शिवराम, संपत, रामा, तिमा अन् सोमा व शंकर असे ते मित्र. त्याईचीबी दाट मैत्री होती. एकप्रकारे लोखंडाचे तुकडे होतीन. परंतु त्याईच्या मैत्रीचे तुकडे होणार नाई अशी त्याईची बालपणीची मैत्री होती. ते सगळेच बालपणात एकाच शाळेत जात होते. त्यातच शिक्षणाचं महत्व असल्यानं त्या सप्प्याईच्या मायबापाईनं त्याईले शाळेत टाकलं होतं. मात्र संप्यावर बाबासाहेबाईच्या ईचाराचा प्रभाव पडला अन् तो शिकत गेला व लयच मोठा झाला होता. त्यातच राम्याबी थोडासा कमीच शिकला होता. शिवराम थोडा जास्त शिकला होता तं सोमा सात वर्ग. तिमा शिकला होता दोन वर्ग. सोम्यानं आपल्या बापाचाच धंदा पकडला होता तं राम्यानंबी आपल्या बिरादरीतलाच धंदा पकडला होता.

1

स्वातंत्र्य - भाग 1

शिवराम, संपत, रामा, तिमा अन् सोमा व शंकर असे ते मित्र. त्याईचीबी दाट मैत्री होती. एकप्रकारे लोखंडाचे तुकडे होतीन. त्याईच्या मैत्रीचे तुकडे होणार नाई अशी त्याईची बालपणीची मैत्री होती. ते सगळेच बालपणात एकाच शाळेत जात होते. त्यातच शिक्षणाचं महत्व असल्यानं त्या सप्प्याईच्या मायबापाईनं त्याईले शाळेत टाकलं होतं. मात्र संप्यावर बाबासाहेबाईच्या ईचाराचा प्रभाव पडला अन् तो शिकत गेला व लयच मोठा झाला होता. त्यातच राम्याबी थोडासा कमीच शिकला होता. शिवराम थोडा जास्त शिकला होता तं सोमा सात वर्ग. तिमा शिकला होता दोन वर्ग. सोम्यानं आपल्या बापाचाच धंदा पकडला होता तं राम्यानंबी आपल्या बिरादरीतलाच धंदा पकडला होता. ते दोघंबी बक्कळ पैसा ...अजून वाचा

2

स्वातंत्र्य - भाग 2

स्वातंत्र्य भाग दोन तो स्वातंत्र्याचा इचार. तो इचार करता करता त्याईचं बालपण कवा संपलं व कवा मोठे झाले. ते त्याईले कळलंच नाई. मंग सुरु झाला खरा संघर्ष. स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी परिस्थिती अशी होती का त्या प्रत्येकाईले वाटत होतं, आपण खरंच स्वतंत्र्य झालोत काय? त्याच एका ईचारानं त्या सर्व मित्राईनं पुन्हा एक स्वातंत्र्याची लढाई लढली होती. जी लढणं अति आवश्यक बाब बनली होती. तो सामाजिक परीवर्तन करण्याचा तो काळ. त्या काळात त्याईच्यासमोर बऱ्याच अडचणी आल्या. परंतु त्या अडचणींचा बाऊ न करता ते मित्र सामाजिक परीवर्तन करण्यासाठी लढत रायले अविरतपणे. ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय