतमाळात उतरल्यावर त्याला आपल्या महाराष्ट्रातील सुजलाम सुजलामपणाचा परीचय आला.
अतुलनं नागपूर पाहिलं होतं. कारण इथंच त्यानं जास्त काळ अधिवास केला होता. तसं बरेचदा ऐकलंही होतं की आपल्याही नागपूरपेक्षा इतर जिल्हेही तसेच समृद्ध आहेत. त्याच दृष्टीनं यवतमाळपर्यंत ठीक राहिलं. तशीच कल्पना करुन तो जेव्हा यवतमाळला पोहोचला आणि तिथं उतरला. तेव्हा कळलं की महाराष्ट्राला सुजलाम म्हणावं की नाही. तेच प्रश्न चिन्हं त्याच्या डोळ्यासमोर साक्षात उभं राहिलं.
यवतमाळात पोहोचताच एवढं गरम व्हायला लागलं की उन्हाचा दाह सहन होत नव्हता. त्यातच नागपूरला येणाऱ्या एसट्या भरपूर होत्या आणि नांदेडकडे जाणारी एकही एसटी नव्हती. तब्बल दोन तास तेही कडक उन्हात तपश्चर्या करीत असतांना एक एसटी आली. ती एसटी फक्त पुसदपर्यंतच होती. ज्यात महिला आणि म्हाताऱ्या माणसांचीच भरपूर गर्दी होती. तरुण व मुलं बहुतांश नव्हतीच तिथं. त्याचं कारण होतं की महाराष्ट्रानं एसटीनं महिलांसाठी अर्धी तिकीट केली होती व म्हाताऱ्यांना निःशुल्क.
महाराष्ट्रात महिलांना अर्धी तिकीट व पंच्याहत्तर वर्षासमोरील व्यक्तींना निःशुल्क प्रवास. हा महाराष्ट्रातील एसटी महामंडळानं घेतलेला निर्णय. त्या निर्णयाची अंमलबजावणी मात्र चुकीच्या मार्गाने होत असल्याची खात्री अतूलला यवतमाळात आली. कित्येक म्हाताऱ्यांनी आपल्या आधारकार्डवर आपलं वय वाढवून पंच्याहत्तर केलेलं आढळून येत होतं व त्याची साधी चौकशीही होत नव्हती. कित्येक म्हातारे की ज्यांच्या पायांनाही चालता येत नव्हतं, अशीही वयोवृद्ध माणसं आपला प्रवास निःशुल्क असल्यानं आपल्याला उन्हातान्हाचा त्रास होईल याचा विचार न करता प्रवास करतांना आढळली होती. शिवाय तरुणांना उठवून अशा न चालता येणाऱ्या म्हाताऱ्यांना जागा देणंही क्रमप्राप्त ठरलं होतं. त्यातच दुसऱ्या जागा अर्धी तिकीट असलेल्या महिलांना देण्यात येत होत्या आणि विशेष म्हणजे ज्या लोकांना पुर्ण तिकीट काढावी लागली होती. त्यांना ताटकळत उभं राहून प्रवास करावं लागत होतं. हेच चित्र संपुर्ण महाराष्ट्रात दिसलं होतं अतूलला.
महाराष्ट्र सरकारनं म्हाताऱ्यांना निःशुल्क प्रवासाची सवलत दिली. तशी म्हाताऱ्यांना निःशुल्क प्रवास सवलत देवून एक फायदा झाला. तो म्हणजे म्हाताऱ्यांना मनाप्रमाणं जिकडे जाता येईल, तिकडं सैरावैरा फिरता आलं. घरची म्हाताऱ्यांची कटकट साहजीकच कमी झाली व कधी न झाले नव्हते ते झाले. ही म्हातारी मंडळी संपुर्ण महाराष्ट्रच्या दौऱ्यावर निघाल्याचं चित्र यात दिसून आलं होतं. आज जत्थेच्या जत्थे त्यांचेच दिसत असल्याचे चित्र प्रत्येक बसस्थानकावर दिसत होते. तसा अतुल विचार करीत होता. विचार करीत होता की जर यात शुल्क असतं तर...... तर हे चित्र दिसलंच नसतं. तशीच महिलांना अर्धी तिकीट देवूनही तीच समस्या निर्माण झालेली असून त्या तिकीटीचा ऊहापोह होत आहे. ज्यातून बसमध्ये गर्दी फार दिसते. परंतु नुकसान बरंच होत असेल, याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु याबाबतीत कोण बोलणार! कोणीच बोलू शकत नाही. कारण जनमत सरकारला प्राप्त आहे.
म्हाताऱ्यांना निःशुल्क प्रवासाची सवलत देवून व महिलांना अर्धी तिकीट देवून राज्यसरकारनं सर्व जनतेला खुश केलं. त्यानंतर त्यांनी ते मतदान आपल्या बाजूनं ओढवलं. परंतु त्यात तारांबळ तरुण लोकांची प्रवास करतांना उडेल याचा विचार झाला नाही. यावरुन कळत नाही की सरकारनं एसटीत प्रवासातून अशा निःशुल्क प्रवासाच्या योजना साकारतांना नेमकं काय साध्य करायचं होतं? द्यायचंच होतं तर रत्नागीरी स्थानकावरुन प्रवास करतांना रात्री साडेसात नंतर प्रवास करतांना ज्या एसट्या उपलब्ध नाहीत. त्या द्यायला हव्या होत्या. कारण गणपतीपुळे हा प्रेक्षणीय भाग आहे व गणपतीपुळेवरुन एसट्या रत्नागीरीपर्यंत तर येतात. परंतु पुढं कोल्हापूरात येतांना साडेसातनंतर गाड्याच नाहीत. तसं पाहिल्यास गणपतीपुळे हे प्रेक्षणीय स्थळ आहे आणि प्रवासी गणपतीपुळेवरुन रत्नागीरीला आल्यावर, त्यांना कोल्हापूरात जायचं असेल तर वा कोणाला जर कोल्हापूरात तत्काळ यायचे असेल तर रात्री साडेसातनंतर गाड्या नसणं ही शोकांतिकाच आहे. जरी रत्नागीरी हे जिल्ह्याचे ठिकाण असलं तरी. त्यातच या महाराष्ट्रात रत्नागीरीला रात्री साडेसातनंतर गाड्या नसल्यानं त्याचा लाभ परराज्यातील म्हणजेच कर्नाटकातील राज्य घेत असतात. त्यांच्या रात्री साडेसातनंतर कोल्हापूर प्रवासासाठी गाड्या येतात. महाराष्ट्र खरंच सुजलाम सुजलाम आहे. परंतु त्या सुजलाम सुजलामपणावर वरील गोष्टीवरुन प्रश्नचिन्हं उभं राहातं व कोणाच्याही मनात शंका उत्पन्न होते.
अतूलचा तो विचार. अतूलच्याही मनात तशी शंका उत्पन्न झाली होतीच. त्यादृष्टीनेच त्याचा विचार होता. त्याचं म्हणणं होतं की महत्वाचं सांगायचं झाल्यास सरकारनं योजना आखाव्यात. परंतु त्या योजना चारही बाजूनं विचार करुनच आखाव्यात. केवळ आपल्याला लोकं चांगले म्हणतील वा मतदान मिळवता येईल यादृष्टीनं योजना आखू नयेत. हं, म्हाताऱ्यांना निःशुल्क प्रवास योजना दिली. ती एक चांगली गोष्ट झाली. तशीच महिलांना अर्धी तिकीट दिली. तिही एक चांगलीच गोष्ट ठरली. परंतु त्याचबरोबर त्यांना प्रवासासाठी एखादी वेगळी गाडी दिली असती तर ना त्यांची प्रवास करतांना तारांबळ उडाली असती, ना सामान्य तरुण लोकांची प्रवास करतांना तारांबळ उडाली असती. शिवाय जी याच गोष्टीवरुन एसटीत जागेसाठी भांडणं होतात, ती भांडणंही झाली नसती हे तेवढंच खरं. कारण आज असा प्रवास निःशुल्क वा अर्ध्या तिकीटाचा इतर सर्वासोबत होत असतांना बसण्याच्या जागेसाठी जी भांडणं होतात प्रत्येक स्टेशनवर. त्याची कल्पना एसटीतून प्रवास करणाऱ्याच व्यक्तींना येते, इतरांना ती येत नाहीच. यात शंका नाही. यावर उपाय एकच की आगामी काळात म्हातारे, महिला आणि इतर अशांना खास सवलत म्हणून वेगवेगळ्या एसट्या पुरवाव्यात म्हणजे झालं.
अतूलचं तसं सांगणं बरोबरच होतं. कारण सर्व वयोवृद्ध मंडळी एस टी निःशुल्क आहे म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाली होती.
यवतमाळात थोडा वेळ ताटकळत उभं असतांनाच नांदेडची गाडी सापडली व अतूल नांदेडच्या गाडीत बसून रवाना झाला. परंतु यावेळेस गाडीत भयंकर गर्दी असल्यानं बराच वेळ त्याला पुन्हा उभं राहावं लागलं. असेच काही गावं गेले व नांदेड आलं. तसं अतूलनं आपलं सामान घेतलं आणि तो खाली उतरला.
अतूल नांदेडला उतरला. तसा तो आज उष्णतेनं परेशान झाला होता. यवतमाळात भयंकर उष्णता होती. त्याचं कारण होतं झाडं नसणं.
झाड........ सध्या महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात नाही तर संपूर्ण देशातच उष्णतामान वाढलं आहे. महाराष्ट्राचा विचार केल्या गेला तर महाराष्ट्रात यवतमाळ आणि चंद्रपूर हे जास्त तापमानाचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध आहेत. दरवर्षीच त्या जिल्ह्यात भयंकर मोठ्या प्रमाणावर तापमान असतं. मात्र यावर्षी यवतमाळ ऐवजी व चंद्रपूर ऐवजी अकोला जिल्ह्याचा पहिला क्रमांक लागला, तापमान वाढीत. त्याचं कारण काय असावं?
विदर्भाचं तापमान वाढत आहे. याला कारणीभूत असतात झाडं. मग विदर्भात झाडं नाहीत का आणि झाडं नाहीत तर जंगलाचे भाग कसे दिसतात? आज हाच भाग फिरायला निघालो तर झाडंच झाडं दिसतात शिवारात. मग तरीही आपली ओरड की विदर्भाच्या या मातीत झाडं नाहीत. ती आपली ओरड का असावी? त्याचं कारण आहे जरी आपल्याला शिवारात झाडं दिसत असली तरी त्या झाडांची संख्या कमी आहे कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या मानाने. विदर्भात आंबा, पिंपळ, वड, कडूनिंब यासारखी विशाल झाडं आहेत. जी झाडं जास्तीत जास्त पाणी धारण करण्याची क्षमता ठेवतात. अशी झाडं कोकणात कमी प्रमाणात आहेत. अशा झाडांची मुलं पाणी मिळविण्यासाठी जमीनीत खोलवर गेलेली असतात. परंतु ती झाडं अख्खी इमारत पाडून टाकतात. म्हणूनच लोकं ती शिवारात लावतात व घरी लावत नाहीत. तसं पाहिल्यास विदर्भात नारळाची झाडं कमी आहेत. कारण त्याला पोषक वातावरण नाही. सुपारीची झाडं कमी आहेत. कारण त्यालाही पोषक वातावरण नाही. मात्र कोकणात ती झाडं घरोघरी आहेत शिवारात तर अतिशय जास्त संख्येनं आहेत. त्या भागात शिवारात कोणतं झाड आणि गावालगत कोणतं हे ओळखूच येत नाहीत, एवढी झाडं आहेत. जर विदर्भात आणि कोकणात झाडांची मोजणी केली तर नक्कीच त्या भागात झाडं जास्त दिसतील. यावरुन कोकणात लोकसंख्या कमी आहे असा याचा अर्थ नाही. कोकणातही लोकसंख्या जास्त आहे.
कोकणाच्या प्रदेशात प्रवेश करताच उन्हाची जास्त तीव्रता दिसत नाही. कारण तिथं पाऊस जास्त पडतो. थंड व आल्हाददायक वातावरण आहे. त्याचं कारण आहे झाडं. झाड हे प्रत्येक घरी लावलेलं असतं. एका एका घरी नारळ, फणस व सुपारीची दोन दोन चार चार झाडं दिसतात. काही घरी जास्तही झाडं दिसतात. तशी झाडं विदर्भात घराघरात दिसत नाहीत.
विदर्भात पुर्वी एका एका गावात चौकाचौकात एक विशाल झाड असायचं. त्या झाडाला ओटा असायचा. त्या झाडावरील ओट्यावर लोकं सांजच्याला बसायचे. परंतु आता तो ओटा बऱ्याच गावात दिसत नाही. गावात झाड राहायचं, चौकाचौकात. हे आताच्या पिढीला माहीतच नाही वा त्या विशाल झाडाला एक ओटाही असायचा. तेही आताच्या पिढीला माहीत नाही. कारण ते झाड आता तुटलेलं आहे. का तुटलेलं आहे वा का तोडलं? हे कळायला मार्गही नाही.
आज गावागावात दिसणारं त्या चौकातील झाड दिसत नाही. मग एका घरी एक झाड तरी कसं दिसेल? इमारतीच्या भिंती तडकतात, म्हणून घराजवळ झाड लावलं जात नाही. शिवाराची जर गोष्ट केली तर शिवारातील शेतात पेरलेलं पीक होत नाही, अर्थात पीक पीकत नाही. म्हणूनच शेताच्या पारावर नैसर्गीकरित्या लागलेली झाडं तोडली जातात.
आज पाऊस पडत नाही. तापमान अतिशय वाढलेलं आहे. कारण झाडं नाहीत. लोकं झाडं लावावी असं म्हणतात. परंतु आपण स्वतः लावत नाहीत. फक्त सांगतात. एखादा व्यक्ती कदाचीत लावतोही. परंतु त्याचं जतन करीत नाही. शिवाय एखाद्यानं लावण्याचा प्रयत्न केलाच तर सारे लोकं हसतात. म्हणूनच लावणाराही व्यक्ती झाड लावत नाही. हं, तोडतांना मात्र विचार नसतो. झाड हमखास तोडलं जातात. त्यावेळेस विचारही केला जात नाही की एवढं विशाल झाड मी तोडलं. खरंच एवढं विशाल झाड तयार व्हायला किती वर्ष लागतील बरे.
आज घरात झाड नाही. शिवारात शेत बुडतं म्हणूनच झाड नाही आणि जंगलंही मानवी वसाहत वा शेती निर्माण करण्यासाठी तोडली जात आहेत. विदर्भात याचं प्रमाण जास्त आहे. म्हणूनच विदर्भात जास्त तापमान आहे. पाऊस पडत नाही. सतत कोरडा दुष्काळ पडत आहे. हे असंच जर सुरु राहिलं तर तो दिवस दूर नाही की पुर्ण गावाचे स्मशान होईल. तापमान एवढं वाढेल की लोकं उष्णतेनं वा ती सहन न झाल्यानं तडकाफडकी मरतील. म्हणूनच यावर आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे. ते म्हणजे झाडं लावणे. प्रत्येकांनी आपल्या दारासमोर आजच एकतरी झाड लावावं. त्याची सुरुवात नारळापासूनच करावी. विदर्भातही नारळ पिकवावा. नारळापासून सुरुवात यासाठी की नारळ हे शुभ कार्याचं सुचक आहे. शिवाय ते झाड उंच वाढतं व त्याला आगंतूक मुळं असल्यानं त्याचा घराच्या इमारतीला धोका नसतो. त्या झाडात पाणी जास्त साठविण्याची क्षमता आहे. तसंच दुसरं झाड वडाचं लावावं. ते गावाच्या मध्यभागी. ज्याला चौक म्हणता येईल. शिवाय पुर्वी गावात प्रवेश करताच दिसणारी व सिमेंट रस्ते बांधकामात तोडलेली चिंचांची झाडंही गावातील प्रवेशद्वाराजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावावीत. त्यानंतर प्रत्येकांनी आपल्या शेतात पारावर एकतरी आंब्याचं झाड लावावं आणि गावाच्या सभोवताल कडूनिंबांची झाडं असावीत. त्यातच पुर्वी स्मशानाच्या बाजूला असलेली आमराई आज जरी दिसत नसली तरी आजही स्मशानात आंब्याची झाडं आपण लावू शकतो. पुर्वी आंब्याच्या झाडांच्या पानाचा वापर स्मशानात होत असे. म्हणून स्मशानात आमराई असे. आजही ती असणं आवश्यक आहे. आता आपण ती लावून आमराई निर्माण करावी.
झाडं लावणं ही आपली गरज आहे आणि ती अति आवश्यक गरज आहे. अलिकडील काळात गावागावातील रस्ते हे सिमेंटचे बनलेले आहेत. त्यामुळंही तापमानवाढीत वाढ झाली आहे. कारण सिमेंट लवकर तापतं. म्हणूनच झाडं असल्यास त्या सिमेंट रस्त्यावर सावली पडेल व ते जास्त तापणार नाही. घरी झाड असेल तर आरोग्याला शुद्ध हवाही मिळेल. तसाच घराघरात थंडावाही राहील. त्यानंतर जसा घरात थंडावा राहील, एक झाड घरी लावल्यानं. तसाच थंडावा गावाच्या सभोवताल झाडं लावल्यानंतर, तसेच गावाच्या मध्यभागी व प्रवेशद्वारावर झाडं लावल्यानंतर राहील. यात शंका नाही. आपण वाढत्या तापमानाला रोक लावण्यासाठी एकतरी झाड लावावं व त्याची सुरुवात आपण आपल्याच घरापासून करावी. जेणेकरुन उद्याच्या आपल्याच पिढीला थंडाव्याचे सुख देता येईल. हे तेवढंच खरं. आज जर आपण एकतरी झाड लावलं तर त्याची फळं उद्या नक्कीच चाखायला मिळतील. नाहीतर तो दिवस दूर नाही की आपली पिढी या वाढत्या तापमानानं एक दिवस होळपळून निघेल आणि ती त्यावेळेस आपल्यालाच कोसेल. जी आपण आज चूक करीत आहोत. हेही तेवढंच खरं आहे.
अतूल यवतमाळात झाडं कमी प्रमाणात असल्यानं व वाढलेल्या तापमानानं होत असलेल्या गर्मीनं परेशान झाला होता. कशीबशी अतूलला नांदेडची एसटी मिळाली व तो नांदेडला रवाना झाला. मात्र त्यासाठी त्याला बरीच वाट पाहावी लागली होती.
नांदेडला पोहोचताच अतूलनं जेवन केलं. आता तो हात धुणार .एवढ्यातच कोणीतरी म्हणालं, "अमूक अमूक ठिकाणी जाणारी एस टी आली." जिथं अतूलला जायचं होतं. शेवटी अतूलनं कसेबसे हात धुतले आणि तो त्या एसटीत बसला. यावेळेस मात्र त्याला जागा मिळाली होती. तशी एसटीत फारच गर्दी होती.
थोड्या वेळानं गाडी सुरु झाली व ती आता चालायला लागणार. तोच एक म्हातारा गाडीत बसला. तो अतूलजवळ आला. म्हणाला,
"साहेब, इथं कोणी बसलंय का?"
"नाही. कोणीच बसलं नाही." अतूलनं त्यावर उत्तर दिलं. तसा तो म्हातारा टम्मदिशी त्या सीटवर बसला. मग काय, दोघांमध्ये चर्चेचं गुल्हाळ रंगलं. अतूलनं विचारलं,
"कुठं जात आहात?"
"पंढरपूर."
"कशाला?"
"यात्रेला." त्या म्हाताऱ्यानं उत्तर देताच अतूल चूप बसला. तोच काही वेळानं अतूलनं त्याला विचारलंही नाही. तरीही तो बोलता झाला. तशी म्हाताऱ्यांना जास्त बोलायची सवय असतेच. त्याचं कारण म्हणजे त्यांचं कोणी ऐकून घेत नाहीत आणि जो ऐकणारा असेल, त्याला ते गोष्टी सांगत असतात. तसं पाहिल्यास म्हातारे पुष्कळ हेकड स्वभावाचे असतात. परंतु त्यांना प्रेम जर दाखवलं तर त्यांच्याएवढं मायाळूही कोणीच नसतं. तसा तो म्हातारा बोलायला लागला.
"मी दर महिन्यात जात असतो पंढरपूरला. पुर्वी जात नव्हतो. आता रिटायर्ड झालो. घरी कामं नसतात. त्यामुळंच जात असतो पंढरपूरला. देवाचं दर्शन घेतल्यानं फार बरं वाटतं."
"अं, तिकीट लागत नाही ना बाबाजी तुम्हाला?"
"हो, तसंही काही समजा."
"तुम्हाला मुलं असतील ना?"
"होय."
"काय करतात?"
"अमेरीकेत आहेत."
"चांगलं आहे. चांगले शिकले असतील ते?"
"होय, बरेच शिकले आहेत. मी शिकवलं ना त्यांना. बराच पैसा लावला."
"हो काय? काय करीत होते आपण?"
"मी..... मी सरकारी नोकरीवर होतो."
"आता बऱ्यापैकी पेन्शन मिळत असेल तर?"
"होय. भरपूर पेन्शन आहे मला."
त्या म्हाताऱ्यानं दिलेलं उत्तर. तसं उत्तर ऐकताच अतूल विचार करु लागला की या म्हाताऱ्याला गाडी निःशुल्क कशाला हवी? हा तर कमावतो चांगला आणि बसचे पैसेही देवू शकतो.
अतूल त्या गोष्टीवर विचारच करीत होता क्षणभर. तसा तो इकडे तिकडे पाहात होताच. तसं निरीक्षणातून आढळलं की दोनचार म्हातारे जर सोडले तर बाकी सर्वच वयोवृद्ध मंडळी अगदी गर्भ श्रीमंत वाटत होती. प्रत्येकांच्या हातात स्मार्टफोन होता. त्यावरुन विचार येत होता अतूलला की या म्हाताऱ्यांना कशाला हवी निःशुल्क सेवा. अन् सरकारनं तरी यांना निःशुल्क प्रवासाची सवलत का द्यायला हवी होती. हं, निःशुल्क सवलत द्यायचीच होती तर शिक्षणात द्यायला हवी होती. परंतु सरकारनं त्यात सवलत दिली नाही निःशुल्क शिक्षणाची की ज्यातून करीअर निर्माण करता येवू शकतं. या वयोवृद्ध व्यक्तींना निःशुल्क प्रवासाची सवलत देवून काय साध्य करता येतं? काहीच नाही. उलट सरकारचं यात अतोनात नुकसान होत असतं. असं अतूलला वाटत होतं प्रवास करतांना. तो त्याबद्दल आपल्या मनात विचार करु लागला होता.
'अलिकडे बसमध्ये निःशुल्क सेवा सुरु आहे प्रवास करतांना. अगदी वयोवृद्ध माणसं की ज्याच्यानं चालणं होत नाही. तेही प्रवास करु लागले आहेत आज. कारण बसमध्ये त्यांना निःशुल्क प्रवासाची सोय आहे. शिवाय त्यांचं राहाणं गबाड्याचं दिसत नाही. चांगले ऐटीत दिसतात ते. बऱ्याचशा म्हाताऱ्यांच्या डोक्यावर टोपी असतेच. तसं पाहिल्यास स्वच्छ कपडे असतात. काहीजण धोतर, बंगाली व टोपीत व कडक इस्तरी मारलेल्या कपड्यात असतात की ज्यांच्या कपड्यांना एकसुद्धा डाग लागलेला नसतो. शिवाय हातात स्मार्टफोन असून तो स्मार्टफोन साधा सुधा नसतोच. तर तो कमीतकमी वीस हजार रुपये किंमतीच्याही पुढे असतो. विचारणा केल्यावर कोणी सरकारी नोकरीवर होतो, असं सांगतात तर कोणी अमूक अमूक उद्योगपती. साधा गरीब व असहाय्य म्हातारा एखादाच असतो.
सरकारनं निःशुल्क प्रवासाची योजना काढली व त्यातून बरेचसे म्हातारे प्रवास करु लागले आहेत की जे गरीब नाहीत. ज्यात एखादाच गरीब दिसतो हे चित्र आहे. बऱ्याचशा म्हाताऱ्यांजवळ स्मार्टफोन दिसतो आणि नसेल स्मार्टफोन तर साधा डबीचा फोन तरी असतो. त्यांनासुद्धा विचारल्यास ते गरीब असल्याचं बोलतच नाही. चांगले श्रीमंत असल्याचं वक्तव्य करतात. हे चित्र दिसतं. प्रत्येकच बस्टॉपवर. आज बसस्थानकं म्हटली की चिकार गर्दीची ठिकाणं ठरली आहेत याचमुळं. शिवाय महिलांनाही अर्धी तिकीट सरकारनं दिली असून त्या गोष्टीचा उहापोह होत असल्याचं चित्र जाणवतं. असं वाटतं की यातून सरकारनं निदान एसटी बससेवेतून जे मिळवायला हवं होतं. त्यात नुकसान होत आहे.
एसटीची निःशुल्क सेवा. कोणाला हवी? जे श्रीमंत नाहीत, म्हणजेच गरीब आहेत. ज्यांच्याकडे खायला दाणे नाहीत. भरजरी कपडे नाहीत. जे गरीब आहेत. ज्यांच्याकडे साधे फोनसुद्धा नाहीत. ज्यांना एकच मुल आहे. दोन वा त्यापेक्षा जास्त मुले नाहीत. कारण मुलं असली तर ते गरीब असणारच. तसंच ज्यांच्याकडे मोठं सिमेंटचं घर नाही. अशा गरीबांना खरं तर बससेवा निःशुल्क द्यायलाच हवी. परंतु यात विचार असा की आता गरीब कसे ओळखायचे? अन् बसमध्ये जर गरीब ओळखायचे असतील तर कसे ओळखता येतील?
गरीब? गरीब लोकं हे बसमध्येच नाही तर कुठेही अगदी सहजच ओळखू येत असतात. ते त्याच्या अवतारावरुन. त्यांचे केसं अस्ताव्यस्त असतात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पायात चप्पल नसतेच आणि असलीच तर ती फाटकीच असते वा तुटकीफुटकी असते.
साधारणशी परिस्थिती असणारा व जो गरीब नाही, तो व्यक्ती. त्याला कितीही म्हटलं की तशा अवतारात वा विणा चप्पलनं गावाला जा वा प्रवास कर. तर तो तशा अवतारात प्रवासच करणार नाही. त्याचं कारण असते लाज. तो लाजेला घाबरेल व विचार करेल की जर माझ्या ओळखीचा एखादा व्यक्ती जर मला प्रवासात मिळाला तर तो काय म्हणेल मला. असा विचार करुन साधारण व्यक्ती वा श्रीमंत व्यक्ती प्रवासात चांगलेच कपडे परीधान करेल व चप्पलही चांगलीच वापरेल. हं, अपवादात्मक परिस्थितीत एखादाच व्यक्ती लाजलज्जा सोडून असं करु शकते की तो आपली चांगली चप्पल व वस्त्रे पिशवीत ठेवून तशीच फाटकी चप्पल व वस्त्रे परीधान करुन प्रवास करु शकतो. याउलट जो खरंच गरीब आहे. तो लाजेला घाबरणारच नाही. जे आहे त्याचेजवळ, त्याच पद्धतीनं तो वागेल, त्यात बेबनाव आणणार नाही. मग तो बसमध्ये प्रवास करणारा व्यक्ती असो की कुठेही जाणारा. आपल्या औकातीप्रमाणेच तो वागेलच.'
अतूल विचार करीत होता व त्याचं विचार करणं साहजीकच होतं. कारण प्रवासातील सगळी मंडळी ही अगदी गर्भश्रीमंतच वाटत होती.
बसमध्ये निःशुल्क प्रवासाच्या सेवेबाबत सांगायचं झाल्यास एवढंच म्हणता येईल की यातून सरकारनं गोरगरीब जनतेच्याच भल्ल्याचा विचार केलेला होता. परंतु तसा विचार केला असला तरी त्यातून फायदा हा गोरगरीब जनतेचा कमी आणि श्रीमंतांनाच जास्त मिळत होता. चांगले चांगले श्रीमंत म्हातारे एसटी निःशुल्क आहे, म्हणून एसटीतून प्रवास करु लागले होते. त्यात प्रवास करणाऱ्या महिलाही गरीब वाटत नव्हत्या. शिवाय यातून कररुपात एसटी कर्मचाऱ्यांसाठी जाणारा पैसा हाही गरीबांचाच फुल नाही, परंतु पाकळीच्या स्वरुपात जात होता.
अतूल त्याबाबतीतही विचार करु लागला होता. 'पोटाचा प्रश्न सोडवीत असतांना गरीबांजवळ गावं फिरायला वेळच नसतो. त्यामुळे ते गावं फिरत नाहीत. असे असतांना अशा श्रीमंत म्हाताऱ्यांना वा गर्भश्रीमंत महिलांना एसटी बसमध्ये प्रवास करण्याची सवलत का द्यावी? असा प्रश्न जनसामान्यांना नक्कीच पडल्याशिवाय राहात नाही. मात्र यावर कोणी बोलू शकत नाही. कारण सर्वजण आपल्याला काय करायचंय असाच विचार करतात व गप्प बसतात. मग एसटीचा फायदा होवो की नुकसान? राज्याचा फायदा होवो की नुकसान? कोणाला काहीच घेणं देणं नसतंच. ते कसेतरी जगत असतात. पोटाचे प्रश्न सोडवतांना कष्टाची ओढाताण करीत. आपल्या साधारणशः घरावर गोटे येवू नयेत. म्हणूनच आडाचे देड करुन अशी मंडळी कर भरत असतात सर्वप्रकारचा आणि निवडून आलेले सत्ताधीश या गरीब जनतेच्या पैशाची अशी विनामुल्याची सवलत देवून नासाडी करीत असल्याचं चित्र बघावयास मिळतं.
बसमध्ये वयोवृद्ध व्यक्तींना निःशुल्क प्रवासाची सेवा दिली. एक चांगली गोष्ट आहे. परंतु ती सेवा गरीबांना द्यावी. तेही त्यांचं सर्वेक्षण करुन व त्यांना निःशुल्क तिकीटाचे प्रवेशपत्र देवून. सरसकट निःशुल्क प्रवास सेवा देवूच नये की राज्याचं वा एस टी महामंडळाचं नुकसान होईल. शिवाय कर रुपात पैसे भरणाऱ्या जनतेचंही नुकसान होईल.
महत्वपुर्ण गोष्ट ही की एवढीच कृपा करायची आहे तर सर्व प्रकारचं शिक्षण निःशुल्क करावं. मग ते कितीही मोठं उच्च शिक्षण का असेना वा पुर्वप्राथमीक शिक्षण का असेना. कारण अशा उच्च शिक्षणातून वा शिक्षणातून देशाचं भविष्य घडत असतं. विद्यार्थी आपल्या स्वतःचं करीअर घडवू शकतात हे तेवढंच खरं. तसेच ते राज्याच्या आणि देशाच्याही विकासात हातभार लावू शकतात. शिवाय अशा निःशुल्क शिक्षणानं गोरगरीबांचीही मुलं सर्वच प्रकारचं शिक्षण अगदी हौसेनं घेवू शकतात आणि अशाच निःशुल्क शिक्षणानं सर्वच प्रकारच्या शिक्षणाच्या संधी गोरगरीबांच्या मुलांसाठीही अगदी सहजपणे व सुलभपणे निर्माण होवू शकतात यात शंका नाही. त्यामुळंच करायचंच असेल तर शिक्षण निःशुल्क करावं, प्रवासाला निःशुल्क करु नये. जेणेकरुन देशाचाच विकास करता येईल यात तसूभरही संशय नाही.'
अतूलच्या मनात विचार होता तो वयोवृद्धांचा. त्यातच त्याला वाटत होतं की ज्या वयोवृद्ध माणसांना पेन्शन आहे. त्यांना सरकारनं बससेवा निःशुल्क देवूच नये. तशीच जी वयोवृद्ध माणसं गर्भश्रीमंत असतात. त्यांनाही बससेवा निःशुल्क देवूच नये. असा विचार करीत करीत तो चालला होता पंढरपूरच्या दिशेनं. अशातच ते रेस्टॉरेंट आलं आणि बस त्या रेस्टॉरेंट थांब्यावर थांबली. त्याचं कारण होतं जेवन. चालक व कंडक्टरला जेवन करायचं होतं आणि या रेस्टॉरेंटवर त्यांना निःशुल्क जेवन करायचं होतं आणि ते तिथं बस थांबवतात व त्या बस थांबवण्यातून प्रवाशी जेही काही जिनस विकत घेतात. त्यातून बराच पैसा रेस्टॉरेंट मालकांना मिळतो हे जगजाहीर होतं. एकदंरीत गोष्ट अशी की त्या बस थांबविण्यातून रेस्टॉरेंट मालकांना फायदाच होत होता.
तिथं तब्बल अर्धा एक तास गाडी थांबल्यानंतर गाडी सुरु झाली आणि लातूर आलं. तिथं बस काही वेळ थांबली. त्यानंतर ती लातूरवरुन काही वेळातच रवाना झाली. त्यानंतर त्याला झोप केव्हा लागली ते कळलं नाही.

************************************************

पहाटेचे चार वाजले होते. बाहेर थंड वारा सुटला होता. परंतु अजुनही अंगातून उकाडा गेला नव्हता. बस थांब्यावर बस थांबली होती. तशी प्रवाशांची किलबिल सुरु झाली होती. अशातच अतूलला जाग आली. तसं त्यानं एका प्रवाशाला विचारलं,
"किती वाजलेत?"
"पावणे चार." तो प्रवाशी म्हणाला.
"कोणतं गाव आहे?"
"पंढरपूर." तोच प्रवाशी म्हणाला.
हेच ते पंढरपूर की ज्या ठिकाणी विठ्ठल रुख्माईचं मंदीर होतं. यावेळेस ते मंदीर बंद होतं. परंतु तरीही दरमहिन्यातच वारी करणारे भाविक या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत. यावेळेसही ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी लांबून लांबून आले होते. म्हणूनच बसमध्ये गर्दी होती. त्यांना मंदीर बंदविषयी विचारलं असता ते म्हणाले होते की बाहेरुनच आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेवू. चंद्रभागेत आंघोळ करु व परत येवू.
पंढरपूरचा विठ्ठल........ त्या विठ्ठलानं आजपर्यंत बऱ्याच लोकांना आपल्या नादी लावलं होतं. असे बरेच संत झाले होते की ते पंढरपूरच्या विठ्ठलाच्याच नादानं महान ठरले होते. ती पंढरपूरातील मुर्ती पाषाणाची होती. परंतु भाविक ती मुर्ती जणू जीवंत आहे असा मनात भास तयार करुन त्या पाषाणी मुर्तीच्या भेटीला दरमहिन्यातच जात असत आणि त्या पाषाणी मुर्तीचं दर्शन घेवून अगदी कृतार्थ होत असत. त्यांनी केलेली चंद्रभागेतील आंघोळ. ती आंघोळ केली की त्यांचे एकंदर पाप धुतल्यासारखे वाटत असे. असं वाटत होतं की आता उतारवयात त्यांना सर्व संसाराचा त्याग करायला लावून पापमुक्त करण्यासाठी जणू सावळा विठ्ठल साक्षात जीवंत रुपात पंढरपूरला विराजमान होता.
काही वेळ गेला व गाडी पुन्हा कोल्हापूरच्या दिशेनं लागली. हळूहळू दिवस उजळू लागला. तशी झोप डोळ्यात होतीच. परंतु जसा दिवस उजळला. तसा अतूल झोपेतून जागा होवून एसटीच्या बाहेर पाहू लागला व खरं सुख अनुभवू लागला. त्याला कारण होतं. ते कारण म्हणजे तिथं असलेली झाडं. अशी झाडं त्यानं भंडारा जिल्ह्यातून जातांना अनूभवली होती. प्रत्येक घरी दोनचार तरी नारळाची झाडं होतीच आणि इतरही काही झाडं. हाच तो सांगलीचा भाग होता.
सांगलीतील ती शेती समृद्ध अशी शेती होती. आजुबाजूला ऊसाची वाडी होती. जिकडे पाहाल तिकडे ऊसच ऊस. कोणी म्हणत की गतकाळातील एका कृषीमंत्र्यानं हा भाग विकसीत केला आहे. आता या भागाला काही कमी नाही. ते त्या मंत्र्याचेच उपकार. परंतु आज त्या मंत्र्यालाही कोणी मोजत नाही. लोकं सांगत होते की सांगली व कोल्हापूर हे ऊसाचे जिल्हे व कोल्हापूरचा गुळ उत्तम प्रतीचा आहे असं लोकांचं म्हणणं. कोल्हापूरला पंचगंगा नदीनं समृद्ध केलं आहे.
ते लोकांचं मत होतं व लोकं त्या नेत्याबद्दल चांगलंच बोलत होते आणि एक खंतही व्यक्त करीत होते. ती खंत म्हणजे सध्या त्या मंत्र्याचं आरोग्य साथ देत नाही. नाही तर त्यानं भल्याभल्यांना पाणी पाजलं असतं.
सकाळ झाली होती व बाहेर ऊन पडलं होतं परंतु आता तेवढ्या प्रमाणात उकाडा जाणवत नव्हता. थंड आल्हाददायक वातावरण होतं. अशातच कोल्हापूर आलं आणि अतूल गाडीतून उतरला. तो आपल्या नियोजीत स्थळी पोहोचला होता. जणू या नियोजीत स्थळी आल्यावर त्याचं ब्रीद साकार होणार होतं.
ते कोल्हापूर. तिथं बसेस लागल्या होत्या. तो पाहात होता गणपतीपुळेला जाणारी बस. परंतु ती बस काही लागली नव्हती. अशातच त्यानं मित्राशी फोनवरुन संपर्क साधला. जो त्याचा एक मित्र त्याला या ठिकाणी भेटायला येणार होता. महाराष्ट्र भुषणचा कार्यक्रम हा कोल्हापूरलाच होता. तसं पाहता त्याच्या महाराष्ट्र भुषणच्या कार्यक्रमाला एक दिवस वेळ होता आणि एक दिवस तो आधीच कोल्हापूरला पोहोचला असल्यानं एक दिवस काय करावं असा विचार अतूलच्या मनात होता. म्हणूनच त्यानं तो फोन केला आपल्या मित्राला व विचारलं.
"पोहोचला का तू कोल्हापूरात. मी पोहोचलो आहे."
"नाही. मी उद्याला तुझ्या कार्यक्रमाच्या वेळेसच पोहोचतो कोल्हापूरात."
तो पुढील मित्राचा आवाज. आता भ्रमनिरास झाला. वाटलं होतं की मित्राला भेटणार. खूप खूप मजा मारणार. परंतु मित्रानं उद्या पोहोचणार असल्याचं उत्तर दिल्यानं भ्रमनिरास झाला होता. शेवटी आता एक दिवस त्याच्याकडे असल्यानं तो गाडी पाहू लागला गणपतीपुळेला जाणारी. परंतु ती स्टेशनस्थळी लागली नव्हती व स्टेशनस्थळी ती एक गाडी लागली होती. जी त्या भुताच्या किल्ल्याच्या स्थळी जात होती.
ती भुताच्या स्थळी जाणारी बस. तसं त्यानं त्या गावचा व किल्ल्याचा इतिहास बराच ऐकला होता. तिथं भुतं असतात. ती खुलेआम वावरतात असंही त्यानं ऐकलं होतं. शिवाय तिथं रात्रीला थांबणं धोक्याचं असतं हेही त्यानं ऐकलं होतं. अन् रात्री थांबल्यास आपल्या जिवाची काही शाश्वती देता येत नाही. हेही त्यानं ऐकलं होतं. मात्र तेथून तीन वाजताच सांजच्याला परत यावं लागतं. किल्ला सोडावा लागतो हे काही ऐकलं नव्हतं. तशीच तिथं शेवटची गाडी ही सांजच्याला तीन वाजताचीच आहे. त्यानंतर गाड्या नाहीत हेही काही ऐकलं नव्हतं. तसं त्यानं ती त्या भुताच्या किल्ल्यावर जाणारी गाडी पकडली व तो किल्ला पाहण्यासाठी तो त्या गाडीतून त्या भुताच्या किल्ल्यावर जावू लागला. बस हळूहळू चालत एका टेकडीवर चढली व बस थांब्यावर थांबली. तसे बसमधून किल्ला पाहणारे सर्वजण खाली उतरले.
सर्वजण बसमधून खाली उतरले होते. तसा अतूलही बसच्या खाली उतरला होता. काहीजण परीवारासह किल्ला पाहायला आले होते. काहीजण आपल्याला चार दोन रुपये मिळावे म्हणून धंदा करायला आले होते. त्यांनी आपल्या सोबत काही खाण्याचे पदार्थ आणले होते. काहीजण आपल्या स्वतःच्या खाजगी वाहनानं आले होते.
अतूल बसमधून खाली उतरला. तो किल्ला पाहू लागला. किल्ला अतिशय सुंदर होता. त्याला मजा वाटत होती तो किल्ला पाहण्यात. तसा किल्ला पाहात असतांना वेळ कसा झाला हेही त्याला समजलं नाही.

************************************************

सांज झाली होती. सुर्य मावळतीला कलला होता. तसं अतूलला आठवलं की सांज झाली. त्यानंतर तो बस्टॉपवर आला. मात्र बस केव्हाचीच निघून गेली होती व आता तो त्या किल्ल्यावर एकाकी ठरणार होता. तोच काही वेळानं तिथं एक जोडपं पोहोचलं.
ते जोडपं........ त्या जोडप्याचं नवनवीन लग्न झालं होतं. तसं ते जाणवत होतं. बहुतांश ते हनीमूनसाठी आले होते त्या शहरात आणि आपणही किल्ला पाहावा या उद्देशातून ते आज किल्ल्यावरही आले होते. तसं पाहिल्यास त्यांनाही कल्पना नव्हती की ती एसटी दिवसा तीन वाजतानंतर परत जाते व त्यानंतर एसट्याच नाहीत. त्यामुळंच तेही अडकले होते त्या त्या किल्ल्यावर. तसं पाहिल्यास त्या किल्ल्यावर कोणीच नव्हतं आणि कोणाला माहिती विचारली तर कोणी सांगणारही नव्हतंच.
अतूलला किल्ल्याची थोडीफार कल्पना होतीच. परंतु तो धीट होता. तसं पाहिल्यास त्यानं किल्ल्याची माहिती त्यांना देणं टाळलं होतं. कारण त्याला वाटत होतं की जर मी किल्ल्याची माहिती त्यांना दिली तर ते अटॅक येवून आताच मरतील. म्हणूनच वास्तविकता आल्याशिवाय आपण त्यांना काहीही सांगू नये असं त्यानं ठरवलं होतं.
ते जोडपं त्या बस्टॉपच्या दिशेनं येत होतं. जिथं अतूल उभा होता. ते जोडपं हळूहळू येवून त्याच्याजवळ थांबलं. विचारु लागलं की बस केव्हा आहे आणि वाहतूकीची साधनं आहेत की नाही शहरात जायला. तशातच साधनाबाबत काहीही माहीत नसलेल्या अतूलनं नकारार्शी मान हलवली. त्यावर त्या जोडप्यानं काही वेळ बसची वाट पाहाणं अनिवार्य समजलं व ती गरज लक्षात घेवून ते जोडपं बसची वाट पाहात तिथंच उभं होतं अतूलसोबत. तसा अंधार पडू लागला होता. तसा आणखी एक प्रश्न त्या जोडप्यानं अतूलला केला.
"इथं जवळपास काही राहण्याची सोय नाही का की आम्ही रात्र काढू शकू."
तो त्यांचा प्रश्न. तसा अनभिज्ञ असलेला अतूल म्हणाला,
"मिही तुमच्यासारखाच आहे. या शहरात आलेला पाहुणा. मला ना या किल्ल्याबाबत काही माहीत आहे ना या शहराबाबत."
"मग आता राहणार कुठं आहे तुम्ही?" ती स्री म्हणाली व तिला किंचीतशी भीतीही वाटायला लागली होती. त्याचं कारण होतं. ती नवविवाहिता होती व ते तिला पाहताक्षणी स्पष्टपणे जाणवत होतं.
त्या जोडप्यातील स्रीचं नाव हेमलता व पुरुषाचं नाव सारंग होतं. ती नवयौवना होती व तिच्या हातावरची मेहंदी अजूनही उतरली नव्हती. शिवाय तिचा चेहरा हळद लागलेली असल्यानं खुलला होता व ती आणखी सुंदर दिसत होती. तसं ते तिचं रुपडं पाहून अतूलनं विचारलं,
"कसे काय आलात या किल्ल्यावर?"
"फिरायला आलोय. आमचा आता आता विवाह झालेला असून हिला मी किल्ला दाखविण्यासाठी आणलंय. मला माहीत नव्हतं की गाड्या नसणार नंतर. नाहीतर मी केव्हाचाच निघून गेलो असतो."
अतूल त्याचं बोलणं ऐकतच होता. तोच त्याला ते जोडपं असल्यानं थोडीशी हिंमत आलीच होती. परंतु अधिवास कुठं करायचा? याचा विचार तो करीत होता. तोच त्याच्यापुढे त्या नवनवीन असलेल्या जोडप्यानं प्रश्न केला.
"आपण आता राहायचं कुठं?"
"राहायचं कुठं म्हणजे? किल्ल्यावर राहू की."
"किल्ल्यावर!" संशयीत नजरेनं ती मुलगी म्हणाली.
"का? काय झालं असं? असं आश्चर्य करण्याचं कारण काय?"
"अहो, महाशय, मी ऐकलं आहे की किल्ल्यावर भुतं असतात म्हणून."
"छे! भुतं वैगेरे काहीच नसतात जगात आणि तू चुकीचं ऐकलं आहे. अगं भूत रुपात माणसंच असतात. ते आपल्याला छळत असतात. मात्र आपण त्यापासून सावध राहायला हवं आणि आता तर आपल्याजवळ उपाय नाही. आपल्याला आसरा म्हणून या किल्ल्याचा आसरा घ्यावाच लागेल आणि मी आहे ना सोबतीला. मग घाबरु नका. हवं तर मला आपलाच नातेवाईक समजा. बघ तू माझी मुलगी आणि हे जावई. आता तर झालं."
"हं, ठीक आहे."
"मग आता घाबरणार नाही ना."
"मी आहेच तुमच्यासोबत आणि तुम्हाला म्हणजेच माझ्या जावई व मुलीला काहीच होवू देणार नाही. संकटांचा सामना स्वतः करणार. आता तर झालं."
अतूलचं ते बोलणं. ते बोलणं त्या नवविवाहित दांपत्यांच्या मनात कोरुन गेलं. हिंमतीचे ढग त्यांच्या मनात उंचबळ्या मारु लागले. अशातच कुठंतरी आसरा म्हणून ते त्या किल्ल्याकडे प्रस्थान करु लागले. वाटेत त्यांच्या गोष्टीचे पेव फुटले होते.
अतूलचं ऐकून अतूलसह ते दांपत्य त्या किल्ल्याकडे जायला निघाले. ज्या किल्ल्याची अफवा एक स्मशानी किल्ला म्हणून होती. तसं जाता जाता त्यांना एक व्यक्ती मिळाला. तो म्हणाला,
"कुठे जाताय?"
काही न सुधरुन गोष्टीत रममाण झालेला अतूल म्हणाला,
"कुठं म्हणजे? किल्ल्याकडे जातोय आम्ही. का बरं?"
"नका जावू."
"का बरं?" अतूलनं पुन्हा प्रश्न केला.
"नाही, तिथं भुतं वावरतात."
"भुतं वावरतात! मग एवढ्या रात्री आम्ही जाणार तरी कुठं? ना साधनं आहेत आमच्याकडं, ना खायला काही. शिवाय रात्रीला आम्हाला काहीतरी छत हवंय की नाही?"
"तुमचं ते समदं बरोबर आहे. परंतु कुठंही जा. तुम्ही किल्ल्याकडे जावू नका म्हणजे झालं."
तो व्यक्ती बोलून गेला होता अनुभवाचे बोल. तसं पाहिल्यास सारंग म्हणाला,
"जावू द्या यांच्या गोष्टी. भुतं बितं काही नसतात या जगात. चला आपण किल्ल्याकडेच जावू आणि असतीलच भुतं तर पाहून घेवू त्यांना."
सारंग बोलत होता. तोच अतूललाही बरीच हिंमत आली होती व तो आता नव्या दमानं किल्ल्याची वाट चालू लागला होता.
सारंग आणि त्याची पत्नी हेमलता. नवीनच लग्न झालं होतं त्याचं. तसं पाहिल्यास ते नवीन जोडपं होतं आणि आख्यायिका होती की त्या किल्ल्यातील भुतं नवीन जोडप्यांना आधीच छळतात. ते चालत होते त्या किल्ल्याची वाट. अशातच किल्ला आला व किल्ल्यात प्रवेश करताच लाईट अचानक लागले व किल्ल्यात भूत असल्याची कल्पना आली. त्यातच अतूलच्याही छातीत धस्स झालं.
तो किल्ला. त्या किल्ल्यावर साक्षात भूतं होतीच. तो किल्ला म्हणजे भुतांचा बालेकिल्लाच होता. वेगवेगळ्या रंगाची भुतं तिथं निराश करीत होती. जी अजुनही अतृप्त होती. ती भुतं किल्ल्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपला शत्रू समजत असे व त्याला छळत असे.
अतूलसह सारंग व हेमलतानं किल्ल्यात प्रवेश करताच किल्ल्याच्या आत असलेल्या शैतानी भुतांना जाग आली व ते सैरावैरा इकडे तिकडे फिरु लागले होते. मात्र त्यांनी एक दक्षता घेतली होती, ती म्हणजे अतूलसह सारंग आणि इतरांना न दिसणं.
तो किल्ला. त्या किल्ल्यावर प्रवेश करताच लाईन येणं अचानक भुतांचा वास असल्याचं सिद्ध करत होतं. अशातच रात्रीला दहा वाजले आणि लाईन गेली. त्यानंतर आपोआपच म्हशाली जळत्या झाल्या व काही विचित्र आवाज कानी पडले. ते पाहून घाबरलेली हेमलता अचानक डोळे बंद करुन व आपलं मुंडकं सारंगच्या छातीला लावून म्हणू लागली.
"सारंग, मला फार भीती वाटतेय."
ते तिचं बोलणं. त्यावर सारंग म्हणाला,
"मी आहे ना आणि आता हे अंकलही आहेत. घाबरु नगं. तुला काहीच होणार नाही व आम्ही तुला काहीही होवू देणार नाही."
काही वेळाचा अवकाश. अतूलसह त्या दोघांनीही त्या म्हशालीच्या अंधूक दिसणाऱ्या प्रकाशात आपल्याजवळ असलेला नाश्ता केला. तसं पाहिल्यास अतूलजवळ नाश्त्यात काही मुरमुरे होतेच. तसा तो अंधश्रद्धाळू नव्हता. तरीही त्यानं काही मुरमुरे जाणून बुजून राखून ठेवले होते. त्याचं कारण होतं की कोणताही भूत अचानक उत्पन्न झाल्यास त्याला ते खायला द्यायचं. तसंच दुसरं कारण होतं, ते म्हणजे त्याच्या गावाकडे एक म्हायदू नावाचा मांत्रीक स्मशानातील भुतांना मुरमुरेच खाऊ घालत असे. त्यानंतर ती भुतं शांत होत असत. तो म्हायदू म्हणजे दुसरा तिसरा कोणीही नसून त्याचा एक मित्रच होता.
रात्र होत आली होती. तसा म्हशालीचा प्रकाश थोडासा कमी झाला. लाईन यायचं काही नाव घेत नव्हती. शिवाय लाईन तरी कुठून येणार? तिथं इलेक्ट्रीकचं कनेक्शन नव्हतंच. तद्वतच काही वस्तू आपोआपच आपल्या जागा बदलवायला लागल्या होत्या. शिवाय त्या प्रत्येक निर्जीव वस्तुतून आवाज येवू लागला होता. तशी हेमलता फारच घाबरली होती. त्यावेळेस अतूल म्हणाला,
"सारंग, हेमलताला समजव की तिनं घाबरु नये. कारण आपण जर घाबरलो तर भुतं जास्त जोर करतील."
तो अतूलचा विचार. तोच एक काळे घोंगडे ओढलेला एक व्यक्ती तिथं अचानक दाखल झाला. म्हणाला,
"मला भूक लागलीय. जरा खायला द्या."
तो आवाज? तो आवाज मानवासारखाच वाटत होता. परंतु आवाज थोडा कर्कश होता. त्याचं ते बोलणं ऐकताच सारंगजवळ असलेला डबा त्यानं त्याला खायला दिला. परंतु तो म्हणाला,
"मला हे अन्न नको. माझं अन्न रक्त आहे. मला रक्त द्या खायला रक्त. नाहीतर बघाच मी काय करतोय ते ?"
त्या घोंगडेधारी माणसाचं ते बोलणं. त्यावर अतिशय घाबरलेला सारंग आणि त्याची पत्नी हेमलता. त्यांच्या तोंडातून ब्र ही निघेनासा झाला. मात्र अतूलला गावाकडील अनुभव आठवत होता. कित्येकदा त्यानं गावाकडं असलेल्या मांत्रीक म्हायदूसोबत काम केलं होतं.
अतूलला आठवत होतं. त्याचं ते बालपण. जेव्हा तो लहान होता. तेव्हा तो कित्येक वेळेस म्हायदूसोबत स्मशानात गेला होता व कित्येक वेळेस म्हायदूला त्यानं स्मशानात तंत्र मंत्र करतांना पाहिलं होतं. म्हायदू त्याला नेहमी म्हणत असे की त्यानं त्याची काहीतरी तंत्र साधना शिकावी. कामात येईल. परंतु अतूल त्या तंत्रसाधनेला एक थोतांड समजत, ती तंत्रसाधना शिकला नव्हता. ती जीवनात कामात येईल. असंही बरेचदा म्हायदूनं अगदी पटवून दिलं होतं त्याला. परंतु अतूलनं त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. मात्र ते म्हायदूचे बोल आता आठवत होते आज आणि आठवत होता तो म्हायदू. क्षणातच म्हायदू आठवत असतांना त्याला आठवली तो म्हायदू स्मशानात करीत असलेली कृती. म्हायदू जेव्हा स्मशानात जात असे.
ती अंधारी रात्र असायची व म्हायदू त्या अंधाऱ्या रात्री अतूलला घेवून स्मशानात जायचा. तेव्हा एक लिंबू सोबत ठेवायचा. सोबतच काही मुरमुरेही न्यायचा. ती अंधारी वाट तो झपझप चालू लागायचा. त्यावेळेस तो इकडे तिकडे पाहायचा नाही. अशातच ते स्मशान यायचं व ती जळती प्रेतं दिसायची. त्यातच ती जळती प्रेतं पाहिली की बस, अंगाचा थरकाप सुटायचा अतूलच्या. त्यावर म्हायदू म्हणायचा की घाबरु नगं बेटा. ही प्रेतं वा यातील भुतं काहीच करणार नाहीत तुला.
म्हायदू अतूलचा मित्र होता. तो एक जीवलग मित्रच व त्या मित्रासोबत कित्येकदा तो स्मशानात गेला होता. कशासाठी? तर त्याला अनुभव यावा व तो धीट बनावा म्हणून.
म्हायदू स्मशानात पोहोचताच त्यावेळेसही भल्ला मोठा विचित्र आवाज यायचा. तो भुतांचाच आवाज असायचा. परंतु तो आवाज अतूलला ऐकू येवूनही ते सर्व त्याला थोतांड वाटायचं. तसं पाहिल्यास त्यानं त्यावर अजीबात विश्वास ठेवला नव्हता.
म्हायदू स्मशानात पोहोचताच तो सर्वात आधी काहीतरी मंत्र पुटपुटत एका काठीनं त्या स्मशानातील जळणाऱ्या चितेभोवती एक गोल काढायचा. त्यानंतर आपल्या स्वतःच्याही भोवती एक गोल रेषा फाडायचा. शिवाय अतूलभोवतीही एक रेषा फाडून द्यायचा. त्यानंतर तो अतूलला म्हणायचा की त्यानं या गोलातून बाहेर निघू नये. भुतं छळतील. परंतु अतूलच तो. तो गोलात राहील तेव्हा ना. कधीकधी तो जाणूनबुजून त्या गोलाच्या बाहेर निघत असे. मात्र त्या गोलाच्या बाहेर निघूनही त्याला काहीच होत नसे. त्यामुळं नक्कीच त्याला ती क्रिया थोतांडच वाटायची.
म्हायदू ते सर्व करुन त्या जळत्या चितेसमोर फाडलेल्या गोलात बसायचा फतकल मांडून. त्यानंतर म्हायदू आपल्या पिशवीतून आणलेल्या वस्तू एक एक करुन काढायचा. ज्यात काही मुरमुरेही असायचे. त्यानंतर एका बाटलीतील थोडे पाणी एका हातात घ्यायचा. काहीतरी मंत्र पुटपुटायचा व ते पाणी त्या जळत्या चितेवर फेकायचा. तोच त्या आगीतून आगीच्या विशाल ज्वाळा निघायच्या. म्हायदू ते पाणी फेकल्यावर म्हणायचा.
"लेकरा, ऊठ. थोडा जागा हो. एक काम आहे मला. माझं काम करुन दे."
असे बोलल्यानंतर म्हायदूनं ते मंतरलेलं पाणी त्या चितेवर फेकताच चर्रर्र असा आवाज यायचा व त्या चितेतून एक आकृती बाहेर पडायची. ज्या आकृतीसोबत म्हायदू बोलायचा व ती आकृतीही म्हायदूसोबत बोलायची. मात्र ती आकृती म्हायदूला दिसायची की नाही ते माहीत पडायचं नाही अतूलला. मात्र ती आकृती अतूलला दिसायची नाही.
काही वेळ जाताच म्हायदू त्या चितेत आपल्याजवळील असलेल्या मुरमुऱ्यांची पुरचुंडी उघडायचा व त्या पुरचुंडीतील मुरमुरे त्या चितेवर टाकत म्हणायचा की खा, माझ्या लेकरा खा. त्यानंतर त्या मुरमुऱ्यांचे कणं त्या चितेत जळून खाक व्हायचे. परंतु त्यातून म्हायदू काय साध्य करीत असतो. हे मात्र अतूलला समजायचं नाही. शेवटी तो तेथून उठायचा व अतूलला म्हणायचा की आता आपण घराकडे जावू. मात्र रस्त्यातून जातांना मागं वळून पाहायचं नाही. नाहीतर भुतं छळतात. तसा म्हायदू माघारी फिरायचा. तो मागं पाहायचा नाही आणि त्याच म्हायदूच्या पाठीमागं अतूलही त्याच्या मागोमाग झपाझप पावले टाकत जायचा. तो मागेही कुतूहलाने वळून वळून पाहायचा. परंतु ना त्याला भुतांनी छळलं होतं, ना त्याला भुतं दिसली होती.
ते नेहमीच चालायचं म्हायदूचं. ती भुतं आणि तो भुतांचा लपंडाव चालायचा म्हायदूच्या जीवनात. त्याचा साक्षीदार अतूल होता व अतूलला म्हायदूनं तंत्रविद्या शिकविण्याचा प्रयत्न केला. तरी अतूल तंत्रविद्या शिकला नाही. मात्र कधीतरी कामात येईल ही तंत्रविद्या असं त्याच्या जीवलग मित्राचं म्हणणं होतं. ते आज आठवत होतं आणि आज तिही दुसरी बाजू मनात होती की ही भुतं बितं काही वास्तविक स्वरुपात नसतातच. त्याला नेहमी वाटायचं की माणूसच देव असतो आणि माणूसच भूत असतो. भूत आणि अनेक दुसरं काहीही नसतं.
गावागावात बरेच लोकं नवश करतात व नवश केल्यावर तो नवश फेडण्यासाठी बकरा घेतात वा कोंबडा घेतात. एक बस ठरवतात व ती बस रवाना करतात. ती बस रवाना झाली की त्यात एक ताजातवाना बकरा नेतात. अशीच एक बस अतूललाही दिसली होती प्रवासादरम्यान. ती सजवून होती व विचारणा केली, तेव्हा कळलं होतं की बकरा कुठंतरी नवसाला कापायला नेत आहेत. त्याचं कारण होतं नवश कबूल करणं. वाच्यता होती की अमूक अमूक व्यक्तीला भुतबाधा झाली होती व भुतानं छळलं होतं. त्यावेळेस त्या देवाला नवश केला व तो व्यक्ती बरा झाला. म्हणूनच तो बकरा बळी देवून नवश फेडण्याचा तो उपाय. ज्यात बकऱ्याचा दोष नव्हताच.
अतूल विचार करु लागला होता नवसाबद्दल. 'देवाला नवश म्हणून कोंबडा, बकरा कापणं वा भुतं असतात म्हणणं आणि मानणं, देवं असतात असं मानणं आणि म्हणणं. खरंच जो देव असा बकरा, कोंबडा वा एखादा जीव बळी म्हणून घेत असेल, तर तो देव कसला? याबाबत प्रश्नचिन्हं कोणाच्याही मनात सहजरित्या उभं राहील. परंतु आताचा शिकलेला समाज त्याकडेही अंधश्रद्धा म्हणून पाहून हो ला हो मिळवत असतो व त्याकडं दुर्लक्ष करतो. यावरुन दुसरं प्रश्नचिन्हं लोकांच्या उच्च शिकण्यावरही लागतं. लोकं उच्च शिक्षीत असूनही भूत मानत असतात. नवश मानत असतात. शिवाय विवाह करतांना देवपुजा म्हणून बकऱ्याचा व कोंबडीचा बळी देत असतात. डायका पाडत असतात आणि नव्या अंधश्रद्धेला जन्म देत असतात. अशा लोकांना मांजर, कुत्रा आडवा गेला की अपशकून होतो आणि तेवढाच अपशकून घुबड दिसल्यावरही.
भुतं असतात की नसतात हा एक संभ्रमाचाच प्रश्न आहे. काही लोकं म्हणतात की भुतं नसतात तर काही लोकं म्हणतात की भुतं असतात. परंतु भुतं असतात, असं म्हणणाऱ्यांना विचारलं की तुम्ही भुतं प्रत्यक्षात पाहिली आहेत का? तर त्याचं उत्तर नाही असंच येतं. तोच संदर्भ देवांनाही लागू होतो. काही लोकं म्हणतात की देव असतो तर काही लोकं म्हणतात की देव नसतो. मग सृष्टीचं संचलन कसं चालतं? सृष्टी जर आहे तर देवं असायलाच हवी आणि देवं जर आहेत तर भुतंही असायलाच हवी. तसं पाहिल्यास भूत संकल्पना ही जास्त प्रमाणात आजही गावागावात अस्तित्वात आहे. जरी लोकं आज शिकत असले तरी आणि जरी लोकांनी भुतं पाहिली नसली तरी. अपवाद काही लोकं भुतं पाहिल्याची पुष्टी करतात. मात्र आम्हालाही दाखवून द्या असं म्हटल्यास ते प्रत्यक्ष प्रमाण देत नाहीत वा दाखवून शकत नाहीत. यावरुन भुतं अस्तित्वात आहेत या मतावर संभ्रम निर्माण होत असतो.
देव प्रत्यक्षात अस्तित्वात आहे किंवा नाही हे काही माहीत नाही. परंतु लोकं पाषाणरुपी दगडाच्या मुर्तीलाच देव मानतात. त्यांनाच सर्वस्व समजून त्यांनाच नवश बोलतात आणि नवश म्हणून कोंबरु, बकरु वा एखादा प्राणी कबूल करतात. कोणी गुप्त धन मिळावं म्हणून नरबळीही कबूल करतात. हे पाप असतं तरीही काही लोकं यात पापपुण्य पाहात नाहीत. परंतु प्रत्यक्षात ती पाषाणरुपी मुर्ती नवश म्हणून तो प्राणी बळी म्हणून देण्याचं कबूल केल्यावर ती खाते का? एखादा अंश तरी? त्याचं उत्तर नाही असंच येईल. मग नवश देणं वा कोंबरु बकरा वा एखादा प्राणी नवश म्हणून बळी देणं या भ्रामक कल्पना आहेत. तरी माणूस त्या पाषाण मुर्तीच्या आहारी जातो. त्याचं कारण म्हणजे आजपर्यंतच्या चालत आलेल्या प्रथा. आपण शिकलो, समजदार झालो. तरीही आपल्या नवश, व्रतवैकल्ये व पुजा पाठ समजलेली नाही. आज पुजेच्या नावावर आपण पाषाणरुपी देवासमोर सर्व प्रकारचं जिनस चढवतो. छप्पन तऱ्हेच्या पदार्थाचे भोग चढवतो. ते श्वानाला वा गाईला टाकतो की जे,त्यांचं अन्न नाही व ज्यातून त्यांचं पोट खरिब होवू शकतं. परंतु ते अन्न एखाद्या गरीब, भिकारी व्यक्तींना देत नाही. नवसाच्या नावावर कोंबडे, बकरे वा एखादा प्राणी कापून नातेवाईकांसाठी गावभोजन करणारी मंडळी, त्या पंक्तीत एखादा अतीव भूक लागलेला भिकारी बसला तर त्याला जेवन देण्याऐवजी चक्कं उठवून हाकलून लावतात. खरंच अशानं तो पाषाणरुपी देव तरी पावेल काय? महत्वाचं म्हणजे भुत आणि देव जरी नसला आणि आत्मा परमात्मा जरी कोणी पाहिला नसला तरी त्या भुकेल्या माणसांना हाकलून देवून त्यांच्या आत्म्यातून जी शापवाणी निघते, त्याचा शाप फार मोठ्या स्वरुपात लागतो हे नाकारता येत नाही.
विशेष बाब ही की पाषाणातील देव हा कधीच कोंबडा बकरा मागत नाही व कोंबडा बकरा त्याला नवश म्हणून बळी देवू नये. आपण ज्या पाषाणाला पुजतो, ती आपली श्रद्धा आहे. तो पाषाणातील देव आपलं कधीही बरं वाईट करीत नाहीत. करतं बरवाईट. ते आपलेच कर्म. आपले जर चांगले कर्म असेल तर आपलं चांगलंच होतं आणि वाईट कर्म असेल तर त्याची परियंती वाईटच होते.
पाषाणाला देव समजण्याचं कारण असते आपली श्रद्धा. आपल्याला तसं करतांना फार बरं वाटतं. त्यासाठी आपण लाखो रुपयेही खर्च करतो. शिवाय त्या पाषाणी मुर्तीसमोर करमतंही आपल्याला. जर तिथं नवश म्हणून कोंबडा बकरा चढवीत नसतील तर. कारण त्या ठिकाणी स्वच्छता असते व घाणेरडेपणा नसतोच आणि ज्या ठिकाणी कोंबडा बकरा बळी म्हणून चढवतात. त्या ठिकाणी किळस वाटते. माणसाला करमत नाही. महामारीची लागण लागण्याचा संभव असतो. कारण तिथं कोंबडा, बकरा बळी म्हणून दिल्यानंतर जे,रक्त प्रवाहीत होतं. त्या रक्तावर असंख्य घाणीवर बसणाऱ्या माशा घोंगावत असतात. जंतू संसर्ग वाढवीत असतात आणि त्या पिसांवरही माशा आणि जंतू बसत असतात. असे जंतू बसत असतात की जे मांसाचे तुकडे शिजविल्यावरही आपल्याभोवती मांसाचे असे वलय तयार करुन जीवंत राहून पोटात जातात. ज्यातून आपल्याला फार मोठ्या विपरीत प्रमाणावर हानी होत असते. ते जंतू मांस खाल्ल्यानंतर आपल्या पोटाला हानी करीत असतात.
महत्वपुर्ण गोष्ट ही की मांस खावूच नये आणि मांस खातांना पाषाणरुपी दगडाला नवश देवून त्या देवाला बदनाम करु नये. देव आहे की नाही हे काही स्पष्ट सांगता येत नसलं तरी देव काही भाव घेत नाही आणि तो भाव म्हणून कोणत्याच प्राण्यांचा बळी मागत नाही.
देव हा दगडात वा मंदीरात नाही. तो असतो प्रत्यक्ष जीवांत. जो जीव सजीव आहे. ज्यात झाडं झुडपंही येतात आणि सर्व डोळ्याला न दिसणारे सजीवही. आपण त्यांची हत्या केली तर असा जीव अप्रसन्न होतो आपल्यावर. त्याची शापवाणीही लागते व आपले अहित होते व आपलं अहित झालंच तर आपल्याला वाटते की आपल्याला भुतबाधा झाली. मग आपण नवश वैगेरे सारं बोलतो त्या दगडाच्या देवासमोर आणि कावळा फांदीवर बसल्यागत आपण अशा मानसीक आजारारातून बरे होतो. त्याचं कारण असतं, आपलं नवश कबूल केल्यानं झालेलं आत्मीक समाधान. असं समाधान आपण नवश कबूल केलं नाही तरी होत असतं. परंतु ते कोणीच लक्षात घेत नाही आणि देवाला नवश कबूल करुन व तो देवून बदनाम करीत असतो आपण.
भुतांच्याही संकल्पना अशाच असाव्यात. भुतंही पृथ्वीवर नसावीतच. त्याचं कारण म्हणजे जर भुतं प्रत्यक्षात असतीच तर ज्या निरपराध प्राण्यांचा आपण अन्न म्हणून बळी घेतो वा नवश म्हणून देवाला बळी देतो. ते निरपराध प्राणी भुतं बनली असती व त्यांनी आपल्याला छळलं असतं. जगूच दिलं नसतं आयुष्यभर. सतवतच राहिले असते ते जीवं. कारण आपण अगदी लहानपणापासून कितीतरी प्राण्यांचा जीव घेवून त्यांना खात असतो. परंतु तसं होत नाही. जो जास्त प्रमाणात मांस सेवन करतो. त्याचं शरीर आजच्या काळात सुदृढ असतं. यावरुन भूत नसतंच सृष्टीत याची कल्पना येते. तसाच देवही नसतोच. कारण देव जर असता तर अशा निरपराध प्राण्यांचे बळी घेणाऱ्यांना कडक शिक्षा देत आला असता. आज आपण पाहतो की जो जास्त प्रमाणात अपराध करतो, तोच नेता बनतो आणि एकदा का नेता बनला तर आपली चांदीच चांदी होत असते.
महत्वाचं सांगायचं झाल्यास देव असो का नसो, भूत असो का नसो, आपण त्याचा विचार करु नये. त्यांना त्यांच्या जागी ठेवावं आणि आपण आपलं कर्म चांगलं करीत राहावं. हिंसा करु नये. मग ती साधी मुंगी का असेना, तरच आपल्याला त्याचं फळ चांगलं मिळत जाईल. जेणेकरुन आपल्याला आपल्या जीवनात सुख भोगता येईल. शिवाय भुत आहे असं जरी कोणी म्हटलं त्यावर विश्वास ठेवू नये. कारण ते भुत त्यांनी स्वतः पाहिलेलं नसतं. ते फक्त दुसरा घाबरायला हवा. म्हणूनच बोलत असतात. कारण बरेचसे आपले आजार हे आपल्या घाबरण्यातून होत असतात व जे भूत आहे असं सांगतात वा भीती दाखवतात. त्यांना तसेच मानसीक रोगी बनवायचे असतात. जेणेकरुन आपण त्यांच्याकडे जावून त्यांचं पोट भरु शकू. तीच मंडळी अमूक अमूक देवाला कोंबडा, बकरा बळी म्हणून द्या, असे म्हणत आपल्या हातून पाप घडवून आणत असतात आणि आपल्याच हातातून निरपराध प्राण्यांचा बळी घेत असतात.'
तो अतूल व त्याचे ते विचार. तसा तो लोकांना म्हणायचा की आज आपण शिकलेलो आहोत. उच्च शिक्षण आपण घेतलेले आहे. आपल्या देव दानव यांच्या संकल्पना समजतातच. देव आहे वा नाही. भुतं आहेत किंवा नाही. ते आपल्याला चांगलं समजतं. मग आपल्याला आजच्या काळात बुवाबाजी का समजत नाही? आजही आपण पाषाणाला पुजतो. त्याचेवर लाखो रुपये खर्च करतो, जरी आपण उच्च शिकलेले असलो तरी आणि आपण तांत्रीक, मांत्रीक व पुजारी यांच्यावर विश्वास ठेवून निरपराध प्राण्यांचा बळी देतो. आपल्याला कुत्रा आडवा गेल्यास अपशकून होतो. मांजर आडवे गेल्यास अपशकून होतो घुबड दिसल्यावर अपशकून होतो. ह्या अशा व असल्या स्वरुपाच्या अंधश्रद्धाच जर आपल्या मनात वाढत असतील व वेध घेत असतील आपल्या मनाचा तर आपण जे उच्च शिक्षण घेतले आहे. त्याचा आपल्याला उपयोग काय? त्यापेक्षा आपण अडाणी असतो तर बरे झाले असते असं म्हणायला काहीही हरकत नाही. विचार करावा की जर भुतं असती तर आपण ज्या प्राण्यांचं मांस खातो, त्या प्राण्यांनी भुतं बनून आपल्याला आधीच छळलं असतं. मग आपल्याला जगातल्या कोणत्याच देवानं वाचवलं नसतं हे तेवढंच खरं आणि देव जर असता तर कोंबड्या बकऱ्याचा बळी घेणाऱ्या व उच्च शिक्षण शिकून अंधश्रद्धा पाळणाऱ्या माणसाला कधीच पावला नसता हे तेवढंच खरं आहे यात शंका नाही. म्हणूनच शिकले आहात ना. मग डोळस बना. निरपराध प्राण्यांची हत्या करु नका. अंधश्रद्धा पाळू नका. देवाच्या नावावर होमहवनासाठी झाडंही तोडू नका. तिही एक हत्याच आहे. ज्याचा परिणाम आपण पाहातच आहो. सुर्य जणू आग ओकत आहे. हे असंच जर सुरु राहिलं त तो दिवस दूर नाही की आपण संपून जावू. मग तुम्ही कोणत्याही देवाला कितीही प्राणी बळी म्हणून दिले तरी कोणताच देव वाचविणार नाही. कारण माणूसच देव आहे आणि माणूसच भूत आहे आणि तोच माणूस बळी देवून देवाला बदनाम करीत आहे. हे आपण लक्षात घ्यायला हवे.

************************************************

अतूल सतत म्हायदूच्या संपर्कात होता. तसा म्हायदू त्याला तंत्र मंत्रही शिकवू पाहात होता. परंतु अतूल काही ते तंत्र मंत्र शिकला नाही वा त्या भानगडीत पडला नाही. शिवाय त्या गोष्टीला आज बरेच वर्ष झाले होते. आज म्हायदूही जीवंत नव्हता. ना ही म्हायदूची विद्या. तसं पाहिल्यास अतूलला विचीत्र आवाज ऐकायला यायला लागले होते. वस्तुही जागा बदलवतांना दिसल्या. त्यातच एक घोंगडेधारी व्यक्ती पुन्हा तिथं येवून उभा राहिला. जो मला तुमचं रक्त हवं म्हणू लागला होता.
अतूलला तसा चित्रविचित्र आवाज येताच व तो घोंगडेधारी व्यक्ती दिसताच अतूलनं ठरवलं की आपणही बनावाची तंत्र मंत्र विद्या दाखवावी. जेणेकरुन पुढील व्यक्ती जर माणूस असेल तर आपल्याला घाबरेलच.
अतूलनं तसा विचार करताच त्यानं सारंग व हेमलताभोवती एक वर्तूळ तयार केलं. तसं ते वर्तूळ बनवतांना तो मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत होता. जणू तो मंत्र म्हणण्याची भाषा करीत होता नव्हे मंत्रोच्चार करीत आहे असं दाखवत होता. अशातच त्यानं सारंग आणि हेमलताभोवताली केलेला वर्तूळ, त्याला जरी मंत्रविद्या येत नसली तरी त्याला मंत्रविद्या येत असेल हे दाखवून गेला. वस्तू हालत होत्या. तसा अतूल सारंग आणि हेमलताला म्हणाला,
"घाबरु नका. मी आहे. मी या भुतांना बघतोच. यांना या मंत्रानं बांधूनच टाकतो कायमचं. बघा कसा तडपवतोय यांना ते."
अतूल काहीतरी क्लुप्ती करीत होता. सारंग आणि हेमलता ते सर्व पाहात चालले होते आणि विशेष म्हणजे सारंग आणि हेमलताचं अतूलच्या बोलण्याकडं व तो करीत असलेल्या बारकाव्याकडे लक्ष होतं. त्यांना वाटत होतं की अतूल हा मंत्रविद्या शिकलेलाच आहे. त्यामुळं आता घाबरण्याचं कारण नाही. त्यामुळंच ते अतूलवर विश्वास ठेवून अगदी निश्चींत झाले होते. आज अगदी दिमाखानं ते त्या वर्तुळात उभे होते व त्यांना वाटत होतं की आपण वर्तूळात असल्यानं आपल्याला काहीच होणार नाही.
थोड्या वेळाचा अवकाश. अतूलनं आपल्याभोवतीही एक रिंगण तयार केलं होतं एक रेषा फाडून. त्यानंतर त्यानं हातात थोडं पाणी घेतलं व मंत्र पुटपुटण्यासारखं करु लागला. त्यातच त्यानं ते पाणी त्या वर्तूळाच्या बाहेर फेकले व म्हणू लागला,
"हे शैतानी लेकरा, का छळतोस तू आपल्या बापाला. इथून तू मुकाट्यानं जा. नाहीतर तुला फार त्रास भोगावं लागेल."
तसा आणखी थोडा वेळ झाला व त्यानंतर त्यानं आपल्याजवळ असलेल्या मुरमुऱ्याचा चुरा बाहेर काढला. त्यातील काही चुरा बाहेर फेकून तो म्हणाला,
"माझ्या शैतानी लेकरा, खा. पोटभर खाऊ खा आणि मुकाट्यानं जा इथून. इथं किंचीतही थांबू नगंस."
अतूल ते सगळं करीत होता. ती कृती लाभदायक होती की नाही ते कळत नव्हतं त्याला. परंतु तसा विचार न करता तो करीत होता ती कृती. कारण त्या सर्व कृतीनं काही क्षण त्या वस्तूंचे सरकणे व जागा बदलविणे थांबले होते. शिवाय तो घोंगडेधारी व्यक्तीही ती कृती अवाक होवून पाहात आहे असं वाटत होतं.
ती घोंगडेधारी व्यक्ती त्या अतूलचं ते सगळं पाहात होती. तसेच सारंग आणि हेमलताही ते सगळं पाहात होते. त्यांना वाटत होतं की अतूल हा खरोखरंच मूळ स्वरुपातील तांत्रीक व मांत्रीक आहे. त्याला काहीतरी विद्या नक्कीच येत आहे की ज्या विद्येनं त्यांना काहीच होणार नाही. त्यांच्या जीवाचंही बरंवाईट होणार नाही.
थोड्याच वेळाचा अवकाश. ती बादशाहीच अवतरली होती जणू त्या किल्ल्यावर. ती हालणारी प्रत्येक आकृती व वस्तू त्या अंधूक प्रकाशात बोलकी झाली होती. कोणती वस्तू म्हणत होती की तो आदिलशाहा आहे तर कोणती आकृती म्हणत होती की तो दिलेरखान आहे तर कोणती आकृती सिद्धी जौहर आहे. असं म्हणत होती. मी अमूक अमूक केले व एवढे सारे जीव घेतले यांची पृष्टी देत होत्या त्या सर्व आकृत्या.
ते घडलंही होतं त्या गडावर. कारण यापुर्वी गावकऱ्यांची कित्येक आवाज अनुभवले होते या किल्ल्यातून. अशातच किल्ल्याच्या बाहेर कोणीतरी बॉंब फोडल्याचा आवाज आला. त्यानं वर्तूळात उभे असणारे सारंग व हेमलताही घाबरले होते.
तो स्मशानी किल्ला. बाहेर आलेला फटाक्याचा आवाज. शिवाय त्या बाहुल्यांचं व त्या निर्जीव वस्तूंचं चालणं. प्रत्यक्षदर्शी तिथं भुतांचंच अस्तित्व असावं हे सिद्ध करीत होतं आणि अतूलही समजून चुकला होता की तिथं भुताचं अस्तित्व आहे. परंतु ते तो जाहीर करु शकत नव्हता. तसं त्याला वाटत होतं. त्याला वाटत होतं की भूत त्या किल्ल्यावर असतांना अकस्मात त्याला न घाबरता तो समोर येवू शकतो कोणत्याही रुपात. शिवाय त्याला त्यानं काय काय केलं हे सांगण्याची गरज उरली नसती घाबरविण्यासाठी. त्या वस्तू हालत होत्या व मनुष्यवाणीनं बोलू लागल्या होत्या. त्या शुद्ध अतूलच्याच मातृभाषेतून संवाद साधत होत्या. ते पाहूनही थोडीशी शंका आली होती त्याला. वाटत होतं की ह्या बाहुल्या व या वस्तू जणू आपल्याच भाषेतून म्हणजेच आपल्याच मातृभाषेतून बोलत असाव्यात. ज्यावेळेस दिलेरखान, सिद्धी जौहर आणि आदिलशाहा होते. त्यावेळेस त्यांची भाषा ही आपल्याला जी भाषा येते, ती नसेलच, तरीही. ती भाषा वेगळीच असेल तरीही. कारण भुतं वेषभुषा बदलविण्यात जसे माहीर असतात. तसेच भाषा बदलविण्यातही माहीर असतील, असं त्याला वाटत होतं. कारण हे त्यानं कधी एके काळी ऐकलं होतं.
अतूलला आधी वाटत होतं की हा बनाव असेल प्रवाशांना लुटायचा आणि या ठिकाणी नवनवीन विवाहीत जोडपे पाहून त्यातील माणसांची हत्या करीत असेल या किल्ल्यात राहणारा कोणीतरी नराधम आणि नवविवाहितेवर बलात्कार करुन तिला काही दिवस कैद करुन ठेवत असेल हा नराधम. शिवाय काही दिवसानं त्या नवविवाहितेचा वीट आला की ती आपल्या डोक्यामागची कटकट समजून तिचाही कडेलोट करीत असतील हे लोकं. शिवाय प्रकरणाची शहानिशा होवू नये म्हणून या किल्ल्यावर भूत आहे. असा कांगावा करीत असतील हे लोकं. किल्ल्यावर भूत वैगेरे काही नसेल तरीही. कोणीतरी नराधम आहे व तो नराधम व्यक्ती एकच असू शकतो. नाहीतर आजपर्यंत या किल्ल्याचं बिंग फुटलं असतं. मात्र तो व्यक्ती साफळा रचून व भूत आहे याचा आधार घेवून इथे अकस्मात अधिवास करणाऱ्या लोकांना वेगवेगळं करीत असेल व त्यांना वेगवेगळं करुन त्यांची हत्या करीत असेल. हे निर्वीवाद सत्य असेल. परंतु आज प्रत्यक्षदर्शी अनुभवतांना ती गोष्ट अतूलच्या लक्षात आली होती. लक्षात आलं होतं की गडावर खरं खुरं भूत वास्तव्याला नसावं. मात्र तरीही त्या गोष्टी त्यानं आपले सहकारी असलेल्या हेमलता व सारंगला सांगीतल्या नाही. त्यानं तेच दाखवलं की आपल्याला मंत्रविद्या येते व त्यांनी कोणत्याही आवाजाला वा वस्तू हालण्याला घाबरु नये, तर फक्त त्याचेवर विश्वास करावा. त्याच्यापासून किंचीतही विलग होवू नये. कारण भूत हे आपल्या तिघांपैकी प्रत्येकाला वेगळं पाडण्याचा प्रयत्न करेलच. त्यामुळंच प्रत्येक पावित्र्यात त्यांनी सावध असावं.
सारंग व हेमलता जे काही समजायचं ते समजले होते. परंतु ते अतूल हा तंत्रविद्या शिकलेला नाही, हे समजले नव्हते. मात्र अतूल आपल्याला आलेल्या अनुभवानं त्यांना सांगत होता की त्यांनी एकमेकांना सोडू नये. तेवढी काळजी घ्यावी.
थोड्याच वेळाचा अवकाश. त्या हालणाऱ्या वस्तू एकमेकांवर आदळू लागल्या होत्या आणि मनाचा थरकाप सुटत चालला होता. सोबतीला चित्रविचित्र आवाज होता आणि आता त्या आवाजात थोडा कर्कशपणाही आला होता. शिवाय तो आवाज मोठ्या स्वरुपात यायला लागला होता. अशातच तो काळा घोंगडा घातलेला माणूसही चालायला लागला होता. तोही आवाज करीत. तो घोंगडेधारी व्यक्ती आपलं तोंड दाखवीत नव्हता. त्यानं घुंगट परीधान केलं होतं.
तो घुंगटधारी व्यक्ती चालायला लागताच तो अचानक थांबला. तशी थोड्याच वेळात बाजूला आग लागली होती.
ते सर्व प्रकार एकामागोमाग एक होत होते. कधी कर्णकर्कश आवाज यायचा तर कधी तेथील वस्तू एकमेकांवर जोरात आदळायच्या तर कधी तो घोंगडेधारी व्यक्ती चालायला लागायचा तर कधी आग लागायची व क्षणातच विझून जायची. असं वाटायचं की जणू तिथं भूत असून तोच भूत लपंडाव खेळत आहे. कधी प्राण्यांचे आवाज यायचे, तर कधी पक्षांचे आवाज. त्यामुळंच जे काही विचार आधीचे होते, त्यावर पाणी फेरलं होतं.
अतूलला काही अंशी वाटत होतं की तिथं भूत नसावं. तर काही अंशी वाटायचं की भूत असावं. तो ओळखून होता की तो प्रकार भुताचा नसेलच आणि भुतं त्या वस्तू हालवीत नसून त्या वस्तू त्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून चलचित्रपटासारख्या एखादा व्यक्तीच वर छतावर बसून हालवीत असेल. शिवाय त्यानं जी पुर्वी कल्पना केली होती की तिथं एकच व्यक्ती आहे. ती चुकीची नव्हती. ती व्यक्ती एकच आहे व ती त्याच छतावरुन खालच्या वस्तू हालवत असेल व तेथूनच एखाद्या फटाक्याच्या वातीला आग लावून तो मैदानात भिरकावून देत असेल. ही त्याला शंका होती. जेणेकरुन खालच्या भागात असलेल्या माणसांमध्ये भीती निर्माण होईल व ते बेशुद्ध पडतील. लागलीच ते व्यक्ती बेशुद्ध पडल्यास तोच व्यक्ती त्यात पुरुष असल्यास त्याचे हातपाय घट्ट बांधत असेल व त्याच्या पत्नीचेही हातपाय बांधून तिला ओढत ओढत दुसऱ्या कमऱ्यात नेत असेल. त्यानंतर तो एकच व्यक्ती दोराने घट्ट बांधलेल्या पुरुष असलेल्या व्यक्तीच्या मस्तकावर तीक्ष्ण वार करीत असेल व त्याच्या दोराने बांधलेल्या पत्नीवर पाशवी बलात्कार. मग तिच्याही मस्तकावर तीक्ष्णपणे वार करुन तिलाही तोच व्यक्ती यमसदनी पाठवत असेल. त्यानंतर तोच एक व्यक्ती त्या दोघाच्याही प्रेताला उचलून किल्ल्यावरुन लोटून देत असेल. मात्र त्या दोराने घट्ट बांधलेल्या व्यक्तीला अर्ध्या रात्री कड्यावरुन फेकताच ती एवढ्या मोठ्या प्रमाणात ओरडत असेल की तो आवाज कड्यावरुन लगतच्या गावाला पोहोचत असेल व वाटत असेल की भुतानं आपला डाव साधला. ती प्रेते खाली पडली की तेवढ्याच रात्री त्या प्रेताची विल्हेवाट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली जंगली श्वापदं लावत असतील. ते अगदी अमावस्येच्या त्या अंधाऱ्या रात्री जेवन येणार म्हणून टपूनच बसलेली असतील. हा अतूलच्या शंकेचा एक भाग होता.
तो किल्ला....... तो किल्ला तसं पाहता भयाण अशा ठिकाणी असून आजुबाजूला बऱ्याच दऱ्या होत्या व त्या दऱ्यांना लागून जंगलंही होतं. त्याचाच फायदा त्या किल्ल्यावर राहणारा व्यक्ती घेत असेल अशीही एक शंका अतूलला होती.
अतूल तशी शंका पकडून विचार करु लागला होता की आता त्याला पकडायचं कसं? तो विचार करु लागला होता. तोच एक गाणं सुरु झालं होतं किल्ल्यावर. बहुतेक ते रेडीओचं गाणं होतं व मधामधात त्या रेडीओतून आदिलशहा, औरंगजेब, सिद्धी जौहर, शिवाजी राजे, संभाजी राजे, तर कधीकधी बाजीप्रभू आणि इतर साऱ्याच महाविरांचे आवाज येत होते. ते नाव सांगत असत आपल्या स्वतःचं. त्यामुळं नेमके ते कोण? हे कळत नसे. त्या रेडीओतून कधी कधी वेगळीच नावं ऐकायला येत होती. जी नावं इतिहास शिकतांना अतूलनं कधीही ऐकलेली नव्हती. महत्वपुर्ण बाब ही की तो व्यक्ती त्या किल्ल्यावर तसा देखावा दाखवून एका खुनी साम्राज्याची कल्पना देत होता.
तो रेडीओतून येणारा आवाज. त्या आवाजाला सुमधूर संगीत लाभलं होतं. अशातच तो उठला व हेमलता आणि सारंगच्या कानात काहीतरी पुटपुटला. तो म्हणाला की त्यांनी वर्तुळाबाहेर जावू नये व डोळे घट्ट लावावे वा उघडे करु नये तर उघड्या डोळ्याने कोणताही अनुभव घेवू नये. तसंच मी जेव्हापर्यंत डोळे उघड म्हणणार नाही. तेव्हापर्यंत डोळे उघडूच नये. मात्र तोंडानं काहीही पुटपुटत राहावं व हातावर काही वेळ पाणी घेत ते पुढ्यात शिंपडत राहावं.
अतूलनं तसं सांगताच तसे सारंग व हेमलता त्या वर्तुळात ते दोघंही न घाबरता पालकट मारुन बसले. त्यांनी आपले डोळे लावले व हातात पाणी घेवून ते पाणी काहीतरी तोंडानं पुटपुटत समोर पुढ्यात फेकू लागले. त्यावेळेस त्यांचे डोळे घट्ट लावलेले होते.
अतूल घाबरतही होता थोडा थोडा. कारण ती काळोखी रात्र होती व त्याला तिही एक शंका होती की तिथं भूत असावं आणि दुसरी शंका होती की भूत नसावं. तसं पाहिल्यास त्याला भुताची भीती नव्हती. ना ही तो भुत मानत होता. परंतु भीती माणसांचीही होती. त्याला वाटत होतं की जर या कुविचारांच्या माणसांची टोळी असेल तर........ तर त्यांच्या टोळीपुढं त्या एकट्याचा निभाव लागणार नाही व ते त्यांना रंगेहाथ पकडून मारतील. परंतु जे होईल ते. यावर त्याचा विश्वास होता व तो आपली पावलं टाकत होता. अशातच तो छतावर जावू पाहात होता त्या तेवढ्याच काळोख्या रात्री.
ती अंधारलेली वाट चालत होता तो. तो जिनेच चढत होता. अशातच एक रानपाखरु त्याच्याजवळून उडून गेलं. जणू ते वटवाघूळ होतं. थोड्याच वेळात त्याचं लक्ष त्या किल्ल्याच्या भिंतीकडे गेलं. त्या भिंतीवर शस्र लटकली होती. आता अतूलनं ठरवलं की आपण सुरक्षा म्हणून एखादं शस्र हातात घ्यावं. तसं त्यानं सुरक्षा म्हणून ते एक शस्र हातात घेतलं व ते शस्र हातात घेवून तो जिना चढून जावू लागला. तोच पुन्हा एक वटवाघूळ त्याच्या कानशिलेचा वेध घेवून जावू लागला.
काही वेळाचा अवकाश. काही वेळातच अतूल जिना चढून गेला होता. परंतु त्या जिन्यावरही काळाकुट्ट अंधार होता. आजुबाजूचं काहीच दिसत नव्हतं. भीती फार वाटतच होती. तशी दुर्गंधी बरीच येत होती. तोच त्याच्या हातात एक माणसाचं सांगाडं लागलं. आता मात्र अंगाचा थरकाप व्हायला लागला होता त्याच्या. तसं त्यानं खाली पाहिलं.
खाली तोच बुरखाधारी शैतानी पुरुष सारंग आणि हेमलताच्या जवळ गेला होता. मात्र सारंग आणि हेमलताचे डोळे बंद होते. त्यामुळंच त्यांना तो पुरुष जवळ आल्याची कल्पना नव्हती. अशातच अतूलला वाटलं की जर आपण त्यांना जागं केलं नाही व त्या शैतानी पुरुषानं त्यांना जागं केलं तर ते घाबरतील व बेशुद्ध पडतील. याचाच वेध घेत तो जोरानं ओरडला. "सारंग, डोळे उघडऽऽ. सारंग डोळे उघडऽऽ."
अतूलचा आवाज ऐकताच सारंगनं डोळे उघडले, तसे हेमलतानंही. त्यांनी पाहिलं की तो बुरखाधारी शैतान त्यांच्या समोर साक्षात उभा आहे आणि आता तो त्यांना पकडणार. तोच अतूल काही बोलायच्या आतच ते काहीही अतूलचं न ऐकता ते दोघंही सैरावैरा पळायला लागले. त्यांना तो शैतानी बुरखाधारी व्यक्ती खरोखरचाच भूत वाटला होता. परंतु तो पुतळा होता.
सारंग व हेमलता त्या पुतळ्याला अतिशय घाबरले होते व तो पुतळाच भूत आहे असे समजून सैरावैरा पळत सुटले होते.
अतूल आता आतमध्ये होता. तो छतावर होता. त्याचा त्या दुर्गंधीनं श्वास गुदमरत होता. तरीही तो हुशार असल्यानं सावधगिरीची भुमिका घेत वाट काढत चालला होता व तो भक्ष्याला चिमणी जशी शोधते. तसा तो या गडावर षडयंत्र रचणाऱ्या व्यक्तीला शोधत होता. मात्र शत्रूही काही कमजोर नव्हता की तो अतूलला सापडेल.
अतूलचा ओरडण्याचा आवाज. तो आवाज ऐकताच काहीही आवाज न करता किल्ल्यावरील त्या व्यक्तीनं अतूलवर निशाणा साधला व त्याच्या दिशेनं आपल्याजवळील एक टोकदार वस्तू फेकून मारली. त्यानंतर त्या तीक्ष्ण वस्तूच्या वासानं व त्या दुर्गंधीनं अतूलचा जीव गुदमरला व तो बेशुद्धच झाला. त्यानंतर त्या किल्ल्यावरील व्यक्तीनं त्याचा नाद सोडला व खाली असलेल्या हेमलता व सारंगला घाबरविण्याचा प्रयत्न केला. तो त्यांना घाबरविण्यासाठी खाली आला.
त्या व्यक्तीचे नाव हलधर होते. हलधरनं अतूलला बेशुद्ध केलं व तो खाली आला. खाली येता येता त्यानं आपल्यासोबत तोच रेडीओ घेतला. ज्या रेडीओतून भुतांचे आवाज कानात ऐकू येत होते. त्याच्या हातात एक म्हशाल होती व तो वेध घेत घेत सारंग आणि हेमलताचा पाठलाग करीत होता.
सारंग आणि हेमलता किल्ल्याच्या बाहेर आले होते व ते एकमेकांपासून भटकले होते. आता मात्र हलधरसमोर एक चांगली सुवर्णसंधी चालून आली होती. त्याला हेमलतासारखी नवविवाहित मुलगी बलात्कारासाठी चांगली मेजवाणीच ठरणार होती. त्यानं तिला गाठलं व तिच्या तोंडावर घट्ट चिकटपट्टी बसवली व तिचे आपल्या तुफान ताकदीनं हातपाय बांधून टाकले. तसं पाहिल्यास त्याचं तोंड बांधलेलं असल्यानं तो नेमका कोण? हे कळायला मार्ग नव्हता आणि ती ओळखूही शकत नव्हती त्याला.
हेमलता बंदीस्त झाली आहे हे हलधरला माहीत पडलं होतं व ती आता काहीही करु शकत नाही हेही त्याला माहीत झालं होतं. गाणं सुरुच होतं आणि ती म्हशालही त्याच्या जवळपासच होती. अशातच तो सारंगला शोधत होता. जणू त्यालाही साखळदंडानं बांधून टाकायचं होतं हलधरला. तो त्याचाच विचार करीत होते.
हलधर सारंगला शोधत होतं. त्याचं कारण होतं सारंगला बंदीस्त करणं जर सारंग मोकळा असता तर तो वार करु शकला असता हलधरवर. जरी हलधरची ताकद जास्त असली तरी. अशातच सारंग हलधरच्या दृष्टीस पडला व त्यानं त्याचा पाठलाग सुरु केला. तसं त्याला पकडलं व साखळदंडानं बांधणार. तोच परत सारंग त्याच्या हातून निसटला व तो जीव मुठीत घेवून पळून जावू लागला होता.

**********************************************************
हलधरनं वार केल्यानं व दुर्गंधीनं गुदमरल्यानं बेशुद्ध झालेला अतूल अचानक शुद्धीवर आला होता. त्याला क्षणातच आठवलं की तो कुठे आहे. तसंच त्याला आठवलं त्यानं सारंग आणि हेमलताला दिलेलं आश्वासन. तसा तो लगबगीनं खाली आला. कारण त्याला आठवत होतं की तो जेव्हा बेशुद्ध झाला होता. तेव्हा सारंग आणि हेमलता खाली होते. तो खाली येताच तो शोधू लागला सारंग व हेमलतालाही. तसा तो क्षणातच बेशुद्धीवरुन शुद्धीवर येताच थकवा अतिशय जाणवत होता. परंतु त्याची पर्वा न करता तो शोधत होता त्यांना. तसा तो सारंग व हेमलतालाही जोरानं आवाज देवू लागला होता. परंतु हलधरनं तिला साखळदंडानं बांधल्यानं व तिचं तोंडही बंदीस्त केल्यानं तिचा आवाज येत नव्हता. अशातच तो राजवाड्यातून बाहेर आला. जिथं हेमलता पडली होती. तिचं तोंड जरी बंदीस्त केलं असलं तरी आवाज होताच.
अतूल जेव्हा बाहेर आला, तेव्हाही तो आवाज देतच होता. ते पाहून हेमलताही तोंडाच्या आतून थोडासा आवाज काढून प्रतिक्रिया देवू लागली. तीच प्रतिक्रिया त्या स्मशान शांततेने ऐकायला आल्यानं तो तिच्या दिशेनं निघाला. क्षणातच त्यानं तिला पाहिलं. पाहिलं की ती साखळदंडानं वेष्टीत आहे व तिचं तोंडही घट्ट कापडाने बांधलेलं आहे. तशी त्याला पाहून तिला थोडीशी हिंमत आलीच. तशी अतूललाही हिंमत आली होती थोडीशी. त्यानं लगबगीनं तिचे साखळदंड उघडले व तिचं तोंडही उघडून तिला बंधमुक्त केलं. त्यानंतर तिला सारंगविषयी विचारलं. परंतु सारंग कुठं आहे हे तिला माहीत नव्हतं. तशी ती रडक्या स्वरात म्हणाली,
"आज नेमकं विपरीत घडलं. कदाचीत सारंग या जगात आहे की नाही असं माहीत नाही."
"तू अशी अभद्र बोलू नकोस. सारंगला काहीही होणार नाही. मी वचन दिलंय ना तुला की सारंगला मी काहीही होवू देणार नाही म्हणून. मग माझ्यावर विश्वास ठेव. चल आपण सारंगला शोधुया."
अतूल सारंगचा विचार करीत असतांना त्याला आठवलं की दूर अशा ठिकाणी म्हशाल दिसत आहे आणि तिही जळती आहे. त्याच म्हशाली जवळ लख्खं प्रकाश. तो प्रकाश कशाचा आहे हे कळत नव्हतं. तसा विचार मनात येताच त्याला वाटलं की कदाचीत सारंग एखादी म्हशाल घेवून तर चालला गेला नसेल तिकडे. तसा विचार करीत त्यानं हेमलताचा हात धरला व तो त्या दिशेनं धावू लागला. त्याची व तिची धाव एवढी तीव्र होती की क्षणातच ते त्या म्हशालधारी घोंगडेवाल्याजवळ पोहोचले. त्या घोंगडेवाल्याच्या थोडे दूरच होते ते. अतूलनं तिला सांगीतलं होतं की चूप राहायचं. तशी ती आतापर्यंत चूपच होती.
अतूल आणि हेमलता पाहात होते की त्या किल्ल्याच्या थोड्याशा अंतरावर ते स्मशान होतं व त्या स्मशानात अनेक समाध्या विराजमान होत्या. त्यातच त्या घोंगडेधारी हलधरनं तिथं एक चिता तयार केली होती त्या आधी. त्या चितेवर सारंगला झोपवलं होतं. तसंच साखळदंडानं सारंगला बांधून ठेवलं होतं व तो ओरडू नये म्हणून त्याचं तोंडही बांधून घेतलं होतं. शिवाय आता त्याच्या हातात म्हशाल होती व तो सारंगच्या चितेला आग लावणार होता. हेतू होता की जर त्याच्या चितेला आग लागून सारंगला नष्ट केलं गेलं असतं तर हेमलता एकटीच पडली असती. कारण हलधरला माहीत होतं की अतूलही जणू मरण पावलेला आहे. परंतु त्याला हे माहीत नव्हतं की अतूल जीवंत आहे.
ते स्मशान होतं व त्या स्मशानात अनेक समाध्या होत्या. बहुतेक त्या राजेसाहेबांच्या. काही काही समाध्या इनामदारांच्याही होत्या. त्या समाध्या दौलायमान वाटत होत्या. आजुबाजूला आंब्याची झाडं होती व त्या आंब्यावर लटपट आंबे लागलेले नव्हते. मात्र मोहोर आला होता त्या आंब्याला व त्या मोहराचा सुगंध परीसरात दरवळला होता. तो सुवास हेमलता व अतूल त्यासोबतच सारंगच्याही नाकपुड्यात शिरला होता. मात्र त्या तिघांनाही त्या परीसरात पसरलेल्या सुगंधाची तिमीर नव्हती. काळजी होती ती त्या हलधरला मारण्याची. त्याचाच विचार करीत होता अतूल.
ते स्मशानघाट होतं व त्या स्मशान घाटात सारंगला हलधरनं शरणावर बांधून शरण रचलं होतं. त्याच्या हातात म्हशाल होती व त्या म्हशालीनं तो जाळणार होता सारंगला. तोच हेमलता ओरडली. त्यातच तो हलधर सारंगकडे न पाहता तो हेमलताकडे वळला.
त्यानं हेमलताकडे नजर रोखली होती. शिवाय तो तिकडं वळताच तिच्या दिशेनं चालायला लागला होता. ते पाहून अतूल हेमलताला म्हणाला,
"हेमलता, तू त्याला आपल्या नादी लाव. तू थोडी दूर पळ व त्या हलधरला हुलकावणी दे. मी ताबडतोब तो तेथून दूर झाला की सारंगला बंधनमुक्त करतो. तोपर्यंत तू त्या हलधरला कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त कर."
हेमलतानं अतूलचं ते सगळं ऐकलं. तसं तिनं सारंगला बंधनमुक्त करण्यासाठी त्या हलधरला आपल्या पाठीमागं लावलं. तशी संधी शोधताच अतूल सारंगजवळ पोहोचला व त्यानं सारंगला साखळदंडातून बंधनमुक्त केलं.
सारंग साखळदंडातून बंधनमुक्त झाल्यावर शरणातून बाहेर आला होता. त्यानं अतूलच्या मदतीनं आपली सोडवणूक केली होती. आता सारंगमध्ये फार मोठ्या प्रमाणावर हिंमतीचे ढग निर्माण झाले होते. अशातच ज्या हेमलताच्या मागं ते हलधर लागला होता. त्या हेमलताच्या मागं लागलेल्या हलधरचं मन ठेचण्यासाठी अतूलसह सारंगही तयार झाला होता.
ते स्मशान होतं व त्या स्मशानात आता हलधर व्यतिरीक्त अनेक साऱ्या सत्ताधीशांच्या समाध्या दिसू लागल्या होत्या.
हलधर काही वेळानं गायब झाला व आता ते घोंगडेधारी भूत पुन्हा दिसायला लागलं होतं. ती आंब्याची आमराई रोशन झाली होती. मोहोराचा सुगंध परीसरात दरवळला होता. परंतु तो शैतानी भूत नाचत होता तिथं. तेच घोंगडेधारी भूत सारंगच्या मागं लागत होतं. तेच भूत अतूलच्याही मागं लागत होतं आणि तेच भूत हेमलताच्याही मागं. अतूल विचार करु लागला होता की या भुतापासून मुक्ती कशी मिळवता येईल. तसा विचार करीत करीत तो त्या उभ्या झालेल्या गतकाळातील राजसत्ताधीशांच्या भुताला तोंड देत होता. अशातच त्याला आठवलं की म्हायदू भुतांना पळविण्यासाठी त्यांना जाळून टाकण्याचा सल्ला देत असे. त्यानं म्हायदूला एकदा लोकांशी त्याविषयी बोलतांना पाहिलं होतं. म्हायदू म्हणाला होता की भुतांना जर नष्ट करायचं असेल तर जाळून टाकावं.
अतूलला ते अचानक आठवलं व आठवलं की भुतांना नष्ट करण्यासाठी जाळून टाकावं लागतं. तोच विचार मनात धरुन त्यानं त्या भुताला जाळून टाकण्याचा विचार केला. तसं विचार करताच त्यानं त्यातील एका भुताला पकडलं. प्रचंड ताकद लावून तिघांनीही त्याला शरणावर लोटवलं. त्याचे हातपाय बांधले. त्यानंतर त्यानं आपल्या हातात त्याच भुताच्या हातातील जळती म्हशाल घेतली आणि आता त्याला जाळणार. तोच ते भूत मनुष्यवाणीनं बोलू लागलं. जे आतापर्यंत मौन होतं.
"मला वाचवा. कृपया मारु नका हो." ते भूत मनुष्यवाणीनं बोलू लागलं होतं. तोच तो आवाज ऐकून अतूलला दया आली व त्याला आठवलं की गतकाळात भूत मनुष्यवाणीनं बोलू लागताच त्याला म्हायदू प्रश्न विचारायचा. तसं त्यानंही मनात ठरवलं व तो त्या शरणावर असलेल्या भुताला प्रश्न विचारु लागला. तो म्हणाला,
"मी सोडतो तुला. परंतु आधी मला सांग की तू कोण आहे?"
"मी सगळं सांगतो. परंतु आधी मला सोडा."
"असं नाही सोडणार आम्ही. तू स्पष्टीकरण दिल्यावरच व सर्व सांगीतल्यावरच सोडणार. आधी आम्हाला सांग की तू कोण आहे. अन् जास्त हुशारकी केलीच तर गाठ माझ्याशी आहे. मी तुला या म्हशालीच्या टेंब्याने या शरणाला अग्नी लावून जाळूनच टाकील. मला तसा तसा भयंकर राग येतो. पाहायचं आहे का तुला? प्रात्यक्षीक दाखवू का?"
"नको, नको. सगळं सांगतोय मी. मी हलधर हलधर. जवळच्याच, जवळच्याच गावात राहतो. मी दररोज या किल्ल्यावर येतो व लोकांना मार्गदर्शन करतो. या किल्ल्याची माहिती देतो. त्यावेळेस मी लोकांकडून जाणून घेतो की त्यांना काय हवं आणि काय नको. शिवाय मी विशेषतः नवीन येणाऱ्या जोडप्यांना या किल्ल्याची माहिती सांगत सांगत गुंतवून ठेवतो त्याच्या बसची वेळ निघून जातपर्यंत. त्यावेळेस मी जाणून घेतो की हे आपल्या यांच्याकडे असलेल्या स्वतःच्या वाहनांनी आले की बसनं. त्यानंतर मला कळलं की ते बसनं आले तर मला फार आनंद होतो व मग मी माझा डाव खेळतो."
"डाव? कशाचा डाव? जरा खुलवून सांग."
"डाव अर्थात युक्ती लढवतो असं मला म्हणायचंय."
"कशाची युक्ती?"
"भुताची. भूत नसतात असं लोकांचं म्हणणं. परंतु मी या किल्ल्यावर भुताचं वावरणं साकार करतो. त्यासाठी बाहुल्यांची व पुतळ्याची मदत घेतो. माझ्या बाहुल्यांना धागे बांधलेले असतात. त्या बाहुल्या कळसुत्री बाहुल्यासारख्या नाचत असतात. शिवाय काही वस्तूही नाचत असतात व इकडे तिकडे जात असतात. ह्या सर्व वस्तू बारीक धाग्यानं बांधलेल्या असतात. ते धागे कोणाला दिसत नाहीत आणि त्या धाग्यांचाच वापर करुन मी किल्ल्यावर छताला बसून नाचवत असतो माझ्या बाहुल्या. तशाच त्या सर्व वस्तू आणि तो घोंगडाधारी पुतळाही आणि मिही घोंगडा घेवून व तोंडावर भुताचं कापड परीधान करुन वावरत असतो. जणू कोणाला भीती वाटावी व वाटावं की या निर्धन किल्ल्यावर भुतच असावं. मग मी एकदा का कळसुत्री बाहुल्या नाचवल्या की ज्या लोकांनी पाहिलेल्या नसतात. ती मंडळी केवळ हार्टअटॅकनंच मरण पावतात आणि ज्यांनी पाहिलेलीही असतात. तेही त्या कळसुत्री बाहुल्यांचा विचारच करीत नाहीत व तेही एकदम घाबरुन हार्ट अटॅकनंच मरण पावतात. मी मेलेल्या माणसांची विल्हेवाट लावतो. त्यांना कड्यावरुन फेकून देतो. शिवाय जे काही माणसं तरीही जीवंत असतात. त्यांचे घाबरट स्थितीत हातपाय बांधतो व किल्ल्यावरुन फेकून देतो अगदी ते जीवंत असतांना. तेव्हा ते ओरडतात. ते ओरडले की बस, माझं काम साकार होतं. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावातील गावकऱ्यांना वाटतं की जणू ही क्रिया भुतानंच केली असेल. तेव्हा ते घाबरतात व किल्ल्यावर रात्रीला कोणीही भटकत नाहीत. मी किल्ल्यावर अचानक राहणारी मंडळी घाबरायला हवा म्हणून रेडीओवर गाणंही लावतो. कधी मैदानात फटाक्याची वात जळवून फटाकेही फोडतो. हे सर्व मी एकटा करतो. यात कधीकधी अलिकडेच विवाहबद्ध झालेली तरुण मंडळीही येतात. मग तर मला मेजवाणीच असते. मी अशा तरुण मुली दिसल्याच तर त्या मुली व मुलासमोर असा भुताचा बनाव करीत त्यांना एकमेकांपासून विलग करतो. मग माझा डाव साधतो साधतो. मी त्या दोघांपैकी तिच्याच समोर तिच्या पतीला फेकून देतो. किल्ल्यावर तिच्या पतीला तिच्या आधी फेकून देतो. मग त्या अबला स्त्रीलाही किल्ल्यावरुन तिच्याच पतीसारखं फेकून देण्याची धमकी देतो व तिच्याकडून वासनामयी चाळे घडवून आणून आपल्या वासनायी पुर्ण करतो. परंतु मी आपणासमोर आज हारलो. आपण मलाच आज धडा शिकवलाय आणि दाखवलंय की या जगात शेराला सव्वाशेर मिळतोच. मी आजपर्यंत कित्येक बळी घेतलेत या किल्ल्यावर. खुनी साम्राज्य निर्माण केलं नव्हे तर खुनी साम्राज्य निर्माण करण्याचा केला. आजपर्यंत मी एवढ्या लोकांना ठार केलं की ज्याची आकडेवारी देता येत नाही. परंतु मी चुकलो. मला माफ करा. मी यापुढील काळात चांगलं आयुष्य जगेल. असं परत करणार नाही. मला फारच पश्चाताप होत आहे."